Skip to content

Mountain बद्दल बायबलमधील वचने: Melted

9 वचने · 11 पैलू

Melted बद्दल वचने

  1. मग तुम्ही जवळ येऊन त्या पर्वताच्या पायथ्याशी जाऊन उभे राहिलात आणि पर्वत अग्नीने पेटला होता, त्याची ज्वाला आकाशापर्यंत पोहोचली होती, सर्वत्र अंधार, ढग आणि घनदाट अंधकार पसरला होता.

  2. पण ज्यावेळी तुम्ही अंधारातून येणारा आवाज ऐकला आणि डोंगर माथ्यावरील त्या भयानक ज्वाला पाहिल्या, तेव्हा तुमचे सर्व गोत्रप्रमुख व वडील माझ्याकडे आले.

  3. याहवेहसमोर पर्वत थरथरला, याहवेह इस्राएलच्या परमेश्वरासमोर सीनाय थरकापला.

  4. याहवेहच्या उपस्थितीत, समस्त पृथ्वीचे सत्ताधीश व सगळे पर्वत मेणाप्रमाणे वितळतात.

  5. अहा, आकाश विदारून तुम्ही खाली आलात, तर किती बरे झाले असते, तुमच्यासमोर पर्वत थरथर कापले असते!

  6. जसा अग्नी शाखांना जाळून भस्म करतो, व ज्यामुळे पाणी उकळले जाते, तुम्ही खाली या व तुमच्या नामाची महती तुमच्या शत्रूंना समजू द्या ज्यामुळे राष्ट्रे तुमच्यासमोर थरथर कापली जातील!

  7. जेव्हाही आम्हाला अनपेक्षित असे अत्यंत अद्भुत चमत्कार करण्यास, तुम्ही खाली आले, पर्वतांनी तुम्हाला पाहताच ते भीतीने तुमच्यासमोर डळमळले.

  8. त्यांच्या पायाखाली पर्वत वितळतात जसे अग्नीपुढे मेण, जसे पाणी उतारावरून खाली येते, तशा दऱ्या दुभंगतात.

  9. त्यांच्यासमोर पर्वत कंपित होतात व टेकड्या विरघळतात. पृथ्वी आणि जग व त्यात राहणारे सर्वजण त्यांच्या समक्षतेत थरकापतात.