मुख्य मजकुरावर जा

Modern Samaria बद्दल बायबलमधील वचने

59 वचने · 23 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले नाही कारण ते यरुशलेमकडे जात होते.

  2. नंतर एक शोमरोनी, प्रवास करीत जिथे तो होता तिथे आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळा आला.

  3. त्याच्याजवळ जाऊन त्या मनुष्याने त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून पट्ट्या बांधल्या. त्याला आपल्या गाढवावर बसवून तो एका उतारशाळेत आला आणि त्याने त्याची सेवा केली.

  4. दुसर्‍या दिवशी त्याने उतारशाळेच्या मालकाला चांदीची दोन नाणी देऊन सांगितले, ‘या माणसाची काळजी घ्या,’ आणि ‘मी परत येईन, त्यावेळी जास्त खर्च झाला असेल तर त्याची भरपाई करेन.’

  5. “आता या तिघांपैकी चोरांच्या हाती सापडलेल्या मनुष्याचा शेजारी कोण होता असे तुला वाटते?”

  6. यरुशलेमकडे वाटचाल करत येशू प्रवास करीत गालील प्रांत आणि शोमरोनच्या हद्दीवर आले.

  7. तो येशूंच्या पायाजवळ पालथा पडला आणि त्याने त्यांचे आभार मानले—तो एक शोमरोनी होता.

  8. येशूंनी विचारले, “मी दहा लोकांना शुद्ध केले ना? मग बाकीचे नऊ कुठे आहेत?

  9. परमेश्वराचे गौरव करण्यासाठी हा एकटाच आणि तोही परकीय मनुष्य आला काय?”

  10. तेव्हा यहूदीया प्रांत सोडून ते पुन्हा गालील प्रांतामध्ये गेले.

  11. त्यासाठी त्यांना शोमरोन प्रांतामधून जावे लागले.

  12. मग ते शोमरोनातील सूखार नावाच्या नगरास आले; ते याकोबाने आपला पुत्र योसेफास दिलेल्या शेताजवळ होते.

  13. तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्यांना म्हणाली, “आपण यहूदी आहात व मी एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही मजजवळ पाणी कसे मागू शकता?” (कारण यहूदी लोक शोमरोनी लोकांशी संबंध ठेवीत नसत.)

  14. आमचा पिता याकोबाने आम्हाला ही विहीर दिली होती व ते स्वतः, त्यांची गुरे आणि त्याचे पुत्रही हे पाणी पीत असत, त्यांच्यापेक्षा आपण थोर आहात काय?”

  15. आमच्या पूर्वजांनी या डोंगरावर परमेश्वराची उपासना केली, परंतु तुम्ही यहूदी, उपासनेचे स्थान यरुशलेममध्येच आहे असा आग्रह धरता.”

  16. तुम्ही शोमरोनी तुम्हाला माहीत नाही, अशाची उपासना करता; पण जो आम्हाला माहीत आहे आम्ही त्याची उपासना करतो. कारण उद्धार यहूदी लोकांपासून आहे.

  17. ती स्त्री म्हणाली, “मला माहीत आहे की, ख्रिस्त म्हणतात तो मसिहा येणार आहे आणि तो आला म्हणजे सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करून सांगेल.”

  18. “चला, या मनुष्याला पाहा, मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली. तोच ख्रिस्त असू शकेल का?”

  19. “मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली,” या तिच्या साक्षीवरून शोमरोन नगरातील अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.

  20. म्हणून शोमरोनी लोक येशूंकडे आल्यावर त्यांनी येशूंना नगरात राहण्याची विनंती केली. तेव्हा ते तिथे दोन दिवस राहिले.

  21. याकाळात त्यांच्या वचनामुळे आणखी पुष्कळ लोक विश्वासू झाले.

  22. मग ते त्या बाईला म्हणाले, “तू सांगितले म्हणून नव्हे, तर आम्ही प्रत्यक्ष त्यांचे बोलणे ऐकून त्यांच्यावर विश्वास ठेवत आहोत आणि आम्हाला माहीत आहे की हा मनुष्य खरोखर जगाचा तारणारा आहे.”

  23. यहूदी पुढार्‍यांनी त्यांना उत्तर दिले, “आम्ही खरे सांगत नव्हतो का की तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हाला भूत लागलेले आहे?”

  24. परंतु जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेममध्ये आणि सर्व यहूदीयात आणि शोमरोनात आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत माझे साक्षीदार व्हाल.”

  25. स्तेफनाच्या वधाला शौलाने मान्यता दिली. त्या दिवसापासून यरुशलेम येथील मंडळीचा मोठा छळ सुरू झाला आणि प्रेषितांशिवाय सर्व विश्वासणारे यहूदीया व शोमरोन या प्रांतात पांगले.