मुख्य मजकुरावर जा

Modern Samaria बद्दल बायबलमधील वचने

59 वचने · 23 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. फिलिप्प खाली शोमरोनातील एका शहरात गेला आणि त्याने ख्रिस्ताबद्दल घोषणा केली.

  2. ज्यावेळी समुदायाने फिलिप्पाचे ऐकले व त्याने केलेली चिन्हे पाहिली, सर्वांनी त्याच्या म्हणण्याकडे बारकाईने लक्ष दिले.

  3. अनेक अशुद्ध आत्मे किंकाळी मारून निघून जात आणि अनेक पक्षघाती व पांगळे लोक बरे होत असत.

  4. त्या शहरात मोठा आनंद झाला होता.

  5. आता काही काळापर्यंत शिमोन नावाचा एक मनुष्य जादूटोणा करीत होता आणि त्याने शोमरोन शहरातील लोकांना चकित करून सोडले होते व तो आपण कोणी फार मोठे आहोत अशी फुशारकी मारीत असे.

  6. म्हणून सर्व उच्च व नीच लोक त्याच्याकडे लक्ष देत होते व जिला “परमेश्वराची महाशक्ती म्हणतात तो खरोखर हाच मनुष्य असला पाहिजे,” असे उद्गार काढीत होते.

  7. ते त्याच्यामागे जात होते कारण बराच काळापासून जादूटोणा करून त्याने त्यांना थक्क केले होते.

  8. नंतर यहूदीया, गालील आणि शोमरोन या प्रांतातील सर्व मंडळ्यांना शांतता लाभली आणि ते विश्वासात दृढ झाले. प्रभूचे भय धरून राहिल्यामुळे आणि पवित्र आत्म्याच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या संख्येत वाढ झाली.

  9. म्हणून सैनिकांनी, हुकुमाप्रमाणे पौलाला घेऊन त्याच रात्री अंतिपत्रिसापर्यंत पोहोचविले.