Skip to content

Milk बद्दल बायबलमधील वचने: Figurative

17 वचने · 23 पैलू

Figurative बद्दल वचने

  1. त्यांना इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून चांगल्या व विस्तीर्ण देशात, दूध व मध वाहत्या देशात घेऊन जाण्यासाठी मी खाली आलो आहे. त्या देशात कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी हे लोक राहतात.

  2. आणि इजिप्तमधील तुमच्या या दुःखातून तुम्हाला बाहेर काढून कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोक राहत असलेल्या दूध व मध वाहत्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याचे मी वचन दिलेले आहे.

  3. जेव्हा तुम्हाला कनानी, हिथी, अमोरी, यबूसी आणि हिव्वी यांचा देश, ज्यात दूध व मध वाहतो, ते तुम्हाला देतील अशी तुमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली, त्यात याहवेह तुम्हाला नेतील; तेव्हा या महिन्यात हा विधी तुम्ही पाळावा.

  4. दूध व मध वाहत असलेल्या देशाकडे जा. परंतु मी तुमच्याबरोबर येणार नाही, कारण तुम्ही ताठ मानेचे लोक आहात आणि कदाचित वाटेत मी तुमचा नाश करेन.”

  5. त्यांनी मोशेला अहवाल दिला तो असा: “जो देश हेरण्यास तुम्ही आम्हाला पाठविले तिथे आम्ही गेलो, त्यात खरोखरच दूध व मध वाहतात! ही पाहा तेथील फळे.

  6. त्यांनी आम्हाला या ठिकाणी आणले आणि दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला हा देश आम्हाला दिला;

  7. म्हणून हे परमेश्वरा, स्वर्गातील तुमच्या पवित्र निवासस्थानातून तुम्ही खाली पाहा आणि आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे जो दुधामधाचे प्रवाह वाहणारा असा देश तुम्ही आम्हाला दिला आहे त्याला व आम्हा इस्राएली लोकांना आशीर्वादित करा.”

  8. “तुमच्यातील सर्व तान्हेल्यांनो, पाण्याजवळ या; आणि तुम्ही, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, या, घ्या व खा! या, द्राक्षारस अथवा दूध घ्या पैसे न देता, विनामूल्य घ्या.

  9. तू अनेक देशांचे दूध प्राशन करशील आणि तुला राजांचे स्तनपान करविण्यात येईल. तेव्हा तुला कळेल कि मी, याहवेह तुझा उद्धारकर्ता मी तुझा तारणारा, याकोबाचा सर्वसमर्थ आहे.

  10. तेव्हा मी तुमच्या पूर्वजांना वाहलेली शपथ पूर्ण करेन, आणि दूध व मध वाहणारा देश’ ज्यात आज तुम्ही राहत आहात तो मी तुम्हाला देईन.” मी उत्तर दिले, “याहवेह, आमेन.”

  11. आमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथपूर्वक वचनाप्रमाणे, तुम्ही इस्राएलला दूध व मध वाहता देश दिला.

  12. त्या दिवशी मी त्यांच्याशी शपथ वाहिली की मी त्यांना इजिप्तमधून जो देश मी त्यांच्यासाठी शोधला आहे, जिथे दूध व मध वाहते अशा देशात मी त्यांना आणेन, जो सर्व देशांपेक्षा अति सुंदर आहे.

  13. “त्या दिवशी नवीन द्राक्षारस पर्वतांवरून पाझरेल, आणि टेकड्यांवरून दूध वाहील; यहूदीयातील ओहोळांची कोरडी पात्रे पाण्याने भरून वाहतील आणि याहवेहच्या मंदिरातून एक झरा निघेल व तो शिट्टीमच्या खोर्‍यात पाणी पुरवेल.

  14. मी तुम्हाला दूध दिले, जड अन्न दिले नाही, कारण तुम्ही त्यासाठी तयार नव्हता आणि निश्चित त्यासाठी तुम्ही अजूनही तयार नाही.

  15. वास्तविक आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होते, पण त्याऐवजी कोणीतरी तुम्हालाच परमेश्वराच्या वचनांची मूलतत्वे परत शिकविण्याची गरज आहे. तुम्हाला दूध हवे, जड अन्न नव्हे!

  16. आणि जो कोणी दुधावर जगतो तो अजून तान्हेबाळ आहे आणि तान्हेबाळ असल्यामुळे नीतिमत्वाच्या शिक्षणाविषयी अपरिचित आहे.

  17. नवीन जन्मलेल्या बालकांसारखे शुद्ध, आध्यात्मिक दुधाची इच्छा धरा म्हणजे तुम्ही तुमच्या तारणाच्या अनुभवामध्ये वाढत जाल.