मुख्य मजकुरावर जा

Milk बद्दल बायबलमधील वचने: Used for food

5 वचने · 23 पैलू

Used for food बद्दल वचने

  1. मग त्याने दूध, दही आणि वासराचे मांस घेतले, जे त्याने बनविले होते आणि ते त्यांच्यासमोर ठेवले; आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.

  2. “मला तहान लागली आहे,” तो तिला म्हणाला. “कृपा करून मला थोडेसे पाणी दे.” तेव्हा तिने त्याला दुधाची बुधली उघडून त्यातून त्याला थोडे दूध दिले आणि त्याला झाकून टाकले.

  3. माझ्या भगिनी, माझ्या वधू, मी माझ्या बागेत आलो आहे; सुगंधी द्रव्यांबरोबर मी माझा गंधरसही गोळा केला आहे. मी मधाबरोबर आणि माझ्या मधाचे पोळे खात आहे. मी माझे द्राक्षारस आणि दूध प्यालो आहे. मित्र माझ्या मित्रांनो, खा आणि प्या; प्रीतीच्या आनंदाने भरून जा.

  4. म्हणून तुमच्या पूर्वेस असलेल्या लोकांना त्यांची मालमत्ता म्हणून तुम्हाला मी त्यांच्या स्वाधीन करेन. ते त्यांच्या छावण्या तुमच्यात उभारतील व त्यांचे तंबू तुमच्यात बांधतील; ते तुमची फळे खातील व तुमचे दूध पितील.

  5. स्वतःच्या खर्चाने कोणता सैनिक सेवा करतो? द्राक्षमळा लावतो, पण द्राक्ष खात नाही असा कोणी आहे का? मेंढराचा कळप पाळून दूध पिणार नाही असा कोणी आहे का?