मुख्य मजकुरावर जा

Meat Offerings बद्दल बायबलमधील वचने

49 वचने · 28 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याजकाचे प्रत्येक धान्यार्पण पूर्णपणे जाळून टाकले जाईल; ते खाऊ नये.”

  2. “दिव्याचे तेल, सुगंधी धूप, रोजचे अन्नार्पण व अभिषेकाचे तेल, संपूर्ण निवासमंडप आणि त्यातील सर्व साहित्य, त्याचे पवित्र साहित्य व उपकरणे यांची जबाबदारी अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारकडे असावी.”

  3. तर त्याने आपल्या पत्नीला याजकाकडे न्यावे. त्याने तिच्या वतीने सोबत एक एफाचा दहावा भाग जवाचे पीठ आणावे. त्याने त्यावर जैतुनाचे तेल ओतू नये किंवा त्यावर धूप ठेवू नये, कारण हे मत्सरासाठी केलेले अन्नार्पण आहे, अपराधाची आठवण देणारे स्मरणाचे अर्पण आहे.

  4. त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  5. त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  6. त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे. ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  7. आणि याहवेहसाठी सुवास म्हणून आपली खिल्लारे व गुरे यातून तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण कराल, मग ते होमार्पण किंवा यज्ञ असो, विशेष नवस असो किंवा स्वखुशीचे अर्पण किंवा सणाचे अर्पण असो.

  8. अर्पण आणणार्‍याने याहवेहसमोर एक पाव हीन जैतुनाच्या तेलात मळलेल्या बारीक सपिठाचा एका एफाचा दहावा भाग सादर करावा.

  9. होमार्पण किंवा यज्ञासाठी एका कोकराबरोबर, पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस तयार करावा.

  10. “ ‘मेंढ्याबरोबर एक एफाचे दोन भाग बारीक सपीठ, एकतृतीयांश हीन जैतुनाच्या तेलात मळून अन्नार्पण तयार करावे,

  11. आणि अन्नार्पण म्हणून एकतृतीयांश हीन द्राक्षारस, हे सर्व याहवेहला सुवास म्हणून अर्पण करावे.

  12. “ ‘जेव्हा तुम्ही होमार्पण किंवा यज्ञ म्हणून, याहवेहला विशेष नवस किंवा शांत्यर्पण म्हणून एक तरुण बैल तयार करता,

  13. बैलाबरोबर एफाचे तीन दशांश बारीक सपीठ, अर्धा हीन जैतुनाच्या तेलात मळलेले असे अन्नार्पण आणावे.

  14. आणि पेयार्पण म्हणून अर्धा हीन द्राक्षारस आणावा. हे याहवेहसाठी सुवासिक असे अन्नार्पण आहे.

  15. प्रत्येक बैल किंवा मेंढा, प्रत्येक कोकरू किंवा तरुण बोकड अशा प्रकारे तयार करावे.

  16. जितक्यांदा तुम्ही हे तयार करता, प्रत्येकासाठी असेच करावे.

  17. इस्राएली लोकांनी व लेवी यांनी धान्य, नवा द्राक्षारस, जैतुनाचे तेल, यांची अर्पणे कोठारात आणून ती सेवा करणारे याजक, द्वारपाल आणि संगीतकार यांच्या वापरासाठी असलेल्या पवित्र पात्रांमध्ये ठेवावीत. “अशा रीतीने आम्ही परमेश्वराच्या भवनाकडे दुर्लक्ष करणार नाही.”

  18. त्याने तोबीयाहाला एका कोठडी दिली. ही कोठडी पूर्वी धान्यार्पण, ऊद, मंदिराचे सामान, तसेच धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतुनाचे तेल यांच्या दशांशांचे साठे ठेवण्यासाठी वापरली जात असे. ही सर्व अर्पणे लेव्यांसाठी, संगीतकारांच्या सभासदांसाठी आणि द्वारपालांसाठी, त्याचबरोबर याजकांसाठी वर्गणी म्हणून असत.

  19. खडकांच्या कड्याखालील गुळगुळीत दगडाच्या मूर्ती ही तुझी दैवते आहेत; खरोखर, हाच तुझा भाग आहे. होय, त्यांनाच तू पेयार्पणे करते आणि अन्नार्पणे करते. हे सर्व बघून, मला पाझर फुटेल का?

  20. तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मंदिराच्या अंगणासमोर उत्तर व दक्षिणेच्या बाजूला असलेल्या खोल्या याजकांच्या खोल्या आहेत, तिथे जे याजक याहवेहसमोर जातात ते परमपवित्र अर्पणे; म्हणजेच धान्यार्पणे, पापार्पणे आणि दोषार्पणे खातील; कारण ते ठिकाण पवित्र आहे.

  21. देशातील सर्व लोकांनी ही विशेष अर्पणे इस्राएलच्या राजपुत्राला देणे आवश्यक आहे.

  22. याहवेहच्या मंदिरात वाहण्याची अन्नार्पणे व पेयार्पणे बंद झाली आहेत; याहवेहसमोर सेवा करणारे याजक विलाप करीत आहे.

  23. अहो याजकांनो, गोणपाट परिधान करा आणि शोक करा; वेदीची सेवा करणार्‍यांनो, विलाप करा. तुम्ही जी परमेश्वराची सेवा करता, या, गोणपाट परिधान करीत रात्र घालावा; कारण अन्नार्पणे व पेयार्पणे तुमच्या परमेश्वराच्या भवनात येणे बंद झाले आहेत.

  24. तुमची गोऱ्ह्यांची होमार्पणे व उपकारस्तुतीची अर्पणे आणली तरीही मी स्वीकारणार नाही. तुमच्या उत्तम शांत्यर्पणामुळे मी संतुष्ट होणार नाही.