Skip to content

Masters बद्दल बायबलमधील वचने

35 वचने · 26 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “धिक्कार असो, जो आपला महाल अधर्माने बांधतो, अन्यायाने माळे बांधतो, त्याच्या स्वतःच्या लोकांना बिनपगारी कामासाठी लावतो, आणि त्यांच्या परिश्रमाचा मोबदला त्यांना देत नाही.

  2. तिथे एका शताधिपतीचा सेवक, जो त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, तो आजारी असून मरावयास टेकला होता.

  3. त्या शताधिपतीने येशूंविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडिलांना येशूंकडे पाठवून, त्यांना आपण येऊन सेवकाला बरे करावे अशी विनंती केली.

  4. तो व त्याचे सारे कुटुंब धार्मिक व परमेश्वराला भिऊन वागणारे होते; तो उदारहस्ते गरजवंतांना दानधर्म करीत असे आणि परमेश्वराची नियमितपणे प्रार्थना करीत असे.

  5. आणि धन्यांनो, तुमच्या दासांशी तसेच वागा. त्यांना धमक्या देऊ नका. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमचा व त्यांचा दोघांचाही एकच धनी जे स्वर्गात असून त्यांच्याजवळ पक्षपात नाही.

  6. दासांनो, तुम्ही पृथ्वीवरील आपल्या धन्यांचे प्रत्येक गोष्टीत आज्ञापालन करा, केवळ त्यांची नजर तुमच्यावर असतानाच त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून नाही, तर सत्य मनाने प्रभूचे भय बाळगून करा.

  7. धन्यांनो, तुम्ही तुमच्या दासांना जे उचित व योग्य ते द्या; कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्हालासुद्धा स्वर्गात स्वामी आहे.

  8. परंतु येथून पुढे दास नव्हे, तर दासापेक्षा योग्य असा प्रिय बंधू व्हावे. तो मला अतिशय प्रिय आहे, परंतु व्यक्तिगत रीतीने आणि प्रभूमध्ये बंधू या दोन्हीही नात्याने तो तुला अधिक प्रिय आहे.

  9. पाहा! ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली, त्यांचे वेतन तुम्ही दिले नाही ते तुमच्याविरुद्ध आक्रोश करीत आहेत. कापणी करणार्‍यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानावर गेला आहे.

  10. दासांनो, आदराने परमेश्वराचे भय बाळगून तुम्ही स्वतःला तुमच्या धन्याच्या अधीन करा, फक्त जे चांगले आणि कृपाळू आहेत अशांच्याच नाही, तर जे कठोर आहेत अशा धन्यांच्यासुद्धा अधीन राहा.