Skip to content

Manna बद्दल बायबलमधील वचने

57 वचने · 44 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे लक्षात घ्या की याहवेहने तुम्हाला हा शब्बाथ दिलेला आहे; म्हणून सहाव्या दिवशी ते तुम्हाला दोन दिवसासाठी भाकर देतात. सातव्या दिवशी प्रत्येकाने ते जिथे आहेत तिथेच थांबावे; कोणीही बाहेर जाऊ नये.”

  2. म्हणून लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला.

  3. इस्राएली लोकांनी त्या भाकरीला मान्ना असे नाव दिले. ते धण्याच्या बीजाप्रमाणे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पापडीप्रमाणे होती.

  4. मोशे म्हणाला, “याहवेहने अशी आज्ञा दिली आहे: ‘एक ओमेर मान्ना घेऊन तो येणार्‍या पिढ्यांसाठी ठेवा, की तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणल्यावर रानामध्ये मी तुम्हाला खायला दिलेली भाकरी ते पाहू शकतील.’ ”

  5. मोशेने अहरोनाला सांगितले, “एक पात्र घे व त्यात एक ओमेर मान्ना घाल. मग तो पुढे येणार्‍या पिढ्यांसाठी याहवेहसमोर ठेव.”

  6. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे, अहरोनाने तो मान्ना कराराच्या पाट्यांबरोबर ठेवला, अशासाठी की तो राखून ठेवला जाईल.

  7. इस्राएली लोक स्थायिक असलेल्या भूमीवर येईपर्यंत, त्यांनी चाळीस वर्षे मान्ना खाल्ला; ते कनान देशाच्या सीमेवर पोहोचेपर्यंत त्यांनी मान्ना खाल्ला.

  8. नंतर त्यांच्याबरोबर असलेले निम्नस्तरातील मिश्र लोक अन्य भोजनाची लालसा धरू लागले आणि इस्राएली लोकही पुन्हा रडत म्हणू लागले, “आम्हाला खायला मांस असते तर किती बरे!

  9. इजिप्त देशात आम्ही फुकट मासे खाल्ले; आणि काकड्या, खरबुजे, कंदभाजी, कांदे आणि लसूण यांची सुद्धा आम्हाला आठवण येते.

  10. परंतु आता आमची भूक नाहीशी झाली आहे; कारण या मान्न्याशिवाय आम्हाला दुसरे काहीच दिसत नाही!”

  11. मान्ना आकाराने धण्यासारखा असून रंगाने मोत्यासारखा होता.

  12. लोक चोहीकडे जाऊन तो गोळा करीत असत आणि मग जात्यात दळीत किंवा उखळात कुटत असत. मग ते भांड्यात शिजवित किंवा त्याच्या भाकरी बनवित असत. त्याची चव जैतुनाच्या तेलात बनलेल्या भाकरीप्रमाणे असे.

  13. रात्री जेव्हा छावणीवर दहिवर जमा होत असे तेव्हा मान्ना सुद्धा पडत असे.

  14. प्रत्येक घराण्यातील लोक आपआपल्या तंबूच्या दाराशी उभे राहून रडत होते आणि याहवेहचा त्यांच्यावर अतिशय क्रोध आला होता त्यामुळे मोशे अस्वस्थ झाला.

  15. मोशेने याहवेहला विचारले, “तुमच्या सेवकावर हे कष्ट तुम्ही का आणले? तुम्ही असंतुष्ट व्हावे असे मी काय केले की तुम्ही या सर्व लोकांचे ओझे माझ्यावर लादावे?

  16. मी या सर्व लोकांचे गर्भधारण केले काय? त्यांना मी जन्म दिला काय? आई आपल्या तान्ह्या बाळाला घेते तसे मी यांना माझ्या उराशी घेऊन तुम्ही त्यांच्या पूर्वजांना शपथ घेऊन वचन दिलेल्या देशात मी घेऊन जावे असे तुम्ही मला का सांगता?

  17. या सर्व लोकांसाठी मी मांस कुठून आणावे? ते रडत माझ्याजवळ मागतात ‘आम्हाला खायला मांस दे!’

  18. मला एकट्याला या राष्ट्राला घेऊन जाता येत नाही! हे ओझे मला खूप जड आहे.

  19. तुम्ही मला असेच वागविणार असाल आणि तुमच्या दृष्टीत मी जर कृपा पावलो असलो तर मला मारून टाका. मी माझाच नाश पाहावा असे होऊ देऊ नये.”

  20. याहवेह मोशेला म्हणाले: “इस्राएली लोकांमधील सत्तर वडील ज्यांना तू पुढारी आणि अधिकारी म्हणून ओळखतो, त्यांना माझ्यासमोर आण. त्यांनी सभामंडपात यावे व तुझ्याबरोबर उभे राहावे.

  21. मी खाली येऊन तिथे तुझ्याशी बोलेन आणि जो आत्मा तुझ्यावर आहे, त्याचे काही सामर्थ्य मी घेऊन त्यांच्यावर ठेवेन. ते तुझ्याबरोबर लोकांचा भार वाहतील म्हणजे तुला एकट्याला तो वाहावा लागणार नाही.

  22. “लोकांना सांग: ‘उद्याच्या तयारीकरिता स्वतःला पवित्र करा, कारण उद्या त्यांना मांस खायला मिळेल. “आम्हाला मांस खायला मिळाले तर किती बरे! आम्ही इजिप्तमध्ये चांगले होतो!” हे तुमचे रडणे याहवेहने ऐकले आहे, आता याहवेह तुम्हाला मांस देणार आहेत आणि ते तुम्ही खाल.

  23. तुम्ही ते केवळ एक दिवस किंवा दोन दिवस, किंवा पाच दिवस, दहा, किंवा वीस दिवस,

  24. परंतु संपूर्ण एक महिना; ते तुमच्या नाकपुड्यातून बाहेर येईपर्यंत आणि ते तुम्हाला नकोसे वाटेपर्यंत ते तुम्ही खाल; कारण तुम्ही याहवेह जे तुमच्यामध्ये राहतात त्यांना नाकारले आहे, त्यांच्यासमोर रडत म्हणाला, “आम्ही इजिप्त का सोडले?” ’ ”

  25. येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, ज्यांनी तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली तो मोशे नव्हता, परंतु माझा पिता जो स्वर्गातील खरी भाकर तुम्हाला देत आहे.