Skip to content

Manna बद्दल बायबलमधील वचने

57 वचने · 44 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ही परमेश्वराची भाकर आहे, जी स्वर्गातून उतरली आहे आणि जगाला जीवन देते.”

  2. ते म्हणाले, “प्रभूजी, हीच भाकर आपण आम्हाला नेहमी द्या.”

  3. त्यावर येशू जाहीरपणे म्हणाले, “मीच जीवनाची भाकर आहे. जो मजकडे येतो त्याला पुन्हा कधीही भूक लागणार नाही आणि जो मजवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.

  4. मीच जीवनाची भाकर आहे.

  5. तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला, तरी ते मरण पावले.

  6. परंतु ही भाकर जी स्वर्गातून उतरलेली आहे, ती जे कोणी खातील ते मरणार नाही.

  7. मी ती स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जे कोणीही भाकर खातील, ते सदासर्वकाळ जगतील. ही भाकर माझे शरीर आहे, जी जगाच्या जीवनासाठी मी देणार आहे.”