Manna बद्दल बायबलमधील वचने: Two portions of, gathered the sixth day on account of the Sabbath
Two portions of, gathered the sixth day on account of the Sabbath बद्दल वचने
आठवड्याच्या सहाव्या दिवशी ते रोजच्यापेक्षा दुप्पट—प्रत्येकी दोन ओमेर अन्न गोळा करीत—आणि सर्व इस्राएली वडीलमंडळींनी येऊन मोशेला याबद्दल हवाला दिला.
मोशेने त्यांना सांगितले, “याहवेहची आज्ञा हीच आहे: ‘उद्या विसाव्याचा दिवस, याहवेहचा पवित्र शब्बाथ आहे. तर तुम्हाला जे काही शिजवायचे आहे ते शिजवा व जे उकळावयाचे असेल ते उकळून घ्या. जे उरेल ते सकाळपर्यंत ठेवा.’ ”
म्हणून त्यांनी मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे ते सकाळपर्यंत ठेवले तेव्हा त्याला ना दुर्गंधी आली ना त्यात किडे पडले.
मोशे म्हणाला, “आज हे खा, कारण आज याहवेहचा शब्बाथ आहे. म्हणून तुम्हाला आज त्यातील काही जमिनीवर मिळणार नाही.
सहा दिवस तुम्ही ते गोळा करावे, पण सातव्या दिवशी शब्बाथ आहे. या दिवशी ते मिळणार नाही.”