Skip to content

Ish-Bosheth बद्दल बायबलमधील वचने

21 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्या दरम्यान, शौलाचा सेनापती नेरचा पुत्र अबनेरने शौलाचा पुत्र इश-बोशेथला महनाईम येथे आणले.

  2. त्याने गिलआद, अशुरी, येज्रील आणि एफ्राईम, बिन्यामीन व सर्व इस्राएलवर त्याला राजा नेमले.

  3. शौलाचा पुत्र इश-बोशेथ इस्राएल देशाचा राजा झाला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता आणि त्याने दोन वर्षे राज्य केले. मात्र यहूदाहचे गोत्र दावीदाशी एकनिष्ठ राहिले.

  4. दावीद व शौल यांच्या घराण्यांमधील लढाईच्या काळात, अबनेर शौलाच्या घराण्यात आपले स्थान मजबूत करीत होता.

  5. रिजपाह नावाची शौलाची एक उपपत्नी होती, जी अय्याहची कन्या होती. इश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीबरोबर शरीरसंबंध का केला?”

  6. तेव्हा इश-बोशेथचे बोलणे ऐकल्याने अबनेर फार संतापला. त्याने उत्तर दिले, “मी यहूदीयाच्या कुत्र्याचे डोके आहे काय? आजही मी तुझा पिता शौल याच्या घराण्याशी आणि त्याच्या कुटुंबाशी आणि त्याच्या मित्रांशी एकनिष्ठ आहे. मी तुला दावीदाच्या हातून शासन केले नाही. तरीही या स्त्रीला मध्ये आणून माझ्यावर अपराधाचा आरोप करीत आहे!

  7. याहवेहने शपथ घेऊन दावीदाला जे म्हटले आहे त्याप्रमाणे मी जर केले नाही तर परमेश्वर अबनेराला तसे किंवा त्यापेक्षा अधिक शासन करोत.

  8. आणि शौलाच्या घराण्याकडून राज्य हस्तांतरीत करून इस्राएल आणि यहूदीयावर दानपासून बेअर-शेबापर्यंत दावीदाचे सिंहासन स्थापित केले नाही तर परमेश्वर अबनेरशी अधिक कठोरपणे वागो.”

  9. इश-बोशेथ अबनेरला आणखी एकही शब्द बोलण्यास धजला नाही, कारण तो अबनेरला घाबरत होता.

  10. नंतर अबनेरने आपल्या निरोप्यांना दावीदाकडे असे म्हणत पाठवले, “हा प्रदेश कोणाचा आहे? माझ्याबरोबर एक करार कर आणि मी सर्व इस्राएली लोकांना तुझ्याकडे आणण्यास मदत करेन.”

  11. नंतर दावीदाने शौलाचा पुत्र इश-बोशेथ याच्याकडे दूत पाठवून सांगितले, “माझी पत्नी मीखल मला दे, जिला मी शंभर पलिष्ट्यांच्या अग्रत्वचा किंमत देऊन वाग्दत्त करून घेतली.”

  12. तेव्हा इश-बोशेथने हुकूम करून मीखलला तिचा पती, लईशचा पुत्र पलतीएलपासून आणले.

  13. तरीही तिचा पती रडत तिच्यामागे बहूरीमपर्यंत गेला. तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “परत घरी जा!” तेव्हा तो परत गेला.

  14. आता बैरोथ येथील रिम्मोनचे पुत्र रेखाब आणि बाअनाह हे प्रवासाला निघाले आणि इश-बोशेथ मध्यानाच्या वेळी, दुपारची विश्रांती घेत होता, तेव्हा हे त्याच्या घरी आले.

  15. गहू घेत आहेत असे दाखवित ते घराच्या आतील भागात गेले आणि त्यांनी त्याच्या पोटावर वार केला. नंतर रेखाब आणि त्याचा भाऊ बाअनाह तिथून निसटून गेले.

  16. ते जेव्हा घरामध्ये गेले होते त्यावेळेस तो त्याच्या झोपण्याच्या खोलीत पलंगावर विश्रांती घेत होता. तेव्हा त्यांनी त्याच्यावर वार करून त्याला जिवे मारले, त्यांनी त्याचे डोके कापले व ते घेऊन रात्रभर अराबाहच्या मार्गाने प्रवास करीत गेले.

  17. त्यांनी इश-बोशेथचे डोके हेब्रोनात दावीदाकडे आणले आणि राजाला म्हणाले, “हे पाहा, तुमचा शत्रू शौल ज्याने तुम्हाला जिवे मारावयास पाहिले, त्याचा पुत्र इश-बोशेथ याचे शिर. आज याहवेहने माझ्या धनीराजाच्या विरुद्ध शौल आणि त्याच्या संतानाचा सूड घेतला आहे.”

  18. दावीदाने रिम्मोन बैरोथ याचे पुत्र रेखाब आणि बाअनाह यांना उत्तर दिले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले आहे, त्या याहवेहची शपथ,

  19. आपण चांगले वर्तमान आणले आहे हे समजून मला एका व्यक्तीने सांगितले, ‘शौल मेला आहे’ तेव्हा मी त्याला सिकलाग येथे धरून मारून टाकले. त्याने आणलेल्या वर्तमानासाठी त्याला मी हे प्रतिफळ दिले!

  20. तर आता दुष्ट पुरुषांनी एका निर्दोष व्यक्तीला त्याच्या घरात, त्याच्याच पलंगावर जिवे मारले आहे; मी किती विशेषकरून तुमच्या हातून त्याच्या रक्ताचा जाब घ्यावा आणि तुम्हाला या पृथ्वीतून नष्ट करावे!”

  21. तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांना आज्ञा दिली आणि त्यांनी त्यांना जिवे मारले. त्यांनी त्यांचे हात आणि पाय तोडून टाकले आणि त्यांची शरीरे हेब्रोन येथील तळ्याजवळ टांगली. परंतु त्यांनी इश-बोशेथचे डोके घेतले आणि ते हेब्रोन येथे अबनेरच्या कबरेत पुरले.