Skip to content

Ish-Bosheth बद्दल बायबलमधील वचने: Deserted by Abner

7 वचने · 6 पैलू

Deserted by Abner बद्दल वचने

  1. दावीद व शौल यांच्या घराण्यांमधील लढाईच्या काळात, अबनेर शौलाच्या घराण्यात आपले स्थान मजबूत करीत होता.

  2. रिजपाह नावाची शौलाची एक उपपत्नी होती, जी अय्याहची कन्या होती. इश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीबरोबर शरीरसंबंध का केला?”

  3. तेव्हा इश-बोशेथचे बोलणे ऐकल्याने अबनेर फार संतापला. त्याने उत्तर दिले, “मी यहूदीयाच्या कुत्र्याचे डोके आहे काय? आजही मी तुझा पिता शौल याच्या घराण्याशी आणि त्याच्या कुटुंबाशी आणि त्याच्या मित्रांशी एकनिष्ठ आहे. मी तुला दावीदाच्या हातून शासन केले नाही. तरीही या स्त्रीला मध्ये आणून माझ्यावर अपराधाचा आरोप करीत आहे!

  4. याहवेहने शपथ घेऊन दावीदाला जे म्हटले आहे त्याप्रमाणे मी जर केले नाही तर परमेश्वर अबनेराला तसे किंवा त्यापेक्षा अधिक शासन करोत.

  5. आणि शौलाच्या घराण्याकडून राज्य हस्तांतरीत करून इस्राएल आणि यहूदीयावर दानपासून बेअर-शेबापर्यंत दावीदाचे सिंहासन स्थापित केले नाही तर परमेश्वर अबनेरशी अधिक कठोरपणे वागो.”

  6. इश-बोशेथ अबनेरला आणखी एकही शब्द बोलण्यास धजला नाही, कारण तो अबनेरला घाबरत होता.

  7. नंतर अबनेरने आपल्या निरोप्यांना दावीदाकडे असे म्हणत पाठवले, “हा प्रदेश कोणाचा आहे? माझ्याबरोबर एक करार कर आणि मी सर्व इस्राएली लोकांना तुझ्याकडे आणण्यास मदत करेन.”