मुख्य मजकुरावर जा

Infidelity बद्दल बायबलमधील वचने

97 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून, जे यरुशलेमच्या लोकांवर राज्य करतात, त्या उपहास करणार्‍या अधिकार्‍यांनो, याहवेहचे वचन ऐका:

  2. तुम्ही बढाई मारता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाशी आम्ही करार केला आहे. जेव्हा दुःखदायक अरिष्टांचा फटकारा येतो, तो आम्हाला स्पर्श करू शकत नाही, कारण आम्ही खोट्या गोष्टींना आमचे आश्रयस्थान केले आहे आणि असत्यपणाच्या आड स्वतःला लपविले आहे.”

  3. मी न्यायाला मापनदोरी आणि नीतिमत्वाला ओळंबा असे करेन. गारांनी तुमचा खोटेपणा, तुमचे आश्रयस्थान झाडून काढला जाईल, आणि पाणी तुमच्या लपण्याच्या जागेवर भरून वाहील.

  4. मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द केला जाईल; अधोलोकाशी केलेला तुमचा करार टिकणार नाही. जेव्हा दुःखदायक अरिष्ट झाडून काढते, तेव्हा तुम्हाला त्याच्याकडून तुडविले जाईल.

  5. जितक्या वेळेस ते येईल तितक्या वेळेस ते तुम्हाला वाहवत घेऊन जाईल; रोज सकाळी, दिवसभर आणि रात्रभर, ते आरपार झाडत राहील.” हा संदेश समजून घेतल्याने अत्यंत भीती निर्माण होईल.

  6. तुमचे अंथरूण फारच आखूड आहे, तुमचे पांघरूण अगदी अरुंद आहे.

  7. त्यांचे कार्य करण्यासाठी, त्यांचे विक्षिप्त काम, आणि त्यांचे कठीण कार्य, होय, त्यांचे अद्भुत कार्य सिद्ध करण्यासाठी, जसे ते पेराझीम पर्वतावर राहिले होते, तसे याहवेह उभे राहतील, जसे गिबोनच्या खोऱ्यामध्ये केले होते, तसे स्वतःला उभारतील.

  8. आता तुमचे थट्टा करणे थांबवा, नाहीतर तुमच्या साखळ्या आणखीच जड होतील. प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, यांनी मला सांगितले आहे, संपूर्ण भूमीचा नाश करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे.

  9. धिक्कार असो, जे त्यांच्या योजना याहवेहपासून लपविण्यासाठी खूप खोलवर जातात, जे त्यांची कार्ये अंधारात करतात आणि असा विचार करतात, “आम्हाला कोण पाहतो? हे कोणाला माहीत होईल?”

  10. तुम्ही गोष्टी उलटवून टाकता, जणू कुंभार हा मातीसारखा असेल! ज्याला आकार दिला, तो आकार देणाऱ्याला असे म्हणेल का, “तू माझी रचना केली नाहीस?” मडके कुंभाराला म्हणू शकते का, “तुला काहीच माहीत नाही?”

  11. “जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो, त्याला धिक्कार असो. जो जमिनीवर पडलेल्या मडक्याच्या अनेक तुकड्यांमधील केवळ एक मडक्याच्या तुकडा आहे. माती कुंभाराला म्हणते काय, ‘हे तू काय घडवित आहेस?’ तुझी हस्तकृती तुला म्हणते काय, ‘कुंभाराला तर हातच नाहीत’?

  12. धिक्कार असो त्या मुलाला, जो त्याच्या पित्याला म्हणतो ‘तुम्ही कोणाला जन्म दिलात?’ किंवा त्याच्या आईला विचारतो, ‘तू कोणाला जन्मास घातले?’

  13. तू तुझ्या दुष्टाईवर भरवसा ठेवला ‘मला कोणी पाहत नाही,’ असे तू म्हणालीस. तुझ्या ज्ञानाने व शहाणपणाने तुला पथभ्रष्ट केले जेव्हा तू स्वतःला म्हणालीस, ‘मीच आहे आणि माझ्यासारखी दुसरी कोणी नाही.’

  14. तुझ्यावर आपत्ती कोसळेल आणि ती हातचलाखी करून कशी उलटावी हे तुला कळणार नाही. तुझ्यावर संकट कोसळेल खंडणी भरूनही त्याचे निवारण करता येणार नाही; जी येईल असे वाटले नाही अशी एक घोर विपत्ती अकस्मात तुझ्यावर येईल.

  15. तुम्ही कोणाची चेष्टा करता? कोणाकडे पाहून नाके मुरडता व आपल्या जिभा दाखविता? तुम्ही बंडखोरांची पिल्ले व लबाडांची संतती नाही काय?

  16. एला वृक्षाच्या झाडीत आणि प्रत्येक घनदाट वृक्षाच्या सावलीत तुम्ही कामांध होता; खोल दर्‍यात, खडकांच्या कड्याखाली नरबळी म्हणून आपल्या लेकरांचे बळी देता.

  17. खडकांच्या कड्याखालील गुळगुळीत दगडाच्या मूर्ती ही तुझी दैवते आहेत; खरोखर, हाच तुझा भाग आहे. होय, त्यांनाच तू पेयार्पणे करते आणि अन्नार्पणे करते. हे सर्व बघून, मला पाझर फुटेल का?

  18. डोंगरमाथ्यांवर व अत्यंत उच्चस्थानी तू आपला बिछाना बनविला आहेस; तिथे वर जाऊन तू तुझी अर्पणे वाहिली.

  19. बंद दरवाज्यामागे व उंबरठ्यावर तू तुझ्या अन्य दैवतांची चिन्हे लावली आहेस. माझा नकार करून, तू तुझा बिछाना उघडा केला आहेस, त्यावर तू झोपून तो आणखी जास्त उघडला आहेस; ज्यांचा बिछाना तुला प्रिय वाटतो, त्यांच्याशी तू समेट केला आहे, आणि त्यांच्या नग्न शरीराकडे तू कामातुर नजरेने बघते.

  20. मोलखाला तू जैतुनाचे तेल वाहिले व तुझी सुगंधी अत्तरे वाढवून अर्पण केलीस. तू तुझ्या दूतांना दूरवर पाठविले; अगदी प्रत्यक्ष मृतलोकांच्या राज्यापर्यंत गेलीस.

  21. हे सर्व करून तू स्वतःला थकवून टाकले, पण तू असे म्हटले नाही, ‘हे किती निराशाजनक आहे.’ स्वतःला नव्या बलाने संचारित केले, म्हणून तू मूर्छित झाली नाही.

  22. “इतकी दहशत व भीती तुला कोणाची वाटते कि तू माझ्याशी असत्याने वागते, तू माझे स्मरण केले नाही कि हे मनावरही घेतले नाही? मी बराच काळ निःशब्द राहिलो आहे म्हणून का तुला माझा धाक वाटत नाही?

  23. याहवेहने मला म्हटले, “इस्राएल व यहूदीयाच्या लोकांचे अपराध फारच घोर आहेत; देश रक्तपाताने व शहर अन्यायाने भरले आहे. ते म्हणतात, ‘याहवेहने देशाला सोडून टाकले आहे; आणि याहवेह पाहत नाही.’

  24. म्हणून मी त्यांना दयेने पाहणार नाही किंवा त्यांची गय करणार नाही, आणि त्यांनी जे काही केले आहे ते मी त्यांच्याच डोक्यावर आणणार आहे.”

  25. “राजा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागेल; सर्व दैवतांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे तो म्हणेल. तो देवाधिदेवाचीही निंदा करेल आणि त्याची महासंकटकाळाच्या शेवटपर्यंत भरभराट होईल. कारण जे ठरवून दिले आहे ते नक्कीच घडेल.