Skip to content

Infidelity बद्दल बायबलमधील वचने: General references

97 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला या रानात मरायला आणले काय? इजिप्तमधून आम्हास बाहेर आणून तू हे काय केले?

  2. आम्हाला असेच राहू दे; आम्हाला इजिप्त लोकांची सेवा करू दे, असे आम्ही तुला इजिप्तमध्ये असताना म्हणालो नव्हतो काय? या रानात मरण्याऐवजी इजिप्त लोकांची गुलामी करणे आम्हाला बरे होते!”

  3. “कुठपर्यंत हा दुष्ट समुदाय माझ्याविरुद्ध कुरकुर करीत राहणार? या कुरकुर करणाऱ्या इस्राएली लोकांच्या तक्रारी मी ऐकल्या आहे.

  4. म्हणून त्यांना सांगा, याहवेह म्हणतात, खचितच मी जिवंत आहे, जे काही तुम्ही बोलला आहात तेच मी तुम्हास करेन:

  5. याच रानात तुम्ही सर्व मरण पावाल—तुमच्यापैकी प्रत्येक जे वीस वर्षे व त्याहून अधिक वयाचे आहेत, ज्यांची जनगणनेमध्ये गणती झाली आणि ज्यांनी माझ्याविरुद्ध कुरकुर केली.

  6. ज्या देशाविषयी मी हात उंच करून म्हटले की त्यात मी तुम्हाला वसवेन, त्या देशात तुमच्यापैकी यफुन्नेहचा पुत्र कालेब आणि नूनाचा पुत्र यहोशुआ यांच्याशिवाय कोणीही जाणार नाही.

  7. ज्या तुमच्या लेकरांविषयी तुम्ही म्हणाला होता की, त्या देशात ते लूट असे होतील, त्यात मी त्यांना आणेन, अशासाठी की ज्या देशाचा तुम्ही धिक्कार केला त्याचा त्यांनी आनंद भोगावा.

  8. परंतु तुमच्याविषयी तर असे की, तुमचे देह याच रानात पडतील.

  9. तुमच्यापैकी अगदी शेवटचा देह या रानात पडेपर्यंत तुमची लेकरे तुमच्या अविश्वासूपणाचे परिणाम भोगत चाळीस वर्षे मेंढपाळ म्हणून राहतील.

  10. चाळीस दिवस तुम्ही देश हेरला त्याप्रमाणे प्रत्येक दिवसाला एक वर्ष अशी चाळीस वर्षे तुम्ही आपल्या पापाचे परिणाम भोगाल आणि माझ्या विरोधात जाणे कसे असते हे तुम्ही जाणाल.

  11. “ ‘परंतु जे कोणीही मुद्दाम पाप करतात, ते स्वदेशी असो किंवा परदेशी, ते याहवेहविषयी दुर्भाषण करतात, त्यांचे इस्राएली लोकांतून उच्छेदन करावे.

  12. कारण त्यांनी याहवेहच्या शब्दाला तुच्छ मानले आहे आणि याहवेहच्या आज्ञा मोडल्या आहेत, त्यांचे खचितच उच्छेदन करावे; त्यांचा दोष त्यांच्यावर राहील.’ ”

  13. जो कोणी अशी महत्त्वाची आणि गंभीर स्वरुपाची शपथ आपल्या कानांनी ऐकतो आणि स्वतःला आशीर्वाद देऊन म्हणतो, “माझ्या स्वतःच्याच इच्छेने मी चाललो तरी माझे काही बिघडणार नाही, मी सुरक्षित राहीन;” असे म्हणणारी माणसे सिंचित भूमी आणि कोरड्या भूमीवर नाश ओढवून घेतील.

  14. याहवेह अशा लोकांना क्षमा करण्यास कधीही तयार होणार नाहीत; त्यांचा कोप व क्रोधाग्नी त्यांच्याविरुद्ध भडकेल. या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप त्यांच्यावर कोसळतील आणि याहवेह त्यांचे नाव देखील या आकाशाच्या खालून नामशेष करून टाकतील.

  15. याहवेह या मनुष्याला सर्व इस्राएली गोत्रातून वेगळे काढतील आणि कराराच्या या नियमशास्त्राच्या ग्रंथात नमूद केलेले सर्व शाप त्याच्यावर कोसळतील.

  16. नंतर अलीशा वर बेथेलला गेला. तो रस्त्याने जात असताना, त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याकडे पाहून नगरातील काही मुले त्याची टिंगल करून त्याला “अरे टकल्या, चालता हो! अरे टकल्या, चालता हो!” असे म्हणून चिडवू लागली.

  17. तेव्हा तो वळला आणि त्याने याहवेहच्या नावाने त्या मुलांना शाप दिला. त्याबरोबर जंगलातून दोन अस्वली बाहेर आल्या आणि त्यांनी त्या मुलांपैकी बेचाळीस मुलांना फाडून टाकले.

  18. तर आता हिज्कीयाहने तुमची फसवणूक करू नये आणि तुमची अशाप्रकारे दिशाभूल करू नये. त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण कोणत्याही राष्ट्राचे किंवा राज्याचे कोणतेही दैवत त्याच्या लोकांना माझ्या हातातून किंवा माझ्या पूर्वीच्या लोकांच्या हातातून सोडवू शकले नाही. तुमचे दैवत तुम्हाला माझ्या हातून कसे सोडवेल!”

  19. सन्हेरीबचे अधिकारी परमेश्वर याहवेहविरुद्ध आणि त्यांचा सेवक हिज्कीयाहविरुद्ध पुढे बोलले.

  20. राजाने इस्राएलचे परमेश्वर याहवेहची थट्टा करणारी पत्रेही लिहिली आणि त्यांच्याविरुद्ध असे म्हटले: “जशी इतर देशातील लोकांच्या दैवतांनी त्यांच्या लोकांची माझ्या हातून सुटका केली नाही, त्याचप्रमाणे हिज्कीयाहचे दैवत त्याच्या लोकांना माझ्या हातातून सोडविणार नाही.”

  21. तेव्हा ते शहर जिंकण्यासाठी त्यांनी तटबंदीवर असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवून सोडण्यासाठी आणि त्यांना भीती वाटावी यासाठी यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडले.

  22. यरुशलेमच्या परमेश्वराविषयी ते बोलले, जसे जगातील इतर लोकांची दैवते—म्हणजे मनुष्याची हस्तकृती—त्यांच्याबद्दल त्यांनी तसेच केले होते.

  23. कारण परमेश्वराकडे तो आपली मूठ फिरवितो आणि सर्वसमर्थ्‍या विरुद्ध स्वतःची बढाई मिरवतो,

  24. त्यांच्या विरोधात अपमानाने जाड आणि मजबूत ढाल घेऊन तो दोष लावतो.

  25. तरी ते परमेश्वराला म्हणतात, ‘आमच्यापासून दूर जा! तुमचे मार्ग जाणून घेण्याची आमची इच्छा नाही.