Skip to content

False Prophets बद्दल बायबलमधील वचने

61 वचने · 33 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझा तिरस्कार करणार्‍या बंडखोरांना ते म्हणतात, ‘याहवेह म्हणतात: तुम्हाला शांतता लाभेल’ आणि जे स्वतःच्या मनाच्या हट्टीपणाने चालतात त्यांना ते म्हणतात, ‘तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.’

  2. परंतु त्यांचे वचन काय म्हणते हे बघण्यासाठी वा ऐकण्यासाठी, त्यांच्यापैकी कोण याहवेहच्या न्यायसभेत राहिला आहे, कोणी त्यांच्या वचनाकडे कान दिला आहे आणि ते ऐकले आहे?

  3. या संदेष्ट्यांना मी पाठविलेले नाही, तरीसुद्धा ते त्यांचा संदेश घेऊन धाव घेतात; मी त्यांच्याशी बोललो नाही, तरी ते संदेश देतात.

  4. हा प्रकार या खोट्या संदेष्ट्यांच्या अंतःकरणात किती काळ चालणार, जे त्यांच्या मनाच्या भ्रांतीने भविष्यवाणी करतात?

  5. त्यांचे पूर्वज बआल दैवताच्या उपासनेमुळे मला विसरले, तसे आपली खोटी स्वप्ने सांगितल्यास माझे लोक मला विसरून जातील असा ते विचार करतात.

  6. ज्या खोट्या संदेष्ट्यांना स्वप्ने पडतात, त्यांना ती स्वप्ने सांगू दे, परंतु ज्याला माझे वचन प्राप्त झाले आहे, त्याने ते विश्वासूपणे सांगावे. कोंड्याचा गव्हाशी काय संबंध आहे?” असे याहवेह जाहीर करतात.

  7. “जे आपले संदेश एकमेकांपासून माझ्यापासून चोरतात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे,” याहवेह जाहीर करतात.

  8. होय, याहवेह जाहीर करतात, हा संदेश याहवेहकडून आहे, असे जाहीर करून स्वतःच्या जिभा हेलकावितात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे.

  9. जे खोटी स्वप्ने सांगून भविष्यवाणी करतात, अशा संदेष्ट्यांच्या मी निश्चितच विरुद्ध उभा आहे, असे याहवेह जाहीर करतात. ते त्यांना वाचाळपणाने लबाडपणे सांगतात आणि माझ्या लोकांना पापाकडे नेतात. याहवेह म्हणतात, “मी त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना निवडले नाही. या लोकांच्या भल्यासाठी यांचा काहीही उपयोग नाही,” असे याहवेह जाहीर करतात.

  10. तुमचे संदेष्टे, दैवप्रश्न करणारे, स्वप्नांचा अर्थ सांगणारे, मांत्रिक व जादूटोणा करणारे म्हणतील, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही,’ पण त्यांचे ऐकू नका.

  11. याहवेह म्हणतात, ‘मी त्यांना पाठविलेले नाही, ते माझ्या नावाने खोटी भविष्यवाणी करतात. म्हणून मी तुमचा आणि या खोट्या संदेष्ट्यांचा नाश करण्यासाठी या देशातून तुम्हाला हाकलून देईन.’ ”

  12. मी याजकांशी व सर्व लोकांशी बोललो आणि त्यांना सांगितले, “याहवेह म्हणतात: ‘मंदिरातून नेलेली सुवर्णपात्रे लवकरच बाबेलमधून परत आणली जातील,’ असे सांगणार्‍या तुमच्या संदेष्ट्यांचे मुळीच ऐकू नका. ते तुम्हाला खोटे भविष्य सांगत आहेत.

  13. म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला पृथ्वीतलावरून काढून टाकणार आहे. याच वर्षी तुला मरण येईल, कारण तू याहवेहशी बंडखोरी करण्याचा संदेश दिला आहेस.’ ”

  14. यानंतर त्याच वर्षी, सातव्या महिन्यात संदेष्टा हनन्याह मरण पावला.

  15. “खास्द्यांमध्ये बंदिवासात असलेल्या सर्वांना हा संदेश पाठव: ‘नेहेलामी शमायाहविषयी याहवेह असे म्हणतात: कारण त्याला मी पाठविले नसतानाही त्याने तुम्हाला संदेश दिला, आणि त्याच्या खोट्या वचनावर विश्वास ठेवण्यास तुम्हाला विवश केले,

  16. याहवेह असे म्हणतात: मी नेहेलामी शमायाहला व त्याच्या वंशजांना निश्चितच शिक्षा करेन. त्याच्या लोकांपैकी कोणीही हयात राहणार नाही, माझ्या लोकांचे जे अभीष्ट मी करणार आहे, ते तो बघू शकणार नाही, असे याहवेह जाहीर करतात, कारण माझ्याविरुद्ध बंडखोरी करण्याचा त्याने संदेश दिला आहे.’ ”

  17. “मानवपुत्रा, इस्राएलचे संदेष्टे जे आता भविष्यवाणी करीत आहेत त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग. जे आपल्याच स्वतःच्या कल्पनेनुसार भविष्य करतात त्यांना सांग: ‘याहवेहचे वचन ऐका!

  18. हे इस्राएला, तुझे संदेष्टे ओसाड जागेतील कोल्ह्यांसारखे आहेत.

  19. “ ‘कारण जरी शांती नसली तरी ते माझ्या लोकांना, “शांती” असे म्हणत बहकवितात, कारण कच्ची भिंत बांधून ते त्यावर चुन्याचा लेप लावतात,

  20. “ ‘जर एखादा संदेष्टा भविष्य सांगण्यासाठी भुलविला गेला, तर त्याला मी याहवेहने भुलविले आहे आणि त्याच्याविरुद्ध मी माझा हात लांब करेन आणि माझ्या इस्राएली लोकांतून त्यांचा नाश करेन.

  21. त्यांना आपला दोष वाहून घ्यावा लागेल; त्या संदेष्टाकडून सल्ला घेणारा जितका दोषी असणार, संदेष्टा सुद्धा तितकाच दोषी असेल.

  22. तिच्यातील राजपुत्रांचा एक कट आहे, ते गर्जना करीत भक्ष फाडणार्‍या सिंहाप्रमाणे आहेत; ते लोकांना ग्रस्त करतात, ते खजिना व मोलवान वस्तू घेतात आणि त्यांच्यात पुष्कळांना विधवा बनवतात.

  23. त्यांचे संदेष्टे खोटे दर्शन व लबाड शकुनाद्वारे या सर्व कृत्यांवर चुन्याचा लेप फासतात आणि याहवेह बोलले नाही तरी ते म्हणतात, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’

  24. याहवेह असे म्हणतात: “माझ्या लोकांना चुकीच्या मार्गाने नेणारे संदेष्टे, त्यांना काही खायला मिळाल्यास ते ‘शांती’ ची घोषणा करतात. परंतु जो त्यांना खाण्याचे देण्यास नकार देतो त्याच्याशी युद्ध करण्यास सुसज्ज राहतात.

  25. तिचे पुढारी लाच घेऊन न्याय करतात, तिचे याजक किंमत घेऊन शिकवितात, व तिचे संदेष्टे पैशासाठी भविष्य सांगतात. तरीही ते याहवेहच्या मदतीसाठी आसुसलेले असतात आणि म्हणतात, “याहवेह आपल्यामध्ये नाहीत काय? आमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.”