Hananiah
Hananiah चा उल्लेख असलेली वचने
त्याच वर्षी, म्हणजे यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या कारकिर्दीच्या प्रारंभी म्हणजे चौथ्या वर्षातील पाचव्या महिन्यात, गिबोन येथील अज्जूरचा पुत्र हनन्याह नावाचा जो संदेष्टा होता, तो याजक व सर्व लोकांच्या समक्ष मला उद्देशून याहवेहच्या भवनात जाहीरपणे म्हणाला:
यावर याहवेहच्या मंदिरात उभे असलेले सर्व लोक आणि याजकांच्या समक्ष यिर्मयाह संदेष्टा हनन्याहला म्हणाला,
यावर संदेष्टा हनन्याह याने यिर्मयाहच्या मानेवरील जू घेतले व ते मोडले;
आणि तिथे जमलेल्या समुदायाला उद्देशून हनन्याह म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: याचप्रकारे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने सर्व राष्ट्रांच्या मानेवर ठेवलेले जोखड मी दोन वर्षात तोडून टाकेन.” हे ऐकताच यिर्मयाह संदेष्टा तिथून चालता झाला.
संदेष्टा हनन्याहने यिर्मयाहच्या मानेवरील जू मोडल्यानंतर याहवेहचे वचन यिर्मयाहला आले:
“जा आणि हनन्याहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात, तू लाकडी जोखड मोडलेस, पण त्याऐवजी तुझ्या मानेवर लोखंडाची जोखड येईल.
मग यिर्मयाह संदेष्टा हनन्याहला म्हणाला, “हनन्याह, ऐक! याहवेहने तुला पाठविलेले नाही, परंतु तू तुझ्या खोट्या संदेशावर विश्वास ठेवण्यास या राष्ट्रास विवश केले.
यानंतर त्याच वर्षी, सातव्या महिन्यात संदेष्टा हनन्याह मरण पावला.