Skip to content

Figurative Yoke बद्दल बायबलमधील वचने

14 वचने

प्रमुख बायबल वचने

  1. इजिप्तच्या लोकांचे तुम्ही गुलाम राहू नये म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्त देशामधून बाहेर आणले; तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. मी तुमच्या बेड्या तोडून टाकल्या आणि तुम्ही ताठ मानेने चालाल असे मी केले आहे.

  2. कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये, तुम्ही त्यांच्यावर ओझे असलेले जोखड, त्यांच्या खांद्यांवरील लोखंडाची सळई, त्यांच्यावर जुलूम करणाऱ्याची काठी मोडून टाकली आहे.

  3. त्या दिवशी त्यांचे ओझे तुमच्या खांद्यावरून, त्यांचे जू तुमच्या मानेवरून काढून घेतले जाईल. तुमच्या खांद्यावरून जू तुटले जाईल.

  4. “फार फार पूर्वी तुम्ही माझे जू झुगारून दिले व मी बांधलेले दावे तोडून टाकले; तुम्ही म्हटले, ‘आम्ही तुमची सेवा करणार नाही!’ अर्थात्, प्रत्येक उंच टेकडीवर, आणि प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली तुम्ही वेश्येप्रमाणे निजलात.

  5. मी त्यांच्या पुढार्‍यांकडे जाईन व त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना निश्चितच याहवेहचे मार्ग ठाऊक आहेत. त्यांना त्यांच्या परमेश्वराची अपेक्षा काय आहे हे ठाऊक आहे.” पण त्या सर्वांनी एकमताने माझे जू झिडकारून टाकले आहे. आणि माझी बंधने तोडून टाकली आहेत.

  6. “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर जाहीर करतात: ‘तुमच्या मानेवरील बाबेलच्या राजाचे जू मी काढून टाकेन.

  7. आणि यहोयाकीमचा पुत्र, यहूदीयाचा राजा यकोन्याह व खास्द्यांच्या देशात बंदिवासात पाठविलेले सर्व बंदी यांनाही मी परत आणेन. बाबेलच्या राजाचे जोखड मी तोडून टाकेन,’ असे याहवेह जाहीर करतात.”

  8. यावर संदेष्टा हनन्याह याने यिर्मयाहच्या मानेवरील जू घेतले व ते मोडले;

  9. “कारण सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘त्या दिवशी,’ मी त्यांच्या मानेवरचे जू मोडून टाकेन, त्यांच्या बेड्या तोडेन, आणि यापुढे परकीय लोक त्यांना गुलाम करणार नाहीत;

  10. माझी पापे गुलामगिरीचे जोखड बनली आहेत; त्यांच्या हातांनी ती एकत्र विणली गेली आहेत. ती माझ्या गळ्यात अडकविण्यात आली आहेत, आणि प्रभूने माझी शक्ती खचविली आहे. मी ज्यांचा सामना करू शकत नाही, त्यांच्या हाती मला दिले आहे.

  11. मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे त्याच्या हितासाठी आहे.

  12. माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल.

  13. कारण माझे जू हलके व माझे ओझे सहज पेलवणारे आहे.”

  14. तेव्हा आता, जे जू आपल्याला व आपल्या पूर्वजांना वाहवयास अशक्य होते, ते गैरयहूद्यांना वाहवयास लावून तुम्ही जणू परमेश्वराची परीक्षा पाहता काय?