मुख्य मजकुरावर जा

False Prophets बद्दल बायबलमधील वचने: Judgments denounced against

6 वचने · 33 पैलू

Judgments denounced against बद्दल वचने

  1. “ ‘याहवेह असे म्हणतात, यहूदीयाच्या राजांची आणि अधिपतींची हाडे, याजकांची हाडे व संदेष्ट्यांची हाडे व यरुशलेमच्या लोकांची हाडे त्यांच्या कबरांतून बाहेर काढली जातील.

  2. आणि ती हाडे चंद्र, सूर्य व तारे यांच्यापुढे पसरील. हीच माझ्या लोकांची दैवते आहेत. यांच्यावरच त्यांचे प्रेम होते, यांना ते अनुसरत होते, यांचा ते सल्ला घेत, यांचीच ते उपासना करीत असत. ही हाडे पुन्हा कोणी गोळा करणार नाहीत वा पुरणार नाहीत. जमिनीवर पडलेल्या शेणाप्रमाणे ती विखुरली जातील.

  3. म्हणून माझ्या नावाने भविष्यवाणी करणार्‍यांबद्दल याहवेह असे म्हणतात: “मी पाठविले नसतानाही ‘तलवार किंवा दुष्काळ या भूमीला स्पर्श करणार नाही,’ असे बोलणारे हे संदेष्टेच तलवारीला व दुष्काळाला बळी पडतील.

  4. म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला पृथ्वीतलावरून काढून टाकणार आहे. याच वर्षी तुला मरण येईल, कारण तू याहवेहशी बंडखोरी करण्याचा संदेश दिला आहेस.’ ”

  5. यानंतर त्याच वर्षी, सातव्या महिन्यात संदेष्टा हनन्याह मरण पावला.

  6. याहवेह असे म्हणतात: मी नेहेलामी शमायाहला व त्याच्या वंशजांना निश्चितच शिक्षा करेन. त्याच्या लोकांपैकी कोणीही हयात राहणार नाही, माझ्या लोकांचे जे अभीष्ट मी करणार आहे, ते तो बघू शकणार नाही, असे याहवेह जाहीर करतात, कारण माझ्याविरुद्ध बंडखोरी करण्याचा त्याने संदेश दिला आहे.’ ”