Skip to content

Doubting बद्दल बायबलमधील वचने: General references

31 वचने · 2 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तू अनेक जणांना कसे शिकवलेस, तू दुर्बल हात कशाप्रकारे सबळ केलेत याचा विचार कर.

  2. तुझ्या शब्दांनी अडखळलेल्यांना आधार दिला आहे; आणि लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेस.

  3. परंतु आता तुझ्यावर संकट आले आणि तू निराश झालास; तुझ्यावर आघात झाला आणि तू भयभीत झालास.

  4. तुझी भक्ती हा तुझा आत्मविश्वास नसावा काय आणि तुझे निर्दोष मार्ग तुझी आशा असू नयेत काय?

  5. मी धावा केला असता तर त्यांनी प्रतिसाद दिला असता; तरी ते माझे ऐकतीलच अशी मला खात्री नाही.

  6. वादळाने ते मला चेंगरून टाकतात आणि विनाकारण माझ्या जखमा वाढवतात.

  7. ते मला श्वास घेऊ देत नाहीत, परंतु मला क्लेशांनी त्रस्त करतात.

  8. जर बळाविषयी म्हटले तर, तेच बलवान आहेत! आणि जरी न्यायासंदर्भात म्हटले तर त्यांना कोण आव्हान देईल?

  9. मी जरी निर्दोष असलो, तरी माझे मुख माझा निषेध करेल; मी दोषरहित असतो, तरी माझे मुख मलाच दोषी ठरवेल.

  10. “मी जरी निर्दोष असलो, मला स्वतःबद्दल चिंता नाही; मी स्वतः माझे जीवन तुच्छ मानतो.

  11. हे सर्व समानच आहे म्हणून मी म्हणतो, ‘निर्दोषी आणि दोषी या दोघांचाही ते नाश करतात.’

  12. जेव्हा एखादी पीडा अचानक मरण आणते, निरपराध्यांच्या निराशेचा ते उपहास करतात.

  13. म्हणून त्यांच्या समक्षतेत मला भय वाटते; जेव्हा या सर्वांचा मी विचार करतो, तेव्हा मला त्यांचा दरारा वाटतो.

  14. परमेश्वराने माझे हृदय क्षीण केले आहे; सर्वसमर्थाने मला भीतीने जखडले आहे.

  15. निबिड अंधकार माझे मुख झाकून टाकतो, परंतु तो मला गप्प करू शकला नाही.

  16. “हे परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारतो, पण तुम्ही मला उत्तर देत नाहीत; मी उभा राहतो, पण तुम्ही केवळ माझ्याकडे नजर टाकता.

  17. तुम्ही माझ्याविषयी निष्ठुर झाला आहात; आणि आपल्या हाताच्या बळाने माझ्यावर वार करता.

  18. हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? आतल्याआत का तू तळमळत आहेस? परमेश्वराची आशा धर. मी अजूनही माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती पुनः करेन.

  19. माझ्या परमेश्वरा, माझा जीव माझ्याठायी उदास झाला आहे; तेव्हा मी यार्देन प्रदेशातून आणि हर्मोनाच्या शिखरावरून, मिसहार पर्वतावरून तुमचे स्मरण करणार.

  20. माझे हृदय शुद्ध ठेऊन मला काय लाभ झाला आणि मी माझे हात व्यर्थच निर्दोष ठेवले.

  21. दिवसभर मी छळ सहन करीत आहे आणि दररोज सकाळी नवीन शिक्षा दिली जात आहे.

  22. जर हे उद्गार माझ्या मुखातून बाहेर पडले असते, तर मी तुमच्या प्रजेचा विश्वासघात करणारा ठरलो असतो.

  23. ही गोष्ट समजण्यासाठी मी विचार करू लागलो, तेव्हा त्याचे आकलन मला अत्यंत कठीण वाटू लागले.

  24. मग शेवटी मी परमेश्वराच्या पवित्रस्थानात गेलो, तेव्हा दुष्टांचा शेवट काय होतो हे मला कळून आले.

  25. “प्रभू कायमचाच आमचा त्याग करतील काय? ते पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाहीत काय?