मुख्य मजकुरावर जा

Courts of Justice बद्दल बायबलमधील वचने

68 वचने · 64 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. काही काळापूर्वी थुदास नावाचा मनुष्य पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला, त्याला सुमारे चारशे अनुयायी मिळाले. त्याचा वध करण्यात येऊन सर्व अनुयायांची पांगापांग झाली व सर्वकाही नष्ट झाले.

  2. त्याच्यानंतर शिरगणतीच्या वेळी, गालीलकर यहूदाह पुढे आला आणि त्याने एका टोळीस बंडास प्रवृत्त केले. परंतु तो सुद्धा मारला गेला आणि त्याच्या अनुयायांचीही पांगापांग झाली.

  3. म्हणून मी तुम्हाला या सद्य परिस्थितीत असा सल्ला देत आहे की या माणसांना सोडून द्या. त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत किंवा कार्य मनुष्यांचे असेल, तर ते नष्ट होईल.

  4. परंतु जर हे परमेश्वराचे असेल, तर तुम्ही या माणसांना थांबविण्यास समर्थ होणार नाही आणि तुम्ही केवळ परमेश्वराविरुद्ध लढत आहात, असे तुम्हाला आढळून येईल.”

  5. त्याच्या भाषणामुळे त्यांचे मन वळाले; त्यांनी प्रेषितांना आत बोलावून फटके मारविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा कधीही बोलू नका, अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले.

  6. आपल्याला जे धन मिळत होते ते आता मिळणार नाही असे पाहून तिच्या धन्यांनी, पौल व सीलाला पकडून अधिकार्‍यांना तोंड देण्याकरिता बाजारपेठेत ओढत नेले.

  7. त्यांनी त्यांना न्यायाधीशापुढे आणले व ते म्हणाले, “ही यहूदी माणसे आमच्या शहरात गोंधळ माजवीत आहेत

  8. आम्ही रोमी लोकांनी जे नियम स्वीकारणे व आचरणे योग्य नाहीत, अशा नियमांची ते वकिली करत आहेत.”

  9. जेव्हा ते पौलाला फटके मारण्यासाठी बांधत होते त्यावेळेस पौल तिथे उभा असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्या मनुष्यावर दोषारोप अजून सिद्ध झालेला नाही, अशा रोमी नागरिकाला फटके मारणे हे कायद्याने योग्य आहे का?”

  10. ते ऐकल्याबरोबर तो अधिकारी शताधिपती सेनापतीकडे गेला व म्हणाला, “आपण काय करत आहात? हा मनुष्य तर रोमी नागरिक आहे.”

  11. तेव्हा तो सेनापती पौलाकडे गेला आणि त्याने त्याला विचारले, “मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?” त्याने उत्तर दिले. “होय, मी आहे.”

  12. त्यावर तो सेनापती बोलला, “मला नागरिकत्व मिळण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागले.” “परंतु मी जन्मतःच रोमी नागरिक आहे,” पौलाने उत्तर दिले.

  13. यामुळे जे त्याला प्रश्न विचारून त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ निघून गेले. सेनापतीला जेव्हा समजले की, पौल एक रोमी नागरिक आहे आणि त्याचा आरोप सिद्ध होण्यापूर्वी त्याला साखळदंडानी बांधले गेले होते, तो फार घाबरून गेला.

  14. प्रत्येकाने प्रशासकीय अधिकार्‍यांच्या अधीन असावे, कारण परमेश्वराने जो नेमून दिला नाही, असा अधिकारच नाही. जे अधिकारी आहेत, ते स्वतः परमेश्वराने नेमलेले आहेत.

  15. यास्तव, जो अधिकारी व्यवस्थेविरुद्ध बंड करतो, तो परमेश्वराने स्थापित केलेल्या व्यवस्थेविरुद्ध बंड करीत असतो आणि जे असे करतात, ते स्वतःवर दंड ओढवून घेतील.

  16. जे योग्य गोष्टी करतात, त्यांना राज्यकर्त्यांची भीती वाटत नाही, परंतु जे अयोग्य करतात त्यांनाच त्याची भीती वाटते. जे अधिकारी आहेत त्यांच्या भयापासून मुक्त असावे, अशी तुमची इच्छा आहे काय? तर मग योग्य तेच करा, म्हणजे तो तुमची प्रशंसा करेल.

  17. कारण तुमचे हित करण्यासाठी तो परमेश्वराचा नेमलेला सेवक आहे. परंतु तुम्ही अयोग्य केले, तर त्याची भीती बाळगा, कारण तो तलवार व्यर्थ धारण करीत नाही. अयोग्य करणार्‍याला शासन करण्यासाठी तो परमेश्वराचा सेवक, न्यायनीतीचा कारभारी आहे.

  18. यास्तव केवळ संभवनीय दंडाकरिताच नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळे अधिकार्‍यांच्या अधीन राहणे आवश्यक आहे.