Courts of Justice बद्दल बायबलमधील वचने: Conferred together before giving judgment
Conferred together before giving judgment बद्दल वचने
परंतु गमालियेल नावाचा एक परूशी, जो शास्त्राध्यापक व सर्व लोकांमध्ये सन्मान्य मानलेला, न्यायसभेपुढे उभा राहिला आणि त्याने या माणसांना थोडा वेळ बाहेर न्यावे, अशी आज्ञा केली.
मग तो न्यायसभेला उद्देशून म्हणाला, “अहो इस्राएली लोकहो, या मनुष्यांच्या बाबतीत काही करण्याच्या तुमच्या उद्देशाचा काळजीपूर्वक विचार करा.
काही काळापूर्वी थुदास नावाचा मनुष्य पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला, त्याला सुमारे चारशे अनुयायी मिळाले. त्याचा वध करण्यात येऊन सर्व अनुयायांची पांगापांग झाली व सर्वकाही नष्ट झाले.
त्याच्यानंतर शिरगणतीच्या वेळी, गालीलकर यहूदाह पुढे आला आणि त्याने एका टोळीस बंडास प्रवृत्त केले. परंतु तो सुद्धा मारला गेला आणि त्याच्या अनुयायांचीही पांगापांग झाली.
म्हणून मी तुम्हाला या सद्य परिस्थितीत असा सल्ला देत आहे की या माणसांना सोडून द्या. त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत किंवा कार्य मनुष्यांचे असेल, तर ते नष्ट होईल.
परंतु जर हे परमेश्वराचे असेल, तर तुम्ही या माणसांना थांबविण्यास समर्थ होणार नाही आणि तुम्ही केवळ परमेश्वराविरुद्ध लढत आहात, असे तुम्हाला आढळून येईल.”
त्याच्या भाषणामुळे त्यांचे मन वळाले; त्यांनी प्रेषितांना आत बोलावून फटके मारविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा कधीही बोलू नका, अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले.