मुख्य मजकुरावर जा

Courts of Justice बद्दल बायबलमधील वचने: Judges of, appointed by the governor

7 वचने · 64 पैलू

"Courts of Justice" साठी शोधा

Judges of, appointed by the governor बद्दल वचने

  1. त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते, “माझ्या शक्तीपलीकडे असलेले मी एकट्यानेच वाहून नेणारे तुमचे मोठे ओझे माझ्यावर पडले आहे.

  2. कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमची संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे अगणित केली आहे,

  3. याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी जे तुम्हाला अभिवचन दिले होते, त्यानुसार तुमची संख्या हजारपटीने वाढवो आणि तुम्हाला आशीर्वाद देवो!

  4. तुमच्या समस्या, तुमचे ओझे व तुमची भांडणे माझ्यासारखा एकटा मनुष्य कसा सोडवू शकेल?

  5. तेव्हा तुम्हीच प्रत्येक गोत्रांमधून सुज्ञ, समजूतदार व प्रतिष्ठित अशी काही माणसे निवडा, म्हणजे मी त्यांना तुमचे पुढारी नेमीन.”

  6. तुम्ही मला उत्तर देऊन म्हणाला, “तुम्ही जे करण्याचा प्रस्ताव दिला ते उत्तम आहे.”

  7. म्हणून मी तुमच्या प्रत्येक गोत्रांतून प्रमुख, ज्ञानी आणि आदरणीय पुरुष घेतले आणि त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले.