मुख्य मजकुरावर जा

Courts of Justice बद्दल बायबलमधील वचने: Probably derived from the seventy elders appointed by Moses

7 वचने · 64 पैलू

"Courts of Justice" साठी शोधा

Probably derived from the seventy elders appointed by Moses बद्दल वचने

  1. मग मोशे निवासमंडपातून बाहेर आला आणि याहवेह जे काही बोलले ते त्याने लोकांना सांगितले. आणि त्याने सत्तर वडिलांना एकत्र करून तंबूच्या सभोवती उभे केले.

  2. मग याहवेह मेघातून खाली उतरले व मोशेशी बोलले आणि याहवेहने मोशेवर असलेल्या आत्म्याचे काही सामर्थ्य घेऊन त्या सत्तर वडिलांवर ठेवले. ज्यावेळी आत्मा त्यांच्यावर स्थिर झाला, त्यावेळी त्यांनी भविष्यवाणी केली—परंतु पुन्हा असे केले नाही.

  3. पण दोघे पुरुष ज्यांची नावे एलदाद व मेदाद छावणीतच राहिले होते. वडिलांच्या यादीत त्यांची नावे होती, परंतु ते बाहेर तंबूकडे गेले नाही. तरी त्यांच्यावरही आत्मा उतरला आणि त्यांनी छावणीतच भविष्यवाणी केली.

  4. एका तरुण पुरुषाने धावत जाऊन मोशेला सांगितले, “एलदाद व मेदाद छावणीत भविष्यवाणी करीत आहेत.”

  5. नूनाचा पुत्र यहोशुआ, जो तारुण्यापासून मोशेचा मदतनीस होता, तो म्हणाला, “मोशे, माझ्या स्वामी, त्यांना थांबवा!”

  6. पण मोशे म्हणाला, “माझ्यासाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? माझी तर इच्छा आहे की, याहवेहचे सर्व लोक संदेष्टे असावेत आणि याहवेहने सर्व लोकांवर आपला आत्मा ठेवावा!”

  7. नंतर मोशे व इस्राएलांचे वडीलजन छावणीकडे परतले.