मुख्य मजकुरावर जा

Abel-Beth-Maachah बद्दल बायबलमधील वचने: Sheba slain in

9 वचने · 3 पैलू

Sheba slain in बद्दल वचने

  1. शबा इस्राएलच्या सर्व गोत्रांमधून आबेल बेथ-माकाहपर्यंत व बेर्‍याच्या प्रदेशातून गेला आणि ते एकत्र येऊन त्याच्यामागे गेले.

  2. योआबाबरोबरच्या सर्व सैन्याने येऊन शबाला आबेल-बेथ-माकाह येथे वेढा दिला. त्यांनी शहरापर्यंत जोडणार्‍या उतरणीपर्यंत मोर्चा लावला आणि तो बाहेरील तटबंदीच्या समोर होता. तट पाडण्यासाठी ते त्यावर वार करीत होते,

  3. नगरातून एका शहाण्या स्त्रीने आवाज दिला, “ऐका! ऐका! योआबाला इकडे येण्यास सांगा म्हणजे मी त्याच्याशी बोलेन.”

  4. तेव्हा तो तिच्याकडे गेला, आणि तिने विचारले, “तू योआब आहेस काय?” तो उत्तरला, “होय, मीच आहे.” ती म्हणाली, “तुझ्या दासीला जे सांगायचे आहे ते ऐक.” “मी ऐकत आहे,” तो म्हणाला.

  5. ती पुढे म्हणाली, “प्राचीन काळी असे म्हटले जात असे की, ‘आबेलातून सल्ला घ्यावा,’ आणि समस्या पूर्णपणे सोडविली जात असे.

  6. आम्ही शांतताप्रिय आणि इस्राएलचे विश्वासू लोक आहोत. तुम्ही इस्राएलातील मातृनगराचा नाश करण्याचा प्रयत्न का करीत आहात? याहवेहच्या वतनाचा तुम्ही का नाश करावा?”

  7. यावर योआबाने उत्तर दिले, “मी त्याचा नाश किंवा त्याचा विध्वंस करावा हे माझ्यापासून अगदी दूर असो.

  8. पण तसे काही नाही. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील एक मनुष्य, जो बिकरीचा पुत्र शबा याने दावीद राजाविरुद्ध आपला हात उगारला आहे. हा मनुष्य माझ्या स्वाधीन कर, म्हणजे मी शहर सोडून जाईन.” ती स्त्री योआबाला म्हणाली, “त्याचे शिर तुझ्याकडे तटावरून टाकले जाईल.”

  9. ती स्त्री आपल्या शहाणपणाचा हा सल्ला घेऊन सर्व लोकांकडे गेली आणि त्यांनी बिकरीचा पुत्र शबा याचे शिर कापून योआबाकडे फेकून दिले. तेव्हा योआबाने रणशिंग फुंकले आणि त्याचे लोक शहर सोडून आपआपल्या घरी निघून गेले. आणि योआब यरुशलेमास राजाकडे परत गेला.