- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- लेवीय २६:२४सुमारे इ.स.पू. १४९१
तर मी तुमच्याविरुद्ध होईन आणि तुमच्या पापाबद्दल सात वेळा तुम्हाला ताडण करेन.
- लेवीय २६:२५सुमारे इ.स.पू. १४९१
माझा करार मोडल्याबद्दल तुमच्यावर तलवार आणेन. तुम्ही आपआपल्या शहरांत एकत्र व्हाल, तेव्हा तिथे मी तुमच्यामध्ये प्राणघातक रोग पाठवेन आणि तुम्हाला तुमच्या शत्रूच्या हाती देण्यात येईल.
- लेवीय २६:२६सुमारे इ.स.पू. १४९१
मी तुमच्या भाकरीचा पुरवठा बंद करेन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर भाकर भाजू शकतील आणि त्या भाकरीचे वजन करून देतील. तुम्ही खाल परंतु तृप्त होणार नाहीत.
- लेवीय २६:२७सुमारे इ.स.पू. १४९१
“ ‘एवढे सर्व करूनही तुम्ही माझे ऐकणार नाही आणि माझ्याविरुद्ध वागाल,
- लेवीय २६:२८सुमारे इ.स.पू. १४९१
तर मी क्रोधायमान होऊन तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पातकांबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करेन.
- लेवीय २६:२९सुमारे इ.स.पू. १४९१
तुम्ही तुमच्या पुत्रांचे व तुमच्या कन्यांचे मांस खाल.
- लेवीय २६:३०सुमारे इ.स.पू. १४९१
तुमच्या उच्च स्थानांचा मी नाश करेन; तुमच्या धूपवेद्या मी मोडून टाकीन; तुमची प्रेते कुजण्यासाठी मी ती मूर्तीच्या समवेतच राहू देईन आणि मी तुमचा तिरस्कार करेन.
- लेवीय २६:३१सुमारे इ.स.पू. १४९१
तसेच मी तुमची शहरे उजाड करेन, तुमची पवित्रस्थाने ओसाड करेन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा सुवास घेणार नाही.
- लेवीय २६:३२सुमारे इ.स.पू. १४९१
मी देश ओसाड करेन, म्हणजे तुमचे शत्रू जे त्यात राहतील ते त्यामुळे गांगरून जातील.
- लेवीय २६:३३सुमारे इ.स.पू. १४९१
मी तुमची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि मी माझी तलवार उगारून तुमच्या पाठीस लागेन. तुमचा देश उजाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल.
- लेवीय २६:३४सुमारे इ.स.पू. १४९१
जेव्हा तुम्ही शत्रूंच्या देशात असाल, तुमचा देश उजाड होईल; तेव्हा भूमीला विश्रांती मिळेल व भूमी तिच्या शब्बाथ वर्षांचा संपूर्ण वेळ आनंद करेल.
- लेवीय २६:३५सुमारे इ.स.पू. १४९१
अनेक वर्षे ती उजाड होती, तुम्ही तिथे राहत असताना शब्बाथाच्या काळामध्ये तिला विश्रांती मिळाली नाही म्हणून ती आता विश्रांती घेईल.
- लेवीय २६:३६सुमारे इ.स.पू. १४९१
“ ‘तुमच्यातील जे उर्वरित राहतील, त्यांच्या शत्रूंच्या देशात मी त्यांची अंतःकरणे इतकी भयभीत करेन, की वार्याने उडून जाणार्या पानांचा आवाजसुद्धा त्यांना असा पळ काढावयास लावील की जणू एखादा तलवार घेऊन त्यांच्या पाठीशी लागला आहे आणि कोणीही त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते पडतील.
- लेवीय २६:३७सुमारे इ.स.पू. १४९१
कोणी पाठलाग करीत नसतानाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेकांवर पडतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंसमोर उभे राहू शकणार नाही.
- लेवीय २६:३८सुमारे इ.स.पू. १४९१
तुम्ही राष्ट्रांत पांगून नाश पावाल; तुमच्या शत्रूंचा देश तुम्हाला गिळून टाकील.
- लेवीय २६:३९सुमारे इ.स.पू. १४९१
तुमच्यापैकी जे शिल्लक राहतील ते तुमच्या शत्रूंच्या देशात त्यांच्या पापांमुळे नष्ट होतील; आणि ते त्यांच्या पूर्वजांच्या पापांमुळे नष्ट होतील.
- लेवीय २६:४०सुमारे इ.स.पू. १४९१
“ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील,
- लेवीय २६:४१सुमारे इ.स.पू. १४९१
ज्यामुळे मी त्यांचा शत्रू झालो व त्यांना शत्रूच्या भूमीत घेऊन गेलो—नंतर जेव्हा त्यांची सुंता न झालेली हट्टी अंतःकरणे नम्र होतील आणि त्यांच्या पापाची शिक्षा ते भोगतील,
- लेवीय २६:४२सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याबरोबर केलेल्या कराराचे स्मरण करेन आणि त्या भूमीचे स्मरण करेन.
- लेवीय २६:४३सुमारे इ.स.पू. १४९१
कारण ती भूमी ओसाड पडल्यामुळेच शब्बाथांचा आनंद उपभोगू शकत आहे. ते त्यांच्या पापांची परतफेड करतील कारण त्यांनी माझे नियम नाकारले आणि माझ्या विधींचा तिरस्कार केला.
- लेवीय २६:४४सुमारे इ.स.पू. १४९१
त्यांनी इतके केले असतानाही जेव्हा ते शत्रूंच्या देशात असतील, मी त्यांचा नकार करणार नाही किंवा नाश करणार नाही किंवा त्यांच्याशी केलेला करार मोडणार नाही. कारण मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.
- लेवीय २६:४५सुमारे इ.स.पू. १४९१
परंतु त्यांचा परमेश्वर होण्याचा, त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार मी आठवेन. सर्व राष्ट्रे पाहत असताना मी त्यांच्या वाडवडिलांना इजिप्त देशाबाहेर घेऊन आलो होतो. मी याहवेह आहे.’ ”
- लेवीय २६:४६सुमारे इ.स.पू. १४९१
हे ते नियम, विधी व सूचना आहेत, ज्या याहवेहने आपल्यात व इस्राएली लोकांमध्ये मोशेद्वारे सीनाय पर्वतावर स्थापित केल्या.
- लेवीय २७:१सुमारे इ.स.पू. १४९१
याहवेह मोशेला म्हणाले,
- लेवीय २७:२सुमारे इ.स.पू. १४९१
“इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा एखादा मनुष्य याहवेहला समर्पणाचे विशेष नवस करेल, तेव्हा त्या व्यक्तीचे मूल्य पुढीलप्रमाणे ठरवावे.