मुख्य मजकुरावर जा

Lachish

22 verses

31.5600, 34.8400 गूगल नकाशावर पाहा

Lachish चा उल्लेख असलेली वचने

  1. म्हणून यरुशलेमचा राजा अदोनी-सेदेकाने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथचा राजा पिराम, लाखीशचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीरकडे आपले निवेदन पाठवले.

  2. तेव्हा अमोर्‍यांचे पाच राजे—यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश व एग्लोन या नगरांचे राजे एकत्र आले व आपले सैन्य एकजूट करून गिबोन विरुद्ध त्यांनी आपले स्थान घेतले व त्यांच्यावर हल्ला केला.

  3. मग त्या गुहेतून पाच राजे—यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश आणि एग्लोन या नगरांच्या राजांना बाहेर काढण्यात आले.

  4. मग यहोशुआसह संपूर्ण इस्राएल लिब्नाहहून लाखीशला गेले; ते त्या शहराशी युद्ध करण्यासाठी सज्ज झाले व त्यांच्यावर हल्ला केला.

  5. याहवेहने लाखीश शहर इस्राएलच्या हाती दिले आणि यहोशुआने दुसर्‍या दिवशी त्यांच्यावर ताबा मिळविला. लिब्नाहचा केला तसाच लाखीश शहर व त्यात असलेल्या सर्वांचा त्यांनी तलवारीने नाश केला.

  6. लाखीशवर हल्ला होत असताना, गेजेरचा राजा होराम लाखीश शहरास मदत करण्यास आला. परंतु यहोशुआने त्याचा व त्याच्या सैनिकांचा पराजय केला; त्यांच्यातील एकही जण वाचला नाही.

  7. मग यहोशुआ व त्याच्यासह संपूर्ण इस्राएलने लाखीश सोडल्यावर ते एग्लोनला आले; त्यांनी त्यांच्यावर हल्ल्याची तयारी केली व त्यांच्याशी लढले.

  8. त्यांनी ते शहर त्याच दिवशी हस्तगत केले आणि तेथील प्रत्येकाचा लाखीश येथे केल्याप्रमाणे तलवारीने नाश केला. एकही व्यक्ती जिवंत राहिली नाही.

  9. यर्मूथचा राजा-एक, लाखीशचा राजा-एक,

  10. लाखीश, बसकाथ, एग्लोन,

  11. त्यांनी यरुशलेममध्ये त्याच्याविरुद्ध कट रचला आणि तो लाखीशकडे पळून गेला, परंतु त्यांनी त्याच्यामागे लाखीशकडे माणसे पाठवून दिली आणि त्याला तिथे मारले.

  12. म्हणून यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने लाखीश येथे अश्शूरच्या राजाला हा संदेश पाठविला: “माझ्याकडून चूक झाली आहे. माझ्यापासून परत जा, आणि तुम्ही जी काही खंडणी मागाल ती मी देईल.” अश्शूरच्या राजाने तडजोडीसाठी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहकडून चांदीचे तीनशे तालांत आणि सोन्याचे तीस तालांत यांची मागणी केली.

  13. अश्शूरच्या राजाने आपला सेनाप्रमुख, त्याचा प्रमुख अधिकारी आणि त्याचा सरसेनापतीसह मोठ्या सैन्यास लाखीशहून यरुशलेमला हिज्कीयाह राजाकडे पाठविले. ते यरुशलेमजवळ आले आणि वरच्या हौदाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या मार्गात उभे राहिले.

  14. जेव्हा सेनाप्रमुखाने ऐकले की अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले आहे, तेव्हा त्याने आपला तळ उठविला आणि राजा लिब्नाह येथे युद्ध करताना त्याला आढळला.

  15. अदोराईम, लाखीश, अजेकाह,

  16. अमस्याह याहवेहचे अनुसरण करण्यापासून दूर गेला, तेव्हापासून त्यांनी यरुशलेममध्ये त्याच्याविरुद्ध कट रचला आणि तो लाखीशकडे पळून गेला, परंतु त्यांनी त्याच्यामागे लाखीशकडे माणसे पाठवून दिली आणि त्याला तिथे मारले.

  17. नंतर, जेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याच्या सर्व सैन्याने लाखीशला वेढा घातला, तेव्हा त्याने यहूदीयाचा राजा हिज्कीयाह राजा आणि यहूदीयाच्या सर्व लोकांसाठी हा संदेश त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर देऊन त्यांना यरुशलेमकडे पाठवले:

  18. जानोह, अदुल्लाम, आणि त्यांच्या आसपासची गावे, लाखीश व त्यांची जवळपासची शेते; अजेकाह, त्यांची गावे; लोकांनी बेअर-शेबापासून हिन्नोमाच्या खोर्‍यापर्यंत वस्ती केली.

  19. अश्शूरच्या राजाने आपल्या मोठ्या सैन्यासह सरसेनापतीला लाखीशहून हिज्कीयाह राजाकडे यरुशलेमला पाठविले. जेव्हा सेनापती वरच्या हौदाच्या पाटाजवळ रस्त्याच्या कडेला थांबला

  20. जेव्हा सेनाप्रमुखाने ऐकले की अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले आहे, तेव्हा त्याने आपला तळ उठविला आणि राजा लिब्नाह येथे युद्ध करताना त्याला आढळला.

  21. यावेळी बाबेलच्या राजाचे सैन्य यरुशलेमशी युद्ध करीत होते, यहूदीया प्रांतातील इतर नगरे—लाखीश व अजेकाह—अद्यापही टिकाव धरून होती. यहूदीयात एवढीच तटबंदी असलेली शहरे बाकी होती.

  22. लाखीशमध्ये राहणार्‍यांनो, वेगवान घोडे रथाला जुंपा. तुझ्यापासून सीयोनच्या कन्येचे पाप सुरू झाले, कारण तुझ्यामध्ये इस्राएलचे अपराध आढळून आले.