मुख्य मजकुरावर जा

Egypt

561 verses · 4 known names

हे नावानेही ओळखले जाते: Egyptian, Egyptians, Egyptian's

30.1000, 31.3300 गूगल नकाशावर पाहा

Egypt चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले; रानबैलासारखे त्यांचे बळ आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रांचा ते नाश करतात आणि त्यांच्या हाडांचे ते तुकडे करतात; ते आपल्या बाणांनी त्यांना भोसकतात.

  2. “याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे जे पुरुष वीस किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांची मोजणी करा.”

  3. अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते, ती लेवी वंशातील होती, जी लेवीच्या घराण्यात इजिप्तमध्ये असताना जन्मली होती. अम्रामापासून तिने अहरोन, मोशे व त्यांची बहीण मिर्यामला जन्म दिला.

  4. ‘कारण त्यांनी पूर्ण अंतःकरणाने मला अनुसरले नाही, म्हणून इजिप्तमधून बाहेर येताना ज्यांचे वय वीस वर्षे व त्याहून अधिक होते त्यातील एकही, जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबाला शपथ घेऊन देऊ केला तो पाहणार नाही;

  5. मोशे आणि अहरोन यांच्या नेतृत्वाखाली इस्राएली लोक आपल्या तुकडीनुसार इजिप्तमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या प्रवासाचे टप्पे असे होते.

  6. याहवेहच्या आज्ञेनुसार अहरोन याजक होर पर्वतावर गेला आणि इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यानंतर चाळिसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तो तिथे मरण पावला.

  7. आपल्या तंबूत बसून तुम्ही कुरकुर केली आणि म्हटले, “याहवेह आमचा द्वेष करीत आहेत, म्हणून अमोर्‍यांच्या हातून आमचा नाश व्हावा यासाठी त्यांनी आम्हाला इजिप्त देशातून इकडे आणले आहे.

  8. कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यापुढे जात आहेत, ते तुमच्यावतीने त्यांच्याशी लढतील, जसे तुमच्या डोळ्यादेखत त्यांनी इजिप्त देशात आणि अरण्यात असताना केले. ज्याप्रमाणे पिता आपल्या मुलांची सर्वतोपरी काळजी घेतो, त्याप्रमाणे याहवेह परमेश्वराने इथे पोहोचेपर्यंत तुमची सतत काळजी घेतली.”

  9. परंतु याहवेहने तुम्हाला इजिप्तच्या तप्त लोखंडी भट्टीतून यासाठी सोडवून आणले की, तुम्ही त्यांचे खास निवडलेले लोक, त्यांचे वारसदार व्हावे, जसे तुम्ही आज आहात.

  10. कोणत्या दैवताने एका राष्ट्रातून दुसर्‍या राष्ट्राला गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरिता भयानक पीडा पाठविल्या, चिन्हे, चमत्कार केले, युद्ध व अद्भुत कृत्ये केली, जसे इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने पराक्रमी बाहू आणि उगारलेल्या हाताने चमत्कार केले, असे एक तरी उदाहरण इतरत्र तुम्हाला सापडेल का?

  11. तुमच्या पूर्वजांवर त्यांची प्रीती होती आणि त्यांनी त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी निवडले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला आपल्या उपस्थितीने आणि महान सामर्थ्याने इजिप्त देशामधून बाहेर आणले,

  12. ज्यावेळी इस्राएली लोकांनी इजिप्त देश सोडला, त्यांना मोशेने या अटी, विधी व नियम दिले

  13. आणि तेव्हा ते यार्देनेच्या पूर्वेकडे बेथ-पौर शहराजवळ तळ देऊन राहिलेले होते, हीच भूमी पूर्वी अमोर्‍यांनी आपला राजा सीहोनच्या अधिपत्याखाली व्यापली होती आणि त्याची राजधानी हेशबोन होती; मोशे व इस्राएली लोकांनी इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर सीहोन राजा आणि त्याच्या लोकांचा पराभव केला.

  14. “ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  15. तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता याचे स्मरण करा. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सामर्थ्यवान व विस्तारित हातांनी तुम्हाला तिथून बाहेर काढले. यास्तव याहवेह तुमच्या परमेश्वराने शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे.

  16. ज्या याहवेहने तुम्हाला इजिप्त देशातून, दास्यगृहातून बाहेर आणले त्यांना तुम्ही विसरू नये याची खबरदारी घ्या.

  17. तेव्हा तुम्ही त्यांना सांगा: “आम्ही इजिप्त देशात फारोहचे गुलाम होतो, परंतु याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.

  18. आमच्या नजरेसमोर याहवेहने इजिप्त देश, फारोह राजा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाविरुद्ध—महान व भयावह—चिन्हे दाखविली व चमत्कार केले.

  19. पण याहवेहची तुमच्यावर प्रीती असल्यामुळे आणि त्यांनी तुमच्या पूर्वजांना दिलेली शपथ पाळावयाची होती, म्हणून त्यांनी तुम्हाला सामर्थ्यशाली हाताने बाहेर काढले आणि इजिप्तचा राजा फारोहच्या दास्यगृहातून तुम्हाला सोडविले.

  20. याहवेह तुमच्यातील सर्व रोग दूर करतील. इजिप्तमधील तुम्हाला माहीत असलेले भयंकर रोग ते तुमच्यावर आणणार नाहीत, तर तुमचा द्वेष करणार्‍या सर्वांवर ते रोग आणतील.

  21. परंतु त्यांना भिऊ नका; याहवेह तुमच्या परमेश्वराने फारोहचे आणि संपूर्ण इजिप्त देशाचे काय केले याचे चांगले स्मरण ठेवा.

  22. तेव्हा तुमचे अंतःकरण उन्मत्त होईल आणि ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून काढून बाहेर आणले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही विसरून जाल.

  23. तुम्ही त्या रानात याहवेह तुमच्या परमेश्वराला राग येईल असे वागलात, हे तुम्ही विसरू नका आणि याची नेहमी आठवण ठेवा. ज्या दिवशी तुम्ही इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून या ठिकाणी येईपर्यंत, तुम्ही याहवेहविरुद्ध सतत बंड केले.

  24. मग याहवेह मला म्हणाले, “ताबडतोब येथून उतरून खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्त देशातून बाहेर काढून आणले, ते भ्रष्ट झाले आहेत. मी त्यांना जे करण्याची आज्ञा दिलेली होती, त्यापासून बहकून त्यांनी स्वतःसाठी ओतीव मूर्ती तयार केली आहे.”

  25. मी याहवेहला प्रार्थना केली आणि म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, तुमच्या प्रचंड शक्तीने व तुमच्या बलाढ्य हाताने इजिप्त देशातून वाचविलेल्या तुमच्या लोकांचा, तुमच्या वारसांचा संहार करू नका.