मुख्य मजकुरावर जा

Moses

774 वचने · 7 कुटुंब सदस्य

Moses चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशे व अहरोन यांनी लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार एक महिन्याचे व अधिक वयाचे पुरुष यांची गणती केली, ते एकूण 22,000 होते.

  2. मग याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांतील एक महिन्याच्या व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या सर्व पुरुषांची गणती करून त्यांच्या नावांची यादी करावी.

  3. याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांची गणती केली.

  4. याहवेह मोशेला आणखी म्हणाले,

  5. मोशेने लेव्यांपेक्षा जे अधिक होते त्यांच्याकडून त्यांच्या खंडणीचे पैसे गोळा केले.

  6. याहवेहच्या वचनाप्रमाणे झालेल्या आज्ञेनुसार मोशेने ते खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या पुत्रांना दिले.

  7. याहवेह मोशेला आणि अहरोनाला म्हणाले:

  8. याहवेहने मोशे व अहरोन यांना म्हटले,

  9. याहवेह मोशेला म्हणाले,

  10. मोशे, अहरोन आणि समुदायाच्या पुढार्‍यांनी कोहाथी लोकांची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

  11. सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व कोहाथी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

  12. सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व गेर्षोनी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

  13. सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व मरारी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

  14. मोशे, अहरोन आणि इस्राएलच्या पुढार्‍यांनी सर्व लेवींची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

  15. याहवेहने मोशेद्वारे आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येकाला आपले काम व त्यांनी काय वाहून न्यावे हे नेमून देण्यात आले. अशाप्रकारे याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे प्रत्येकाची गणती करण्यात आली.

  16. याहवेहने मोशेला म्हटले,

  17. त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले; त्यांनी त्यांना छावणीबाहेर पाठविले. याहवेहने मोशेला सूचना दिली होती तसेच त्यांनी केले.

  18. याहवेह मोशेला म्हणाले,

  19. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  20. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  21. याहवेह मोशेला म्हणाले,

  22. जेव्हा मोशेने निवासमंडप उभारण्याचे काम संपविले, तेव्हा त्याने निवासमंडप व त्यातील सामानावर अभिषेक केला व ते पवित्र केले. त्याने वेदी व त्याची सर्व पात्रे सुद्धा अभिषिक्त करून ती पवित्र केली.

  23. याहवेहने मोशेला म्हटले,

  24. तेव्हा मोशेने त्या गाड्या आणि ते बैल घेतले व लेव्यांना दिले.

  25. कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “प्रत्येक दिवशी एका पुढार्‍याने वेदीच्या समर्पणासाठी अर्पणे आणावी.”