मुख्य मजकुरावर जा

John

35 वचने · 3 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Boanerges

John चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी पेत्र व योहान यांचे धैर्य पाहिले तेव्हा त्याचे त्यांना नवल वाटले आणि त्यांना कळून आले की ती अशिक्षित व सर्वसामान्य माणसे असून ते येशूंच्या सहवासात राहत होते.

  2. परंतु पेत्र व योहानाने उत्तर दिले, “परमेश्वराच्या दृष्टीने काय योग्य आहेः तुमचे ऐकावे की त्यांचे? याचा न्याय तुम्हीच करा!

  3. यरुशलेममधील प्रेषितांनी जेव्हा शोमरोनातील लोकांनी परमेश्वराचे वचन स्वीकारल्याचे ऐकले, तेव्हा त्यांनी पेत्र व योहानाला शोमरोनात पाठविले.

  4. त्याने योहानाचा भाऊ याकोबाचा तलवारीने वध करविला.

  5. जेव्हा याकोब, केफा आणि योहान असे जे श्रेष्ठ आधारस्तंभ यांना समजले की मला कृपा प्राप्त झाली आहे, तेव्हा त्यांनी माझ्याशी व बर्णबाशी सहभागितेच्या उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. त्यांनी हे मान्य केले की आम्ही गैरयहूदीयांकडे जावे आणि त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.

  6. ज्यागोष्टी लवकरच निश्चितच घडून येणार आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी परमेश्वराने हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला दिले. त्यांनी आपल्या दूताला पाठवून आपला सेवक योहानाला ते कळविले.

  7. योहानाकडून,

  8. मी योहान, तुमचा बंधू, येशूंच्या दुःखात, राज्यात व धीरात तुमचा सहभागी असलेला, परमेश्वराच्या वचनामुळे आणि येशूंच्या साक्षीमुळे पत्मोस नावाच्या बेटावर शिक्षा भोगीत होतो.

  9. तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजे पवित्र नगरी, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरतांना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती.

  10. मी, योहानाने या सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्या आणि ज्या देवदूताने मला त्या दाखविल्या, त्याला नमन करण्यासाठी मी त्याच्या पायांवर उपडा पडलो.