मुख्य मजकुरावर जा

Israel

1,007 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jacob

Israel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांची गणती केली.

  2. “इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी लोकांना घे आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशू घ्यावे. लेवी लोक माझे असावेत. मीच याहवेह आहे.

  3. 273 इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले जे लेव्यांपेक्षा अधिक आहेत त्यांची खंडणी भरण्यासाठी,

  4. इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांकडून त्याने पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार 1,365 गोळा केले.

  5. इस्राएली लोकांना आज्ञा दे की, ज्यांना चर्मरोग आहे किंवा कोणत्याही प्रकारचा स्राव आहे किंवा जो मृतदेहाच्या विधीमुळे अशुद्ध झाला आहे, त्यांना छावणीबाहेर पाठवून द्यावे.

  6. त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले; त्यांनी त्यांना छावणीबाहेर पाठविले. याहवेहने मोशेला सूचना दिली होती तसेच त्यांनी केले.

  7. “इस्राएली लोकांस सांग, ‘जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री एखाद्याविरुद्ध कोणताही अपराध करेल, तो याहवेहच्या विरुद्ध विश्वासघात असून तो दोषी आहे.

  8. सर्व पवित्र भेटी, ज्या इस्राएली लोक याजकाकडे आणतात त्या याजकाच्या व्हाव्या.

  9. “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: जर एखाद्या मनुष्याच्या पत्नीचे वाकडे पाऊल पडले आणि ती त्याच्याशी अविश्वासूपणे वागली,

  10. “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: एखादा पुरुष किंवा स्त्री याहवेहला समर्पित नाजीर होण्याचा एक विशेष नवस करू इच्छितात,

  11. अहरोन आणि त्याच्या पुत्रांना सांग, “तुम्ही इस्राएली लोकांस आशीर्वाद देतांना असे म्हणावे:

  12. “अशा रीतीने ते माझे नाव इस्राएली लोकांना ठेवतील आणि मी त्यांना आशीर्वादित करेन.”

  13. “लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून घेऊन त्यांना विधीनुसार शुद्ध कर.

  14. लेव्यांना सभामंडपाच्या समोर घेऊन यावे व सर्व इस्राएल समुदायाला एकत्र करावे.

  15. लेव्यांना याहवेहपुढे सादर करावे व इस्राएली लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावेत.

  16. अहरोनाने इस्राएली लोकांच्या वतीने हेलावणीचे अर्पण म्हणून लेव्यांना याहवेहसमोर सादर करावे, म्हणजे ते याहवेहची सेवा करण्याकरिता तयार होतील.”

  17. अशाप्रकारे तू लेवी लोकांना माझ्यासाठी इतर इस्राएली लोकांपासून वेगळे करावेस म्हणजे लेवी माझे होतील.

  18. इस्राएली लोकांमधून ते सर्वस्वी मला समर्पित आहेत. प्रत्येक इस्राएली स्त्रीच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषाऐवजी, मी त्यांना आपलेसे करून घेतले आहे.

  19. इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेला प्रत्येक नर, तो मनुष्याचा असो किंवा पशूंचा, तो माझा आहे. जेव्हा मी इजिप्तचे सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, तेव्हा मी त्यांना माझ्यासाठी पवित्र केले आहे.

  20. आणि मी इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे.

  21. मी लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून अहरोन व त्याच्या पुत्रांना भेट म्हणून दिले आहे, यासाठी की इस्राएली लोकांच्या वतीने त्यांनी सभामंडपात सेवा करावी व त्यांच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे इस्राएली लोक पवित्रस्थानाकडे जातील, तेव्हा कोणतीही पीडा त्यांचा नाश करणार नाही.

  22. मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएली समुदायांनी याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याच प्रकारे लेव्यांना केले.

  23. “इस्राएली लोकांनी नेमलेल्या वेळेस वल्हांडण सण पाळावा.

  24. तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना वल्हांडणाचा सण पाळावयास सांगितले.

  25. त्याप्रमाणे सीनायच्या रानात, पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी त्यांनी वल्हांडणाचा सण पाळला. जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.