मुख्य मजकुरावर जा

Israel

1,007 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jacob

Israel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एकदा एका इस्राएली स्त्रीचा मुलगा, ज्याचे वडील इजिप्तचे होते, इस्राएली छावणीत गेला. तिथे छावणीत त्याचे आणि एका इस्राएली मनुष्याचे भांडण झाले.

  2. इस्राएली लोकांना सांग: ‘जो कोणी आपल्या परमेश्वराला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी;

  3. मग मोशे इस्राएली लोकांसोबत बोलला आणि त्यांनी त्या निंदा करणार्‍याला छावणीबाहेर नेले आणि त्याच्यावर दगडमार केला. याहवेहने मोशेला आज्ञापिल्यानुसार इस्राएली लोकांनी केले.

  4. “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही पोहोचाल, तेव्हा त्या भूमीने याहवेहसाठी शब्बाथ पाळावा.

  5. म्हणून लेव्यांच्या मालकीचे जे काही आहे ते सोडविता येईल, आणि शहरातील त्यांच्या मालमत्तेतून विकले गेलेले घर योबेल वर्षात सोडविले जाईल, कारण लेवींच्या नगरातील घरेही इस्राएलच्या घराण्यात त्यांची मालमत्ता आहे.

  6. तुम्ही ते तुमच्या मुलांना वारसाहक्कात देऊ शकता आणि त्यांना आयुष्यभर गुलाम बनवू शकता, पण तुमच्या इस्राएली बांधवांना अशा प्रकारची कठोर वागणूक तुम्ही देऊ नये.

  7. कारण इस्राएली लोक माझेच सेवक आहेत; मीच त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  8. तेव्हा मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याबरोबर केलेल्या कराराचे स्मरण करेन आणि त्या भूमीचे स्मरण करेन.

  9. हे ते नियम, विधी व सूचना आहेत, ज्या याहवेहने आपल्यात व इस्राएली लोकांमध्ये मोशेद्वारे सीनाय पर्वतावर स्थापित केल्या.

  10. “इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा एखादा मनुष्य याहवेहला समर्पणाचे विशेष नवस करेल, तेव्हा त्या व्यक्तीचे मूल्य पुढीलप्रमाणे ठरवावे.

  11. या आज्ञा सीनाय पर्वतावर याहवेहने इस्राएली लोकांसाठी मोशेला दिल्या.

  12. “संपूर्ण इस्राएली समुदायाची त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार, प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकएक करून जनगणना करा.

  13. सर्व इस्राएलातील वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांच्या कुटुंबानुसार नोंदण्यात आली.

  14. इस्राएली लोकांनी आपआपल्या दलानुसार, प्रत्येकाने आपआपल्या छावणीत, आपआपल्या झेंड्याखाली आपले डेरे द्यावे.

  15. परंतु लेव्यांनी आपले डेरे कराराच्या निवासमंडपाच्या सभोवती उभारावे, म्हणजे इस्राएली समुदायाविरुद्ध माझा क्रोध पेटणार नाही. लेव्यांनी कराराच्या नियमाच्या निवासमंडपाची जबाबदारी घेऊन त्याची काळजी घ्यावी.”

  16. याहवेहने मोशेला जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी सर्वकाही केले.

  17. “इस्राएली लोकांनी सभामंडपाच्या सभोवती, त्यापासून थोडे अंतरावर आपआपले डेरे उभारावे, प्रत्येकाने ते आपआपल्या झेंड्याजवळ व आपल्या घराण्याच्या निशाणाजवळ ते उभारावे.”

  18. आपआपल्या घराण्यानुसार मोजलेले इस्राएली लोक हे आहेत. छावणीतील सर्व पुरुषांची संख्या 6,03,550 होती.

  19. याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इतर इस्राएल लोकांबरोबर लेव्यांची मोजणी केली नव्हती.

  20. अशा रीतीने याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी प्रत्येक गोष्ट केली, ते असे की, आपआपल्या झेंड्याजवळ ते डेरे देत असत आणि आपले कूळ व घराणे यानुसार पुढे चालत असत.

  21. सभामंडपाच्या सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी, निवासमंडपाचे काम करून इस्राएली लोकांची कर्तव्ये पूर्ण करावी.

  22. यास्तव लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या हाती द्यावे; संपूर्ण इस्राएली लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आलेले आहेत.

  23. मोशे आणि अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी निवासमंडपाच्या पूर्वेला, सूर्योदयाच्या दिशेने, सभामंडपासमोर डेरा द्यायचा होता. इस्राएली लोकांच्या वतीने पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. इतर कोणीही पवित्रस्थानाजवळ आले तर त्याला जिवे मारले जावे.

  24. मग याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांतील एक महिन्याच्या व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या सर्व पुरुषांची गणती करून त्यांच्या नावांची यादी करावी.

  25. आणि इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेव्यांना माझ्यासाठी घ्यावे आणि इस्राएली लोकांच्या पशूतील सर्व प्रथम जन्मलेल्या वत्सांऐवजी, लेव्याच्या पशूंना माझ्यासाठी घ्यावे. मीच याहवेह आहे.”