मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला एखादा नवस करता, तेव्हा तो फेडण्यास विलंब लावू नये, कारण नवसांची फेड तत्परतेने करावी, अशी याहवेह तुमच्या परमेश्वराची अपेक्षा आहे. तसे न केल्याने तुम्ही पापाचे दोषी ठराल.

  2. तुमच्या ओठांनी तुम्ही जे काही वचन दिले असेल, त्याप्रमाणे तुम्ही अवश्य केले पाहिजे; कारण तो नवस तुम्ही मुखाने, स्वखुशीने याहवेह तुमच्या परमेश्वराला केला होता.

  3. तर तिच्या पहिल्या पतीने तिला पत्नी म्हणून पुन्हा स्वीकारू नये, कारण ती भ्रष्ट झालेली आहे. अशा स्त्रीशी विवाह करणे ही गोष्ट याहवेहच्या दृष्टीने अमंगळ अशी आहे. याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतन म्हणून देत असलेल्या देशावर पाप आणू नका.

  4. इजिप्तमधून येताना याहवेह तुमच्या परमेश्वराने मिर्यामचे काय केले, याची तुम्ही आठवण ठेवावी.

  5. गहाणादाखल त्याने आपले पांघरूण दिले असेल व तर सूर्यास्तसमयी ते त्याला परत करावे म्हणजे ते पांघरूण अंगावर घेऊन तो झोपेल. तो तुमचे आभार मानेल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने तुमचे हे कृत्य नीतिमत्व असे ठरेल.

  6. त्यांना दररोज सूर्य मावळण्यापूर्वीच त्यांची मजुरी द्यावी, कारण ते गरीब आहेत आणि ते त्या मजुरीवर अवलंबून आहेत. नाहीतर ते तुमच्याविरुद्ध याहवेहकडे गार्‍हाणे करतील व मग ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.

  7. तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यातून तुमची सुटका केली, याची तुम्ही सतत आठवण ठेवावी. म्हणूनच मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे.

  8. पिकांची कापणी करीत असताना तुम्ही बांधून ठेवलेली एखादी पेंढी शेतातून आणावयाचे विसरलात, तर ती आणण्यासाठी तुम्ही माघारी जाऊ नये, तर परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी ती तिथेच राहू द्यावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या सर्व कार्यात आशीर्वाद देतील.

  9. तुम्ही तुमच्याजवळ तंतोतंत आणि प्रामाणिक वजने आणि मापे बाळगावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे, त्या देशात तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.

  10. कारण याहवेह तुमचे परमेश्वर या गोष्टी अप्रामाणिकपणे करणार्‍यांचा तिरस्कार करतात.

  11. जेव्हा तुम्ही दुर्बल व थकलेले होता, तेव्हा त्यांनी तुम्हाला मार्गात गाठले आणि मागे राहिलेल्यांवर हल्ला केला; त्यांना परमेश्वराचे भय नव्हते.

  12. जेव्हा वतन म्हणून देणार्‍या देशातील तुमच्या सर्व शत्रूपासून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला विश्रांती देतील, तेव्हा तुम्ही या अमालेक लोकांचे नाव पृथ्वीवरून पूर्णपणे नामशेष केले पाहिजे. हे तुम्ही कधीही विसरू नये!

  13. जेव्हा तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वराने वतन दिलेल्या देशात प्रवेश कराल, तो जिंकून त्याचा ताबा घ्याल आणि तिथे वस्ती कराल,

  14. तेव्हा याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या भूमीतील प्रत्येक पिकाचे प्रथम उत्पन्न एका टोपलीत आणावे. नंतर याहवेह तुमचे परमेश्वर आपल्या नावासाठी जे वसतिस्थान निवडून देतील त्या ठिकाणी तुम्ही जावे

  15. आणि त्यावेळी सेवा करीत असलेल्या याजकास म्हणा, “याहवेह तुमच्या परमेश्वराला आज मी जाहीर करतो, की आमच्या पूर्वजांना वचन देऊ केलेल्या देशात मी आलो आहे.”

  16. मग याजक ती टोपली तुमच्या हातून घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीपुढे ठेवेल.

  17. नंतर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर म्हणावेः “आमचे पूर्वज अरामी, हे निर्वासित होऊन आश्रयासाठी इजिप्त देशास गेले. ते संख्येने अगदी थोडे होते, पण इजिप्त देशात ते एक विशाल, बलाढ्य आणि थोर राष्ट्र बनले.

  18. तेव्हा आम्ही याहवेहचा, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराचा धावा केला आणि याहवेहने आमचे गार्‍हाणे ऐकले, आमच्या अडचणी जाणल्या आणि आमच्यावर होत असलेला जुलूम व अत्याचार त्यांनी पाहिला.

  19. मग याहवेहने महान चमत्कारांनी, सामर्थ्यशाली बाहुबलाने व पसरलेल्या हातांनी आणि भयावह चिन्ह व चमत्कार करून आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.

  20. त्यांनी आम्हाला या ठिकाणी आणले आणि दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला हा देश आम्हाला दिला;

  21. आता, हे याहवेह परमेश्वरा, तुम्ही जी भूमी आम्हाला दिली आहे, त्यात उगविलेल्या धान्याचे प्रथम उत्पन्न आम्ही आणले आहे.” नंतर ते अर्पण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे ठेवावे व त्यांची उपासना करावी.

  22. त्यानंतर याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्या सर्व चांगल्या गोष्टी तुम्हाला दिल्या, त्याबद्दल तुम्ही, लेवी व परदेशी लोक या सर्वांनी मिळून आनंदोत्सव साजरा करावा.

  23. मग तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर सांगावे, “मी माझ्या घरातून पवित्र हिस्सा काढला आहे. लेवी वंशजांना, परदेशीयांना, अनाथांना आणि विधवांना तुमच्या आज्ञेप्रमाणे दिला आहे. मी कोणतीही आज्ञा मोडली नाही किंवा तुमचा कोणताही नियम विसरलो नाही.

  24. मी विलाप करीत असताना त्या पवित्र वाट्यातील काहीही खाल्ले नाही, धार्मिक संस्कारांच्या दृष्टीने अशुद्ध असताना ते घराच्या बाहेर नेले नाही किंवा एखाद्या मृत व्यक्तीला अर्पण केले नाही. हे माझ्या याहवेह परमेश्वरा, मी तुमचे आज्ञापालन केले आहे. तुम्ही सांगितलेले सर्वकाही मी केले आहे.

  25. म्हणून हे परमेश्वरा, स्वर्गातील तुमच्या पवित्र निवासस्थानातून तुम्ही खाली पाहा आणि आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे जो दुधामधाचे प्रवाह वाहणारा असा देश तुम्ही आम्हाला दिला आहे त्याला व आम्हा इस्राएली लोकांना आशीर्वादित करा.”