मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पावसाच्या ऐवजी याहवेह तुमच्यावर, तुमचा नाश होईपर्यंत, धुळीच्या व वाळूच्या वादळांचा आकाशातून वर्षाव करतील.

  2. तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव व्हावा, असे याहवेह करतील. तुम्ही त्यांच्यावर एका दिशेने चाल करून जाल, पण सात दिशांनी गोंधळून पळ काढाल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांकरिता तुम्ही भयानक विनाशाचे उदाहरण व्हाल.

  3. याहवेह तुम्हावर इजिप्त देशातील गळवे, मूळव्याध, खवडे व खरूजाच्या अशा पीडा आणतील की ज्यातून तुम्ही कधीच बरे होणार नाही.

  4. याहवेह तुम्हाला वेडे व आंधळे करतील आणि तुमची मने गोंधळून जातील.

  5. याहवेह तुमच्या गुडघ्या व पायावर कधीही बरी होणार नाही अशी वेदना देणारी फोडी येऊ देतील, जे अगदी तुमच्या डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत भरून जातील.

  6. तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांना कधीही माहीत नसलेल्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुम्हाला आणि तुम्ही स्वतःवर नेमलेल्या राजाला हद्दपार करतील. तिथे तुम्ही इतर दैवतांची उपासना कराल, जे लाकडाचे आणि दगडाचे दैवत असेल.

  7. याहवेह तुम्हाला अशा सर्व राष्ट्रांमध्ये ओढून नेतील, जिथे तुम्ही भयाचा, म्हणीचा आणि उपहासाचा विषय बनाल.

  8. हे सर्व शाप तुमच्यावर येतील. ते तुमचा नाश होईपर्यंत पाठपुरावा करतील आणि तुम्हाला गाठतील, कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही व ज्या आज्ञा आणि विधी त्यांनी तुम्हाला दिले त्याचे पालन करण्याचे नाकारले.

  9. कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची समृद्धीच्या काळात आनंदाने आणि हर्षाने सेवा केली नाही,

  10. म्हणून तुम्ही याहवेहने पाठविलेल्या तुमच्या शत्रूंचे गुलाम व्हाल आणि तुम्ही भुकेले, तहानलेले, नग्न आणि अत्यंत गरीब असे व्हाल आणि ते तुमचा नाश करेपर्यंत तुमच्या मानेवर लोखंडी जू ठेवण्यात येईल.

  11. याहवेह तुमच्यावर दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून एक राष्ट्र पाठवतील, ते गरुडाप्रमाणे झेप घेऊन तुमच्यावर तुटून पडतील, ते असे राष्ट्र असेल ज्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही,

  12. ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालेल आणि तुमचे सर्व उंच व मजबूत तट, ज्यावर तुमची भिस्त आहे, ते पाडून टाकतील. याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या देशातील सर्व शहरांना ते वेढा घालतील.

  13. तुमच्या शत्रूंनी वेढा दिल्यामुळे आणि त्यांच्या छळामुळे, तुम्ही तुमच्या पोटचे फळ म्हणजे तुमचे पुत्र व कन्या देखील तुम्ही खाऊन टाकाल, जे याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिले आहे.

  14. या पुस्तकात नमूद केलेली नियमशास्त्राची वचने तुम्ही प्रामाणिकपणे आचरणात आणली नाही आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या अद्भुत आणि भयावह नावाचा मान तुम्ही राखला नाही,

  15. तर याहवेह तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर असाध्य रोग आणि कधीही न थांबणारे भयंकर साथीचे रोग पाठवतील.

  16. ज्या रोगांना तुम्ही भिता, असे इजिप्तमधील सर्व रोग तुमच्यावर आणतील आणि ती तुम्हाला लागून राहतील.

  17. तुमचा नाश होईपर्यंत याहवेह तुम्हावर प्रत्येक आजार आणि सर्व साथींचे रोग आणि या नियमशास्त्र ग्रंथात ज्यांचा उल्लेख नाही, असे सर्व रोग तुम्हावर आणतील.

  18. तुम्ही आकाशातील तार्‍यांप्रमाणे अगणित असला, तरी अगदीच थोडके उराल, कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे आज्ञापालन केले नाही.

  19. तुमची भरभराट करण्यात व तुम्हाला बहुगुणित करण्यात जसा याहवेहला आनंद वाटला, तसाच आनंद त्यांना तुमचा नाश व नायनाट करण्यातही वाटेल. जो देश तुम्ही ताब्यात घेण्यास जात आहात, त्या देशातून तुमचे उच्चाटन करण्यात येईल.

  20. पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत असलेल्या निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुमची पांगापांग करतील. तिथे तुम्ही किंवा तुमच्या पूर्वजांनी ज्यांची कधीही उपासना केली नाही—अशा लाकडाच्या आणि दगडाच्या दैवतांची तुम्ही उपासना कराल.

  21. त्या राष्ट्रांमध्ये तुम्हाला स्वास्थ्य मिळणार नाही, तुमच्या पायांना विसावा मिळणार नाही, तिथे तुमची हृदये थरथर कापत राहतील, तुमचे डोळे म्लान होतील व तुमचा जीव झुरणीस लागेल, असे याहवेह करतील.

  22. तुमची अंतःकरणे भयग्रस्त झाल्यामुळे सारखी धडधडत राहतील, त्यामुळे सकाळी तुम्ही म्हणाल, “अहा, आता रात्र असती, तर किती बरे झाले असते!” आणि संध्याकाळी तुम्ही म्हणाल, “अहा, आता सकाळ असती तर किती बरे झाले असते!”

  23. जो प्रवास तुम्ही कधीही करणार नाही असे याहवेह म्हणाले होते, तोच प्रवास याहवेह तुम्हाला करावयाला लावतील आणि जहाजातून मी तुम्हाला पुन्हा इजिप्त देशामध्ये पाठवेन. मग तिथे तुमच्या शत्रूंनी तुम्हाला पुरुष व स्त्री गुलाम म्हणून विकत घ्यावे यासाठी तुम्ही स्वतःला देऊ कराल, परंतु तुम्हाला कोणाही विकत घेणार नाही.

  24. याहवेहने मोआब देशात इस्राएली लोकांबरोबर जो करार करण्याची मोशेला आज्ञा दिली होती त्याच्या या अटी आहेत, त्यांनी होरेब पर्वतावर जो करार केला होता तो विस्तारित असा आहे.

  25. मोशेने सर्व इस्राएली लोकांना बोलाविले आणि सांगितले: इजिप्त देशात फारोह, त्याच्या अधिकार्‍यांशी आणि त्याच्या देशात याहवेहने जे काही केले ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे.