God
God चा उल्लेख असलेली वचने
तर ज्या माणसाची याहवेह तुमचे परमेश्वर निवड करतील, त्यालाच तुम्ही राजा म्हणून नेमावे. तो तुमच्या भाऊबंदांपैकी असावा; परदेशीयाला म्हणजे इस्राएली पैकी नसलेल्यास तुम्ही राजा म्हणून नेमू नये.
राजाने स्वतःसाठी घोड्यांचा मोठा संग्रह करू नये किंवा त्याने आपल्यासाठी अधिक घोडे आणण्यासाठी आपली माणसे इजिप्त देशात पाठवू नये, कारण “तुम्ही त्या मार्गाने परत जाऊ नये,” असे याहवेहने तुम्हाला सांगितले आहे.
ती प्रत नेहमीच त्याच्याजवळ असेल. त्याने त्या नियमांचे दररोज वाचन करावे म्हणजे तो याहवेह त्याच्या परमेश्वराचा आदर करण्यास शिकेल आणि या नियमाचे आणि विधीचे सर्व शब्द काळजीपूर्वक पाळेल
लेवी याजकांना—अर्थात् संपूर्ण लेवी गोत्राला—इतर गोत्रांप्रमाणे इस्राएलात वाटा किंवा वतन नाही. ते याहवेहला केलेल्या होमार्पणावर जगतील, कारण हेच त्यांचे वतन आहे.
त्यांच्या इस्राएली भाऊबंदांप्रमाणे त्यांना वतन नसेल; कारण याहवेहच त्यांचे वतन आहेत, जसे त्यांनी त्यांना अभिवचन दिले होते.
कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना आणि त्यांच्या वंशजांना सर्व गोत्रातून पिढ्यान् पिढ्या निरंतर उभे राहून आणि याहवेहच्या नावाची सेवा करण्यासाठी निवडले आहे.
जर एखाद्या लेवीची इस्राएली राष्ट्राच्या एका नगरातून दुसर्या नगरात जाऊन राहण्याची कळकळीची इच्छा असल्यास आणि तो याहवेहने निवडलेल्या पवित्रस्थानी येऊन राहिल्यास,
याहवेह त्याच्या परमेश्वराच्या नावाने इस्राएली भूमीत इतर लेवी बांधवांप्रमाणे याहवेहच्या उपस्थितीत त्याने सेवा करावी.
जेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात याल, तेव्हा त्या देशात राहणार्या राष्ट्रांच्या अमंगळ चालीरीती शिकू नका.
जो कोणी अशी कृत्ये करतो त्याचा याहवेहला तिरस्कार आहे; आणि त्यांच्या या अमंगळ कृत्यांमुळेच त्या राष्ट्रांना याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यापुढून घालवून देणार आहेत.
तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे निर्दोषपणे चालावे.
जी सर्व राष्ट्रे शकुनमुहूर्त पाहणार्यांचे व दैवज्ञांची भाकिते ऐकतात त्या राष्ट्रांचा ताबा तुम्ही घेणार आहात, त्यामधून त्यांना हुसकावून लावा. परंतु याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला अशा गोष्टी करण्याची परवानगी देत नाहीत.
याहवेह तुमचे परमेश्वर इस्राएलातून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील. तुम्ही त्याचे ऐकावे.
कारण होरेबाच्या पर्वताजवळ हीच विनंती तुम्ही स्वतः याहवेह तुमच्या परमेश्वराजवळ केली होती, जेव्हा तुम्ही विनविले, “याहवेह आमच्या परमेश्वराचा भयावह आवाज पुन्हा ऐकण्याचा अथवा त्या पर्वतावर तो भयावह अग्नी पुनरपि पाहण्याचा प्रसंग आम्हावर येऊ नये, नाहीतर आम्हाला मृत्यू येईल.”
तेव्हा याहवेह मला म्हणाले: “ते जे म्हणतात ते योग्य आहे.
त्यांच्या भाऊबंदांतून मी त्यांच्यासाठी तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करेन आणि मी माझी वचने त्याच्या मुखात घालेन. मी त्याला ज्याकाही आज्ञा देईन त्या सर्व तो त्यांना सांगेल.
तो संदेष्टा जे काही माझ्या नावाने बोलेल आणि जो कोणी माझे शब्द ऐकणार नाही, त्याची मी स्वतः झडती घेईन.
पण जो संदेष्टा माझ्या नावाने असे काही बोलतो ज्याची मी आज्ञा दिली नाही किंवा जो संदेष्टा इतर दैवतांच्या नावाने बोलतो त्याला जिवे मारावे.”
तुम्ही स्वतःशी म्हणू शकता, “हा संदेश याहवेह बोलले नाहीत, हे आम्ही कसे ओळखावे?”
तर एखाद्या संदेष्ट्याने याहवेहच्या नावाने ज्या गोष्टीची घोषणा केलेली असेल, ती गोष्ट जर घडून आली नाही किंवा खरेच तसे होत नसेल तर तो संदेश याहवेहने दिलेला नाही. तो संदेष्टा उन्मत्तपणे बोलला आहे, तुम्ही त्याचे भय बाळगू नये.
याहवेह तुमचे परमेश्वर जी भूमी तुम्हाला देणार आहेत, तेथील राष्ट्रांचा ते नाश करतील व जेव्हा तुम्ही त्यांना त्या भूमीतून घालवून द्याल आणि त्यांच्या शहरात व घरात वस्ती कराल,
त्यावेळी याहवेह तुमचे परमेश्वर जी भूमी तुम्हाला वतन म्हणून देत आहेत, त्यामधील तीन शहरे तुम्ही वेगळी करून ठेवावी.
यातील अंतर निश्चित करा आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतन म्हणून देत असलेल्या भूमीचे तीन भाग करा, म्हणजे एखाद्याने कोणाची हत्या केली, तर त्याला स्वतःच्या संरक्षणासाठी त्या नगरात पळून जाता येईल.
याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तुमच्या देशाच्या सीमांचा विस्तार करून संपूर्ण देश तुम्हाला दिला,
कारण मी आज तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन केले—तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती केली व त्यांच्या मार्गात आज्ञाधारकपणे चाललात—तर तुम्ही आणखी तीन शहरे निवडावीत.