मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण जेव्हा तुम्ही तुमच्या दासदासींना दास्यातून मुक्त कराल, तेव्हा वाईट वाटून घेऊ नये; कारण लक्षात ठेवा की, सहा वर्षात एखाद्या मोलकर्‍यासाठी जितका खर्च तुम्हाला आला असता, त्याच्या निम्म्याहूनही कमी खर्चात त्यांनी तुमचे काम केले आहे आणि त्यांना मुक्त करण्यासाठी तुम्ही जे काही कराल, त्याबद्दल याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतील.

  2. तुमच्या गुरांचे आणि शेरडामेंढरांचे प्रथम जन्मलेले नर, याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही पवित्र म्हणून वेगळे ठेवावेत. तुमच्या गुरांचे प्रथमवत्स तुम्ही शेतीच्या कामासाठी वापरू नयेत आणि तुमच्या मेंढरांच्या प्रथम वत्साची लोकर कातरू नये.

  3. प्रत्येक वर्षी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर, ते जे स्थान निवडतील त्या ठिकाणी त्यांचे मांस खावे.

  4. तरी, त्या प्राण्यात काही दोष आढळल्यास, म्हणजे तो लंगडा किंवा आंधळा असेल किंवा त्यामध्ये कोणतेही व्यंग असले तर याहवेह तुमच्या परमेश्वराला त्याचे अर्पण करू नये.

  5. अवीव हा महिना पाळावा आणि याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी वल्हांडण सण साजरा करावा, कारण त्यांनी अवीव महिन्यात तुम्हाला इजिप्त देशामधून रात्रीच्या वेळी बाहेर काढले.

  6. याहवेह तुमच्या परमेश्वराला तुमचे वल्हांडण सणाचे अर्पण म्हणजे शेरडेमेंढरे किंवा गाईबैल असावे आणि याहवेह त्यांच्या नावाच्या स्थापनेसाठी जे स्थान निवडतील तिथे त्याचे अर्पण करावे.

  7. याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या शहरांपैकी कोणत्याही शहरात तुम्ही वल्हांडणाच्या यज्ञपशूचे अर्पण करावयाचे नाही,

  8. तर ते आपल्या नावाच्या स्थापनेसाठी जे स्थान निवडतील तिथेच वल्हांडणाचा यज्ञपशू तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी अर्पावा, कारण त्याच वेळेला तुम्ही इजिप्त देशामधून बाहेर पडला होता.

  9. याहवेह तुमचे परमेश्वर निवडतील त्या स्थानी ते भाजावे आणि खावे. मग दुसर्‍या दिवशी सकाळी आपल्या तंबूत परतावे.

  10. तुम्ही सहा दिवस बेखमीर भाकर खावी आणि सातव्या दिवशी याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी सभा भरवावी आणि कोणतेही काम करू नये.

  11. मग याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर तुम्ही सप्ताहांचा उत्सव साजरा करावा. यावेळी तुम्ही तुम्हाला मिळालेल्या आशीर्वादांच्या प्रमाणात याहवेह तुमच्या परमेश्वराला स्वेच्छार्पणे वाहावीत.

  12. याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर त्यांनी आपल्या नावासाठी निवडलेल्या पवित्रस्थानी—तुम्ही, तुमचे पुत्र व कन्या, तुमचे दास व दासी, तुमच्या नगरातील लेवी आणि परदेशी, तुमच्यामध्ये राहणारे अनाथ आणि विधवा यांनाही उत्सवात सामील करून घ्यावे.

  13. हा सण सात दिवस याहवेह तुमचे परमेश्वर जे स्थान निवडतील तिथे साजरा करावा. कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला तुमच्या सर्व उत्पन्नात आणि हाती घेतलेल्या तुमच्या कामात आशीर्वादित केले यास्तव तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.

  14. वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर हजर व्हावे: बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण व मंडपांचा सण. या प्रत्येक प्रसंगी याहवेहसमोर रिक्तहस्ते येऊ नये:

  15. याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला ज्याप्रकारे आशीर्वादित केले आहे, त्या प्रमाणात तुम्ही प्रत्येकाने भेटवस्तू आणावी.

  16. याहवेह तुमचे परमेश्वर जी सर्व शहरे तुमच्या प्रत्येक गोत्राला देणार आहेत, त्या सर्व शहरांमध्ये न्यायाधीश आणि शास्ते यांची तुम्ही नेमणूक करावी व त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा.

  17. न्याय आणि केवळ न्यायाचीच कास तुम्ही धरावी, जेणेकरून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशाचा ताबा घेऊन तुम्ही तिथे वस्ती करू शकाल.

  18. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीशेजारी तुम्ही अशेरा मूर्तीचे लाकडी स्तंभ उभारू नका,

  19. आणि पूजास्तंभ उभारू नयेत, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराला त्यांचा अत्यंत तिटकारा आहे.

  20. तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला दोष अथवा व्यंग असलेला बैल किंवा मेंढरू यांचे अर्पण कदापि करू नये; कारण त्याचा त्यांना वीट आहे.

  21. समजा याहवेहने तुम्हाला दिलेल्या देशातील एखाद्या नगरात तुमच्यातील कोणी पुरुष अथवा स्त्री याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराविरुद्ध त्यांच्या दृष्टीने पातक करेल,

  22. तुमच्या न्यायालयात खटले येतात, ज्यांचा निवाडा करण्याचे काम तुमच्या आवाक्याबाहेरचे असेल—मग ते रक्तपात असो, फिर्याद अथवा मारामारी असोत—याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या स्थानी तुम्ही तो वाद न्यावा.

  23. ते आपला निर्णय देतील आणि ते सांगतील त्याप्रमाणे अगदी तंतोतंत तुम्ही करावे. याहवेहने निवडलेल्या स्थानी त्यांनी दिलेला निर्णय तुम्ही अगदी तंतोतंत पाळावा. त्यांनी तुम्हाला जे काही करण्यास सांगितले आहे ते सर्व करण्याची काळजी घ्या.

  24. याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेला, त्यावेळी पदावर असलेल्या न्यायाधीशाचा अथवा याजकांचा निर्णय न पाळण्याचे धाडस जो कोणी करेल, त्याला मृत्यूची शिक्षा दिली जावी. अशा रीतीने इस्राएलातून तुम्हाला ही दुष्टाई काढून टाकता येईल.

  25. याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशात तुम्ही याल व तो ताब्यात घ्याल आणि स्वतःशी म्हणाल, “इतर राष्ट्रांना जसा राजा आहे तसा आपल्यालाही असावा,”