मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे करावे, अशा रीतीने याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतनादाखल देत असलेल्या भूमीवर निरपराधी माणसांचे रक्त सांडल्याचा दोष तुमच्यावर येणार नाही.

  2. याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला वतनात देत आहेत, तो ताब्यात घेतल्यावर, आधीच्या माणसांनी ठेवलेल्या शेजार्‍याच्या जमीन हद्दीच्या खुणा कदापि बदलू नये.

  3. त्या दोन्हीही इसमांना याहवेहसमोर, त्यावेळी जबाबदार असलेल्या याजकांपुढे आणि न्यायाधीशांपुढे आणावे.

  4. जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूशी युद्ध करण्यास जाल आणि तुमच्यासमोर घोडे व रथ आणि तुमच्या सैन्यापेक्षा फारच मोठे शत्रुसैन्य पाहाल, तेव्हा त्यांना घाबरू नका. कारण ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशातून सुखरुपपणे बाहेर आणले, ते याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर असतील.

  5. कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर जात आहेत. ते तुमच्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध लढतील आणि तुम्हाला विजय प्राप्त करून देतील.”

  6. जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर ते शहर तुमच्या ताब्यात देतील, तेव्हा त्यातील सर्व पुरुषांना तुम्ही तलवारीने ठार मारावे.

  7. पण त्या शहरातील सर्व स्त्रिया, मुले, गुरे व सर्व संपत्ती तुम्ही स्वतःकरिता ठेवावी. ही संपत्ती जी याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या शत्रूकडून तुम्हाला देतील तिचा तुम्ही स्वतःसाठी उपयोग करावा.

  8. कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या वचनदत्त देशात असणार्‍या शहरातील कोणालाही तुम्ही जिवंत ठेऊ नये.

  9. हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी—यांचा समूळ नायनाट करावा—ही आज्ञा याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिली आहे.

  10. नाहीतर ते त्यांच्या दैवतांची उपासना करताना ज्या किळसवाण्या चालीरीती करतात त्या तुम्हाला शिकवतील व तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराविरुद्ध पाप कराल.

  11. याहवेह तुमच्या परमेश्वराने वतन म्हणून दिलेल्या देशात तुम्ही आल्यावर एखाद्या शेतामध्ये वध झालेला मनुष्यदेह तुम्हाला आढळला व त्याला कोणी मारले हे समजले नाही,

  12. यानंतर लेवी वंशातील याजक जवळ येतील, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना आपल्यासमोर सेवा करण्यासाठी याहवेहच्या नावाने आशीर्वाद देण्यासाठी व वाद आणि हल्ला यांचे निर्णय घेण्यासाठी निवडलेले आहे.

  13. हे याहवेह, ज्या तुमच्या इस्राएली लोकांना तुम्ही सोडविले आहे, त्या लोकांना तुम्ही क्षमा करा व निरपराधी माणसाच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवू नका.” मग या रक्तपाताचे प्रायश्चित्त होईल,

  14. आणि तुम्ही तुमच्यावरील निरपराधी माणसाच्या रक्तपाताचा दोष घालवून टाकाल, कारण याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले आहे.

  15. जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या शत्रूंना तुमच्या स्वाधीन करतील आणि त्यांना तुम्ही बंदिवान कराल,

  16. तर त्याचा मृतदेह रात्रभर तिथे ठेवू नये, तर त्याच दिवशी त्याचे दफन करावे; कारण जो कोणी खांबावर टांगलेला असेल, त्याच्यावर परमेश्वराचा शाप असतो. म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश वतन म्हणून देत आहे, तो तुम्ही भ्रष्ट करू नये.

  17. कोणत्याही स्त्रीने पुरुषाचा पोशाख घालू नये किंवा कोणत्याही पुरुषाने स्त्रीचा पोशाख घालू नये, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने असे करणे घृणित आहे.

  18. जो भग्नांड आहे किंवा ज्याच्या लिंगाचा छेद झाला आहे त्याने याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये.

  19. निषिद्ध विवाहबंधनापासून जन्मलेला अथवा त्यांच्या वंशातल्या अगदी दहाव्या पिढीपर्यंत कोणीही याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये.

  20. तसेच दहाव्या पिढीनंतर कोणाही अम्मोनी अथवा मोआब्याने याहवेहच्या सभेत कधीही प्रवेश करू नये.

  21. तरीही याहवेह तुमच्या परमेश्वराने बलामाचे ऐकले नाही, परंतु त्यांनी त्याच्या शापाचे तुमच्यासाठी आशीर्वादात रूपांतर केले, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हावर प्रीती करतात.

  22. त्यांच्यात जन्मलेल्या तिसर्‍या पिढीच्या संततीस याहवेहच्या सभेत प्रवेश करण्यास हरकत नाही.

  23. तुमचे रक्षण करण्यासाठी आणि तुमच्यापुढे तुमच्या शत्रूंना तुमच्या हाती देण्यासाठी, याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या छावणीमध्ये फिरत असतात. तुमची छावणी पवित्र असली पाहिजे, यासाठी की त्यांच्या दृष्टीस अमंगळता पडल्यास ते तुमच्यापासून दूर निघून जातील.

  24. वेश्येच्या कमाईचा अथवा पुमैथुन करणार्‍याच्या मिळकतीचा पैसा याहवेह तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात नवस फेडण्यासाठी कोणीही आणू नये; कारण हे दान व दान देणारी व्यक्ती या दोन्हीही गोष्टी याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ होत.

  25. तुम्ही एखाद्या परदेशीकडून व्याज घेऊ शकता, पण कोणाही इस्राएली बांधवाकडून घेऊ नका, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जेव्हा तुम्हाला वतन म्हणून ज्या देशात आणतील, तेव्हा तुम्ही केलेल्या प्रत्येक कार्याला आशीर्वाद देतील.