मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तर तुम्ही त्या ज्योतिष्याचे किंवा स्वप्नदर्शीचे शब्द ऐकू नका. कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर मनापासून प्रीती करता की नाही, हे पाहण्यासाठी परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहेत.

  2. याहवेह तुमच्या परमेश्वराचेच तुम्ही अनुसरण करावे व त्यांचेच भय बाळगावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, त्यांची वाणी ऐकावी; त्यांची सेवा करावी व त्यांनाच बिलगून राहावे.

  3. जो संदेष्टा किंवा स्वप्नदर्शी तुम्हाला बहकवील त्याला अवश्य जिवे मारावे, कारण ज्या याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला इजिप्त देशातील गुलामगिरीतून बाहेर काढले, त्यांच्याविरुद्ध बंड करण्यास त्याने तुम्हाला प्रवृत्त केले. तुम्ही स्वतःला या दुष्टाईपासून मुक्त केले पाहिजे.

  4. त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी, कारण ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वरापासून तुम्हाला फूस लावून दूर नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

  5. याहवेह तुमचे परमेश्वर वस्ती करण्यास देत असलेल्या एखाद्या शहरातून तुमच्या कानावर आले की,

  6. त्यानंतर युद्धात मिळालेल्या लुटीचा नगरातील रस्त्याच्या मधोमध ढीग करून त्याला आग लावावी आणि ते संपूर्ण नगर होमार्पण म्हणून याहवेह तुमच्या परमेश्वराला अर्पण करावे. हे नगर म्हणजे एक उजाड ठिकाण म्हणून कायम राहील. ते पुन्हा कधीही बांधले जाणार नाही,

  7. आणि निषिद्ध वस्तूंपैकी ज्या विनाशासाठी ठरविलेल्या आहेत त्यातील काहीही तुमच्या हातात राहू नये. मग याहवेहचा तीव्र क्रोध शमेल, ते तुमच्यावर दया करतील आणि तुम्हावर करुणा करतील. तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे ते तुम्हाला बहुगुणित करतील—

  8. कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची वाणी ऐकून, आज मी तुम्हाला ज्या आज्ञा देत आहे त्या पाळल्या आणि त्यांच्या दृष्टीने जे योग्य तेच केले आहे.

  9. याहवेह तुमच्या परमेश्वराची तुम्ही संतती आहात. मृतांसाठी स्वतःला जखमा करून घेऊ नका किंवा डोक्याचे मुंडण करून घेऊ नका,

  10. कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. पृथ्वीवरील इतर सर्व राष्ट्रांमधून तुम्हीच त्यांचा मौल्यवान ठेवा असावे म्हणूनच याहवेहने तुम्हाला निवडले आहे.

  11. आधीच मृत्यू पावलेले असे काहीही तुम्ही खाऊ नये. तुमच्या नगरात राहणार्‍या एखाद्या परकियाने ते खाण्यास हरकत नाही. किंवा परकियाला विकत द्यावा, परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. त्याच्या आईच्या दुधात करडाला कधीही शिजवू नये.

  12. धान्याचा, नवीन द्राक्षारसाचा व जैतुनाच्या तेलाचा दशांश आणि तुमच्या गुरांच्या व शेरडामेंढरांच्या प्रथम वत्सांनाही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर त्यांच्या नावाप्रित्यर्थ खाण्यासाठी, ते जे पवित्रस्थान निवडतील त्या ठिकाणी खा, म्हणजे तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे नेहमीच आदर करण्याचे शिकाल.

  13. परंतु जर ते ठिकाण खूप दूर असेल आणि तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराद्वारे आशीर्वादित झाला असाल आणि तुमचा दशांश घेऊन जाणे गैरसोईचे असेल (कारण जे ठिकाण याहवेह त्यांच्या नावाच्या स्थापनेसाठी निवडतील ते खूप दूर आहे),

  14. तर मग तुमचे दशांश चांदीच्या मोबदल्यात घ्या, ही चांदी तुमच्याबरोबर घ्या आणि याहवेह तुमचे परमेश्वर निवडतील त्या ठिकाणी जा.

  15. त्या चांदीने तुम्हाला आवडेल ते विकत घ्या: गाई, बैल, मेंढी, थोडा द्राक्षारस अथवा आंबलेले पेय आणि तुम्हाला हवे असलेले काहीही. त्या ठिकाणी याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासह खाऊन पिऊन आनंद करावा.

  16. म्हणजे लेवी वंशजांना (ज्यांना स्वतःचा वाटा अथवा वतन नाही) तो दशांश द्यावा किंवा परकियांना द्यावा अथवा तुमच्या नगरात असणार्‍या विधवांना आणि अनाथांना द्यावा. म्हणजे ते खाऊन तृप्त होतील आणि मग याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या हाताच्या कार्याला आशीर्वादित करतील.

  17. कर्जमाफीची प्रक्रिया अशी असावी: प्रत्येक सावकाराने आपल्याजवळ असलेल्या कोणाही इस्राएली बंधूचे कर्ज माफ करावे. त्यांना स्वतःच्या लोकांपैकी कोणाकडूनही पैसे घ्यावे लागणार नाहीत, कारण कर्जाची फेड करण्याची वेळ याहवेहने घोषित केली आहे.

  18. तरीसुद्धा तुमच्यात कोणीही दरिद्री असा राहू नये, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतनादाखल देऊ केलेल्या या देशात भरपूर आशीर्वाद देतील,

  19. जर तुम्ही पूर्णपणे याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेत राहाल आणि आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळाल तरच.

  20. कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने अभिवचन दिल्याप्रमाणे ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्ही अनेक राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्ही मात्र कर्ज घेणार नाही. तसेच तुम्ही अनेक राष्ट्रांवर राज्य कराल, पण ती राष्ट्रे तुम्हावर राज्य करणार नाहीत.

  21. परंतु याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला देत आहेत, त्यातील कोणत्याही नगरात कोणी इस्राएली बांधव गरीब असेल, तर त्यांच्याकरिता तुमचे हृदय कठोर करू नका किंवा तुमची मूठ बांधून ठेऊ नका.

  22. हा दुष्ट विचार मनात न आणण्याची खबरदारी घ्या: “कर्जमाफी करण्याचे सातवे वर्ष जवळ आले आहे.” म्हणून तुम्ही एखाद्या इस्राएली बांधवाबद्दल वाईट इच्छा दाखवू नका आणि मदत नाकारू नका. जर तो याहवेहकडे आपले गार्‍हाणे घेऊन गेला, तर ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.

  23. तुम्ही त्यांना उदारपणे दिले पाहिजे आणि त्याबद्दल तुम्ही अंतःकरणात कुरकुर करू नये; मग तुम्ही जे काही कराल आणि जे कार्य हातात घ्याल त्यात याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतील.

  24. तर तुम्ही तुमच्या गुरांच्या कळपातून, तुमच्या खळ्यातून, तुमच्या द्राक्षारसाच्या कुंडातून उदारहस्ते द्यावे. ज्याप्रकारे याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे त्याप्रकारे त्यांना द्या.

  25. स्मरण ठेवा, तुम्हीही इजिप्त देशामध्ये गुलाम होता आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमची सुटका केली. म्हणूनच मी आज तुम्हाला ही आज्ञा देत आहे.