मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तर याहवेह या सर्व राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून देतील आणि तुमच्यापेक्षा कितीही मोठी आणि बलवान राष्ट्र असोत, तुम्ही त्यांना आपल्या ताब्यात घ्याल.

  2. तुमच्याविरुद्ध कोणीही उभे राहू शकणार नाही. कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाविषयी तेथील लोकात ते भय आणि दहशत निर्माण करतील.

  3. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या ज्या आज्ञा आज मी तुम्हाला देणार आहे, त्या जर तुम्ही पाळल्या, तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल;

  4. आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा न मानल्यास, आज मी तुम्हाला ज्या मार्गाने जाण्याची आज्ञा देत आहे त्यापासून भटकून जाल आणि जी दैवते तुम्हाला माहीत नाहीत अशांचे अनुसरण करण्यास सुरुवात कराल, तर तुम्हाला शाप मिळेल.

  5. याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जेव्हा या देशाचा ताबा घेण्यासाठी आणतील, तेव्हा तुम्ही गरिज्जीम डोंगरावरून आशीर्वाद आणि एबाल डोंगरावरून शाप उच्चारावा.

  6. तुम्ही यार्देन नदी ओलांडून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेला देश काबीज करण्यास जात आहात. तुम्ही तो ताब्यात घ्याल आणि तिथे वस्ती कराल,

  7. याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने जो देश तुम्हाला ताब्यात घ्यावयास दिला आहे—तिथे तुम्ही या पृथ्वीवर जिवंत असेपर्यंत हे विधी व नियम काळजीपूर्वकपणे पाळावेत.

  8. याहवेह तुमच्या परमेश्वराची उपासना त्यांच्या पद्धतीने करू नका.

  9. उलट, तुमच्या सर्व गोत्रांच्या जागेतून याहवेह तुमचे परमेश्वर निवडील व त्या जागेला ते स्वतःचे नाव देतील, त्या ठिकाणी तुम्ही जावे;

  10. त्या ठिकाणी याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सान्निध्यात तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने भोजन करावे आणि तुम्ही हातात घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत आनंद कराल, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे.

  11. कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी दिलेल्या विश्रामस्थानी आणि वचनदत्त ठिकाणी अजून तुम्ही पोहोचला नाही.

  12. पण तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात राहू लागाल तेव्हा ते तुमच्या सभोवती असलेल्या सर्व शत्रूपासून सुरक्षित ठेवून तुम्हाला विश्रांती देतील.

  13. तेव्हाच तुम्ही तुमची सर्व होमार्पणे, यज्ञार्पणे, दशांश, नवसाची अर्पणे व स्वेच्छार्पणे—याहवेह तुमचे परमेश्वर स्वतःच्या नावाचे निवासस्थान म्हणून ज्या ठिकाणाची निवड करतील तिथे आणावीत.

  14. आणि त्या ठिकाणी तुम्ही, तुमचे पुत्र आणि कन्या, तुमचे दास व दासी आणि तुमच्या नगरातील लेवी, ज्यांना स्वतःचा कोणताही वाटा किंवा वतन नाही, या सर्वांसह—याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर आनंदोत्सव करावा.

  15. तुमच्या एका गोत्रातील याहवेहने नेमून दिलेल्या ठिकाणीच तुमचे होमबली अर्पावेत आणि मी तुम्हाला जे आज्ञापिले ते सर्वकाही करावे.

  16. तरीसुद्धा, याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या आशीर्वादाप्रमाणे तुम्ही तुमच्या नगरात तुमचे पशू ज्याप्रमाणे सांबर व हरिण मारून खाता त्याप्रमाणे पाहिजे तेवढे खा. विधिनियमानुसार अशुद्ध आणि शुद्ध असे दोघेही ते खाऊ शकतात.

  17. पण ही सर्व अर्पणे याहवेह तुमचे परमेश्वर निवडील त्या ठिकाणी तुमचे पुत्र, कन्या, तुमचे दास व दासी व तुमच्या शहरात राहणारे लेवी, या सर्वांसह तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर खावीत. तुम्ही जे करता त्या प्रत्येक सेवेबद्दल परमेश्वरापुढे आनंद करावा.

  18. याहवेह तुमच्या परमेश्वराने आपल्या वचनाप्रमाणे तुमच्या देशाची सीमा वाढविल्यावर, तुम्हाला मांस खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही म्हणाल, “मला मांस खावयाचे आहे,” तेव्हा तुम्ही मनसोक्त मांस खावे.

  19. याहवेह तुमच्या परमेश्वराने आपल्या नावासाठी निवडलेले स्थान तुमच्या घरापासून खूप दूर असेल, तर तुम्हाला जेव्हा इच्छा होईल, तेव्हा याहवेहने तुम्हाला दिलेल्या पशूंमधून किंवा मेंढरांमधून तुम्ही काहीही मारून खावे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते मांस तुम्ही तुमच्या शहरात तुम्हाला हवे तेवढे खावे.

  20. त्याचे सेवन करू नये, तर त्याने तुमचे आणि तुमच्यानंतर तुमच्या संततीचे सर्व बाबतींत कल्याण होईल, कारण याहवेहच्या दृष्टीने योग्य वाटणार्‍या गोष्टीच तुम्ही कराल.

  21. परंतु जी पवित्र अर्पणे करावयाची असतील व नवसाची दाने द्यावयाची असतील, ती घेऊन तुम्ही याहवेह जे स्थान निवडील, त्या स्थानी जावे.

  22. तिथे आपल्या होमबलीचे मांस व रक्त याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करावे. तुमच्या यज्ञपशूंचे रक्त याहेवह तुमच्या परमेश्वराच्या वेदीवर ओतावे आणि मांस खावे.

  23. या सर्व आज्ञा पाळण्याची तुम्ही खबरदारी घ्यावी. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे उत्तम आणि योग्य ते तुम्ही केले, तर तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.

  24. ज्या भूमीत तुम्ही राहणार आहात तेथील राष्ट्रांचा याहवेह तुमचे परमेश्वर नाश करतील. मग त्यांना तिथून घालवून दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी वस्ती करावी,

  25. त्यांच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची उपासना कदापि करू नये, कारण त्यांच्या दैवतांच्या उपासनेमध्ये ते अशी घृणित कृत्ये करतात, ज्यांचा याहवेह तिरस्कार करतात. ते आपल्या पुत्रांना जाळतात आणि कन्यांचा त्यांच्या दैवतांना होम करतात.