मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर करीत बोलू लागले व म्हणाले, “तुम्ही आम्हाला या रानात मरावे म्हणून इजिप्तमधून का आणले? येथे भाकर नाही! पाणी नाही! आणि हे बेचव अन्न आम्हाला नकोसे झाले आहे.”

  2. तेव्हा याहवेहने त्यांच्यामध्ये विषारी साप पाठविले; ते लोकांना चावले आणि पुष्कळ इस्राएली लोक मरण पावले.

  3. लोक मोशेकडे आले व म्हणाले, “याहवेहविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलून आम्ही पाप केले आहे. याहवेहने हे साप आमच्यापासून दूर घालवून द्यावे म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.

  4. तेव्हा याहवेहने मोशेला म्हटले, “सापाची एक प्रतिमा तयार कर आणि ती एका खांबावर टांग; ज्याला साप चावेल त्या व्यक्तीने खांबावर टांगलेल्या सापाकडे पाहिल्यास तो जगेल.”

  5. यावरून याहवेहच्या युद्धाच्या पुस्तकात म्हटले आहे: “…सूफाहतील वाहेब व आर्णोनाचे ओहोळ

  6. तिथून ते बैर म्हणजे विहीर या ठिकाणाकडे निघाले. ज्या ठिकाणी याहवेह मोशेला म्हणाले होते, “लोकांना बोलव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.”

  7. याहवेहने मोशेला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्‍यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता, याचे तू जसे केले तसेच याला कर.”

  8. बलाम त्यांना म्हणाला, “आज रात्री येथे मुक्काम करा आणि याहवेह मला जे काही सांगतील ते मी तुम्हाला कळवेन.” म्हणून मोआबी सरदार त्याच्याकडे राहिले.

  9. परमेश्वराने बलामाकडे येऊन त्याला विचारले, “तुझ्याबरोबर हे पुरुष कोण आहेत?”

  10. बलाम परमेश्वराला म्हणाला, “सिप्पोरचा पुत्र बालाक, मोआबाच्या राजाने मला हा संदेश पाठवला आहे:

  11. परंतु परमेश्वर बलामाला म्हणाले, “त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. त्या लोकांना तू शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.”

  12. सकाळी उठून बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “तुमच्या आपल्या देशाला परत जा, कारण मी तुमच्याबरोबर जाण्यास याहवेहने नाकारले आहे.”

  13. परंतु बलामाने त्यांना उत्तर दिले, “बालाकाने जरी मला त्याच्या राजवाड्यातील सर्व चांदी आणि सोने दिले, तरीही याहवेह माझ्या परमेश्वराच्या आज्ञेपलीकडे मी काहीही कमी किंवा जास्त करू शकत नाही.

  14. तरी आजची रात्र येथे राहा, म्हणजे याहवेह मला अजून काय सांगतात ते मला कळेल.”

  15. त्या रात्री परमेश्वर बलामाकडे येऊन म्हणाले, “कारण हे लोक तुला बोलवायला आले आहेत, तू त्यांच्याबरोबर जा, परंतु केवळ मी तुला जे सांगेन तेच कर.”

  16. परंतु तो निघाला त्यावेळी परमेश्वराचा राग पेटला आणि त्याला अडविण्यासाठी याहवेहचा दूत वाटेत उभा राहिला. बलाम आपल्या गाढवीवर स्वार होता व त्याचे दोन सेवक त्याच्याबरोबर होते.

  17. जेव्हा याहवेहचा दूत उपसलेली तलवार हातात घेऊन वाटेत उभा आहे असे गाढवीने पाहिले, तेव्हा ती वाटेतून वळून शेतात गेली. बलामाने तिला मारून पुन्हा वाटेवर आणले.

  18. नंतर याहवेहचा दूत द्राक्षमळ्यांच्या मधील अरुंद वाटेवर उभा राहिला, त्याच्या दोन्ही बाजूंना भिंती होत्या.

  19. जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, ती भिंतीला घसटली व बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला. म्हणून त्याने गाढवीला पुन्हा मारले.

  20. नंतर याहवेहचा दूत पुढे जाऊन जिथे उजवीकडे किंवा डावीकडे वळायला जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला.

  21. जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, बलाम तिच्यावर बसलेला असतानाच ती त्याच्यासहच खाली बसली आणि तो रागावला व तिला काठीने मारले.

  22. तेव्हा याहवेहने त्या गाढवीचे मुख उघडले, व ती बलामाला म्हणाली, “तू मला तीन वेळा मारावेस असे मी काय केले आहे?”

  23. तेव्हा याहवेहने बलामाचे डोळे उघडले आणि त्याने रस्त्यावर तलवार उपसून उभे असलेल्या याहवेहच्या दूताला पाहिले आणि तो नमन करून पालथा पडला.

  24. याहवेहच्या दूताने बलामाला विचारले, “तू तुझ्या गाढवीला असे तीन वेळा का मारलेस? मी तुला अडविण्यास आलो कारण माझ्यासमोर तुझा मार्ग विपरीत आहे.

  25. बलाम याहवेहच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे. मला अडवावे म्हणून तुम्ही वाटेत उभे आहात हे मला समजले नाही. मग आता जर हे तुम्हाला आवडले नाही, तर मी माघारी जाईन.”