मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “म्हणून हे यिर्मयाह, इतःपर या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, त्यांच्यासाठी रडू नकोस अथवा विनवण्याही करू नकोस; कारण अखेरीस निराशेने व्याकूळ होऊन ते माझ्यापुढे पदर पसरतील. परंतु मी त्यांचे ऐकणार नाही.

  2. “माझी प्रिया माझ्या मंदिरात काय करीत आहे? इतरांसह मिळून ती तिच्या दुष्ट कारस्थानाची योजना करीत आहे का? तुमच्या अर्पणाचे शुद्धीकरण करून तुमची शिक्षा परतवू शकाल का? जेव्हा तुम्ही तुमच्या दुष्ट योजना पार पाडण्यात व्यस्त राहता, तेव्हा तुम्ही आनंदित होता.”

  3. याहवेह तुम्हाला बहरलेला जैतून वृक्ष म्हणत असत सुंदर आकाराच्या फळांनी भरलेला. परंतु एखाद्या वादळाच्या भयंकर गर्जनेने ते आता त्याला अग्नीने भस्म करतील, आणि त्याच्या फांद्या मोडून जातील.

  4. सर्वसमर्थ याहवेह, ज्यांनी तुमचे रोपण केले, त्यांनी तुमचा सर्वनाश करण्याची आज्ञा दिली आहे, कारण इस्राएल व यहूदीया या दोन्ही लोकांनी दुष्टपणा केला आहे आणि बआलापुढे धूप जाळून माझा क्रोधाग्नी भडकविला आहे.

  5. याहवेहने त्यांचे सर्व कारस्थान मला सांगितले, म्हणून ज्यावेळी त्यांनी ते काय करीत आहेत हे मला दाखविले, मला ते आधीच कळले होते.

  6. सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमत्तेने न्याय करता मन व अंतःकरणाची परीक्षा घेता, त्यांच्यावरील तुम्ही घेतलेला सूड मला स्वतःच्या नजरेने बघू द्या, कारण माझ्या समस्या मी तुमच्याकडे सोपविल्या आहेत.

  7. म्हणून अनाथोथच्या लोकांविषयी, जे माझा जीव घेण्याची धमकी देतात, ते म्हणतात “याहवेहच्या नावाने भविष्यवाणी करू नको, नाहीतर आमच्या हातून तुझा जीव जाईल;”

  8. म्हणून सर्वसमर्थ याहवेहने मला असे उत्तर दिले: “मी त्यांना शिक्षा देईन. त्यांचे पुरुष तलवारीस बळी जातील, त्यांचे पुत्र व कन्या उपासमारीने मरतील.

  9. त्यांच्यातील एकही जिवंत राहणार नाही. कारण त्यांच्या शिक्षेचे वर्ष येताच मी अनाथोथच्या लोकांवर अरिष्ट आणेन.”

  10. हे याहवेह, मी तुमच्यापुढे जेव्हा निवाड्यासाठी वाद आणतो, तेव्हा तुम्ही मला नेहमी धार्मिकतेने वागविता. तरी देखील मला तुमच्या न्यायनिवाड्याबद्धल बोलू द्या: वाईट माणसे एवढी समृद्ध का असतात? सर्व विश्वासहीन लोक सुखी का असतात?

  11. तुम्हीच त्यांचे रोपण केले आणि ते मुळावले; ते वाढतात व फलवंत होतात. तुमचे नाव सतत त्यांच्या मुखात असते परंतु त्यांच्या अंतःकरणापासून तुम्ही फार दूर असता.

  12. पण याहवेह, तुम्ही मला ओळखता; मला बघता व तुमच्याबद्दल माझ्या विचारांची परीक्षा घेता. मेंढरांना कत्तलखान्याकडे फरफटत न्यावे तसे त्यांना न्या! कत्तलीच्या दिवसासाठी त्यांना वेगळे करा!

  13. “मी माझ्या लोकांचा त्याग करेन, माझ्या वारसांचा परित्याग करेन; माझ्या अतिप्रियजनांना मी त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन.

  14. माझे वारस माझ्याकरिता जणू वनातील सिंहिणीप्रमाणे झाले आहेत. ती माझ्यावर गर्जना करते; म्हणून मी तिचा तिरस्कार करतो.

  15. माझे वारसदार एखाद्या ठिपकेदार पक्ष्यासारखे झाले नाहीत का, त्यांच्यावर इतर हिंस्र पक्ष्यांनी चहूबाजूंनी हल्ले चढविले नाहीत का? जा आणि त्यांना गिळंकृत करण्यासाठी सर्व वनपशूंना एकत्र कर.

  16. अनेक मेंढपाळ माझ्या द्राक्षमळ्यांची नासाडी करतील मळा पायाखाली तुडवतील; ते माझा रमणीय मळा ओसाड करतील.

  17. माझ्यापुढे कोरडा व उद्ध्वस्त करून तो ओसाड केला जाईल, संपूर्ण भूमी वैराण करण्यात येईल, कारण तिची राखण करणारे कोणीही नसेल.

  18. उजाड वाळवंटाच्या टोकांवर संहार करणारे झुंडीने येतील, कारण याहवेहची तलवार भूमीला गिळून टाकेल, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कोणीही सुरक्षित राहणार नाही.

  19. माझे लोक गहू पेरतील पण काट्यांची कापणी करतील; ते कष्ट करून स्वतःला झिजवतील, पण त्याचा काही फायदा होणार नाही. कारण याहवेहच्या भयंकर क्रोधामुळे ते लज्जेचे पीक गोळा करतील.”

  20. म्हणून याहवेह असे म्हणतात: “माझ्या सर्व दुष्ट शेजाऱ्यांनी, मी माझ्या इस्राएली लोकांना जो देश वतन म्हणून दिला, तो बळकावला. त्यांना मी त्यांच्या भूमीतून उखडून टाकेन आणि मी यहूदीयाच्या लोकांना त्यांच्यामधून घालवून देईन.

  21. परंतु त्यांना घालवून दिल्यानंतर मी पुन्हा सर्वांवर करुणा करेन आणि तुमच्यातील प्रत्येक मनुष्याला परत तुमच्या वतनात, तुमच्या देशात आणेन.

  22. आणि जर हे लोक माझे मार्ग शिकतील व माझ्या नावाने शपथ घेऊन म्हणतील, ‘जिवंत याहवेहची शपथ,’ जरी त्यांनी माझ्या लोकांना बआल दैवताच्या नावाची शपथ घेण्यास शिकविले—ते माझ्या लोकांमध्ये स्थिर केल्या जातील.

  23. परंतु माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार्‍या राष्ट्राला मी पूर्णपणे मुळासकट उपटून टाकेन व नष्ट करेन,” असे याहवेह जाहीर करतात.

  24. याहवेहने मला म्हटले, “जा आणि तागाचा एक कमरबंद विकत घे. तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.”

  25. तेव्हा याहवेहच्या सांगण्याप्रमाणे मी एक कमरबंद विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला.