मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जो प्रौढी मिरवतो त्याने याविषयी प्रौढी मिरवावी मी याहवेह, जो कृपा करणारा पृथ्वीवर न्याय आणि नीती करणारा आहे, असे त्यांनी मला खरोखर समजावे, ह्यात मला संतोष आहे, असे याहवेहने म्हणतात.”

  2. याहवेह असे म्हणतात, “असे दिवस येत आहेत, मी त्या सर्वांना शिक्षा करेन, ज्यांची केवळ शारीरिक सुंता झाली आहे—

  3. हे इस्राएलच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका.

  4. याहवेह असे म्हणतात: “इतर राष्ट्रांचे मार्ग शिकू नका जरी त्यांच्यामुळे इतर राष्ट्रे भयभीत होतात, तरी आकाशाच्या चिन्हांनी तुम्ही भयभीत होऊ नका.

  5. हे याहवेह, तुमच्यासारखे कोणीही नाही. कारण तुम्ही महान आहात, आणि तुमचे नाव अति सामर्थ्यशाली आहे.

  6. हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे भय नाही असा कोण आहे? अशा श्रद्धेच्या योग्य केवळ तुम्हीच आहात, सर्व राष्ट्रातील सुज्ञ पुढाऱ्यांमध्ये आणि जगातील सर्व राज्यांमध्ये तुमच्यासारखे दुसरे कोणीच नाही.

  7. परंतु याहवेह हेच खरे परमेश्वर आहेत; ते जिवंत परमेश्वर आहेत, ते सनातन राजा आहेत. जेव्हा ते क्रोधित होतात, सर्व पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या प्रकोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.

  8. परंतु परमेश्वराने त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली; संपूर्ण विश्वाची प्रस्थापना त्यांच्या सुज्ञतेने केली आणि त्यांच्या बुद्धीने आकाश विस्तीर्ण केले.

  9. जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघगर्जना करतात; ते मेघांना पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उभारतात. ते विजा आणि पाऊस पाठवितात आणि त्यांच्या भांडारातून वारा बाहेर काढतात.

  10. परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही. कारण तेच सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, इस्राएलसहित, ते लोक त्यांचे वारस आहेत; सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे.

  11. कारण याहवेह असे म्हणतात: “जे या देशाचे रहिवासी आहेत त्यांना यावेळी मी तुम्हाला या देशातून बाहेर भिरकावून देईन; त्यांच्यावर महासंकटे आणेन म्हणजे ते सहजगत्या पकडल्या जातील.”

  12. माझे मेंढपाळ असमंजस आहेत कारण ते याहवेहचे मार्गदर्शन घेत नाहीत; म्हणून ते समृद्ध होत नाहीत आणि त्यांच्या सर्व कळपांची पांगापांग होते.

  13. याहवेह, मला माहीत आहे की मानवाचे जीवन त्यांच्या हातात नाही; ते स्वतःचे मार्गदर्शन करू शकत नाहीत.

  14. हे याहवेह मला अनुशासित करा, परंतु ते रास्तपणे करा— रागाने करू नका, नाहीतर मी नाहीसा होईन.

  15. या राष्ट्रांवर आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करा जे तुमचा अधिकार मान्य करीत नाहीत, जे लोक तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत. त्यांनी याकोबाला गिळले आहे; त्याला संपूर्णपणे गिळंकृत केले आहे आणि त्यांच्या मातृभूमीचा नायनाट केला आहे.

  16. याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले:

  17. त्यांना सांग मी इस्राएलचा परमेश्वर याहवेह असे म्हणतो: या कराराच्या अटींचे पालन न करणारा मनुष्य शापित आहे—

  18. ‘इजिप्तच्या गुलामगिरीतून, लोखंडी भट्टीतून मी त्यांना सोडवून बाहेर आणले तेव्हा मी त्यांना हे नियम सांगितले होते.’ मी म्हटले ‘माझ्या आज्ञा व मी जे सुचविले ते पालन करा, आणि मग तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा परमेश्वर होईन.

  19. तेव्हा मी तुमच्या पूर्वजांना वाहलेली शपथ पूर्ण करेन, आणि दूध व मध वाहणारा देश’ ज्यात आज तुम्ही राहत आहात तो मी तुम्हाला देईन.” मी उत्तर दिले, “याहवेह, आमेन.”

  20. नंतर याहवेहने मला म्हटले, “यहूदीयाच्या प्रत्येक नगरात व यरुशलेमच्या रस्त्यातून जा व हा संदेश घोषित कर: ‘कराराच्या अटी ऐकून घ्या व त्यांचे पालन करा.

  21. कारण तुमच्या पूर्वजांना मी इजिप्तमधून बाहेर आणले तेव्हापासून मी त्यांना पुन्हापुन्हा बजावून सांगितले होत, “तुम्ही माझी आज्ञा पाळा.”

  22. परंतु त्यांनी ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट प्रत्येकजण आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टीपणाने करीत राहिला. परंतु माझ्या ज्या आज्ञा पाळण्यास त्यांना सांगितले होते ते नाकारले म्हणून करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व श्राप मी त्यांच्यावर आणले.’ ”

  23. नंतर याहवेह मला म्हणाले, “यहूदीया व यरुशलेम येथील लोकांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे.

  24. ते त्यांच्या पूर्वजांच्या पापाकडे परतले आहेत, ज्यांनी माझे वचन पाळणे नाकारले होते. त्यांनी इतर दैवतांचे अनुसरण करून सेवा केली. त्यामुळे यहूदीया व इस्राएलाच्या पूर्वजांशी मी केलेला करार मोडला आहे.

  25. म्हणून याहवेह असे म्हणाले: ‘मी त्यांच्यावर घोर आपत्ती घेऊन येणार त्यातून त्यांची सुटका होणार नाही. ते रडून दयेसाठी आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही.