मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु मी म्हटले, “अरेरे, हे सार्वभौम याहवेह! त्यांचे संदेष्टे त्यांना सांगतात, ‘तलवार किंवा दुष्काळ निश्चितच येणार नाहीत. मी या ठिकाणी तुम्हाला खात्रीने स्थायी शांतता देईन.’ ”

  2. त्यावर याहवेहने मला म्हटले, “संदेष्टे माझ्या नावाने असत्य संदेश सांगत आहेत. मी काही त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना नेमले नाही वा त्यांच्याशी बोललो नाही. खोट्या दृष्टान्तावरून, प्रकटीकरणांवरून, व्यर्थ शकुनविद्येवरून आणि स्वतःच्या मनाच्या भ्रांतीवरून ते तुम्हाला खोटी भविष्ये सांगतात.”

  3. म्हणून माझ्या नावाने भविष्यवाणी करणार्‍यांबद्दल याहवेह असे म्हणतात: “मी पाठविले नसतानाही ‘तलवार किंवा दुष्काळ या भूमीला स्पर्श करणार नाही,’ असे बोलणारे हे संदेष्टेच तलवारीला व दुष्काळाला बळी पडतील.

  4. आणि हे लबाड लोक ज्यांना संदेश देतात तेही तलवारीला व दुष्काळाला बळी पडून यरुशलेमच्या रस्त्यांवर फेकून दिले जातील आणि त्यांना, पत्नी, पुत्र व कन्यांना मूठमाती द्यायलाही कोणी राहणार नाही. कारण मी त्यांच्यावर घोर विपत्ती पाठविणार ज्याला ते पात्र आहेत.

  5. “हे वचन तू त्यांना सांग: “ ‘रात्रंदिवस माझ्या नेत्रातून अश्रू वाहू दे मी माझे रडणे थांबविणार नाही; माझे लोक, कुमारी कन्या, तिच्यासाठी, कारण ती जखमांनी घायाळ होऊन तुडविली गेली आहे.

  6. नगराबाहेर जाऊन पाहावे तर, मी तलवारीला बळी पडलेल्यांची प्रेते बघतो; नगरातून गेलो तर उपासमारीला बळी पडलेले दिसतात. संदेष्टे व याजक त्यांना माहीत नसलेल्या देशात गेले आहेत.’ ”

  7. तुम्ही यहूदीयाचा पूर्णपणे त्याग केला आहे काय? सीयोनाचा तुम्हाला वीट आला आहे काय? तुम्ही आम्हाला अशी वेदना का दिली म्हणजे आम्हाला कधीही आरोग्य मिळणार नाही? आम्ही शांतीची आशा केली होती पण त्यातून काहीही चांगले निष्पन्न झाले नाही, आरोग्य मिळण्याच्या ऐवजी सर्वत्र दहशतच पसरली आहे.

  8. हे याहवेह, आम्ही आमचा दुष्टपणा पदरी घेतो आणि आमच्या पूर्वजांचा अपराध स्वीकार करतो; आम्ही निश्चितच तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

  9. तुमच्या नामासाठी आमचा तिरस्कार करू नका; तुमच्या गौरवी राजासनाची अप्रतिष्ठा करू नका. आमच्यासह केलेल्या कराराची आठवण करा आणि तो मोडू नका.

  10. या मूर्तिपूजक राष्ट्रातील कोणते व्यर्थ दैवत पाऊस पाडू शकेल का? आकाश स्वतःहून वर्षाव करू शकेल काय? हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, हे तुमच्याशिवाय कोणीच करणार नाही. म्हणूनच आमची आशा तुमच्यावरच आहे, तुम्हीच हे सर्व करू शकता.

  11. तेव्हा याहवेहने मला म्हटले: “जर मोशे व शमुवेल माझ्यासमोर येऊन उभे राहिले तरीसुद्धा या लोकांकरिता माझे हृदय द्रवित होणार नाही. त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालवून दे! त्यांना जाऊ दे!

  12. आणि जर त्यांनी तुला विचारले, ‘आम्ही कुठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: “ ‘ज्यांना मरणासाठी नेमले आहे, त्यांनी मरणाकडे जावे; तलवारीने ज्यांचा वध व्हावयाचा आहे, त्यांनी तलवारीकडे जावे; उपासमारीने जे मरणार आहेत, त्यांनी दुष्काळाकडे जावे; जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत, त्यांनी बंदिवासात जावे.’

  13. “मी त्यांच्यावर चार प्रकारचे संहारक नेमणार आहे,” याहवेहने असे म्हटले, “ठार करण्यासाठी तलवार, फरपटून नेण्यासाठी कुत्री, खाऊन नष्ट करण्यासाठी पक्षी व हिंस्र श्वापदे.

  14. यहूदीयाचा राजा हिज्कीयाहचा पुत्र मनश्शेह, याने यरुशलेममध्ये जे अनाचार केले, त्याबद्दल मी केलेले शासन पाहून सर्व जगातील राष्ट्रांना दहशत बसेल.

  15. तुम्ही मला नाकारले आहे,” याहवेह असे म्हणतात. “तुमची घसरण सुरूच आहे. म्हणून मी माझे हात तुमच्याविरुद्ध करेन व तुमचा नाश करेन; विनाश राखून ठेवण्याचा मला वीट आला आहे.

  16. मी शहरांच्या वेशींमध्येच त्यांना पाखडेन. मी विध्वंस आणि शोककळा माझ्या लोकांवर आणेन, कारण ते आपल्या वाईट मार्गापासून वळले नाही.

  17. मी त्यांच्या विधवांची संख्या समुद्राच्या वाळूपेक्षा अगणित करेन. मी त्यांच्या तरुणांच्या आईविरुद्ध भर दुपारी मृत्यूचा विनाशक पाठवेन; अचानक त्यांच्यावर वेदना आणि क्लेश ओढवतील,

  18. सात मुलांची माता बेशुद्ध होऊन मृत्युमुखी पडेल. भरदिवसा तिचा सूर्य मावळेल; आता ती अपमानित आणि लज्जित होऊन बसेल. त्यातून वाचलेल्यांना त्यांच्या वैर्‍यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन,” याहवेहने असे जाहीर करतात.

  19. याहवेह म्हणाले, “चांगल्या कार्यासाठी मी निश्चितच तुझी सुटका करेन; तुझे शत्रू संकटात आणि क्लेशदायक समयी तुला विनवण्या करतील असे मी करेन.

  20. हे याहवेह, तुम्हाला सर्व कळते; माझी आठवण ठेवा व माझी काळजी घ्या. माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांचा सूड घ्या, तुम्ही सहनशील आहात—मला दूर करू नका; विचार करा तुमच्यामुळे मला किती निंदा सहन करावी लागते.

  21. जेव्हा तुमचे वचन माझ्याकडे आले मी ते गिळंकृत केले; ते माझा आनंद आणि माझ्या हृदयाचा उल्लास होते, याहवेह, सर्वसमर्थ परमेश्वरा, कारण मी तुमचे नाव धारण केले आहे.

  22. मी चैन करण्याऱ्या लोकांमध्ये मुळीच बसलो नाही, त्यांच्यासोबत कधीच आनंद केला नाही; मी एकटाच होतो, कारण तुमचा हात माझ्यावर होता आणि तुम्ही मला त्वेषाने भरले आहे.

  23. माझ्या दुःखाचा निश्चित अंत का होत नाही आणि माझ्या जखमा त्रासदायक आणि असाध्य का आहेत? तुम्ही मला एका फसविणाऱ्या झऱ्यासारखे आहात, जणू एखादा बिनपाण्याचा ओढा.

  24. म्हणून याहवेहने असे म्हणतात: “जर तू पश्चात्ताप करशील, तर मी तुला पुनर्स्थापित करेन म्हणजे तू माझी सेवा करशील; जर तू अयोग्य नव्हे, तर योग्य शब्द उच्चारशील, मग तू माझ्यावतीने बोलणारा होशील. या लोकांना तुझ्याकडे परत येऊ दे, परंतु तू त्यांच्याकडे वळू नको.

  25. मी तुला या लोकांसाठी भिंत बनवेन, कास्याच्या तटबंदीची भिंत; ते तुझ्याशी युद्ध करतील परंतु ते तुझ्यावर प्रभावी होणार नाहीत, तुला सोडविण्यास व तुझा बचाव करण्यास मी तुझ्यासोबत आहे,” याहवेह असे म्हणतात.