मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यावेळी या लोकांना व यरुशलेमला सांगितल्या जाईल, “वाळवंटातील उजाड टेकड्यांवरून दाहक वारा माझ्या लोकांकडे येईल, परंतु पाखडणे किंवा स्वच्छ करण्यासाठी नाही.

  2. तो झंझावाती वारा माझ्याकडून येईल. आता मी त्यांच्याविरुद्ध माझा न्याय जाहीर करेन.”

  3. त्यांनी तिला एखाद्या शेताच्या राखणदारांसारखे घेरले आहे, कारण तिने माझ्याविरुद्ध बंड केले आहे,’ ” असे याहवेह म्हणतात.

  4. “माझे लोक मूर्ख आहेत; ते मला ओळखत नाही. ते असमंजस मुलांसारखे आहेत. त्यांना समज अजिबात नाही. दुष्ट कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे; त्यांना चांगले कार्य करावयाचे माहीत नाही.”

  5. सुपीक जमीन ही एक वाळवंट झाली होती; आणि येथील सर्व नगरे उद्ध्वस्त होती याहवेहच्या समोर, त्यांच्या भयंकर क्रोधाग्नीपुढे.

  6. याहवेह असे म्हणतात: “संपूर्ण भूमी उजाड होईल, तरीपण मी त्याचा पूर्ण अंत करणार नाही.

  7. यास्तव पृथ्वी शोक करेल आणि आकाशात काळोख होईल, कारण मी बोललो आहे, त्यात आता बदल होणार नाही, मी निर्णय घेतला आहे आणि मागे फिरणार नाही.”

  8. एक स्त्री प्रसूतीच्या वेळी ओरडते तसा मला आवाज ऐकू आला, जणू तिला पहिल्यांदा मूल होते, अशा प्रकारचा आक्रोश— सीयोनच्या कन्येचा श्वास कोंडला आहे, ती आपले हात पसरून म्हणत आहे, “हाय रे हाय! मला मूर्च्छा येत आहे; माझा जीव मी घातक्यापुढे ठेवला आहे.”

  9. “यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावरून येजा कर, शोध घे व विचार कर, तिच्या चौकात तपास कर. असा एक जरी मनुष्य आढळला जो प्रामाणिक व सत्यशोधक आहे, तरी मी या नगराला क्षमा करेन.

  10. ‘जिवंत याहवेहची शपथ’ असे ते ओरडून म्हणतात पण ते ही खोटीच शपथ घेतात.”

  11. हे याहवेह, तुमची दृष्टी सत्याला शोधत नाही का? तुम्ही त्यांना शिक्षा केली, पण त्यांना मुळीच वेदना झाली नाही. तुम्ही त्यांना चिरडून टाकले, पण ते आपल्या पापांपासून मागे वळण्याचे नाकारतात. आपली मुखे त्यांनी खडकासारखी कठीण केली व पश्चात्ताप न करण्याचे त्यांनी ठरविले.

  12. मी विचार केला, “हे फार गरीब आहेत; ते निर्बुद्ध आहेत, त्यांना त्यांच्या याहवेहचे मार्ग काय आहे हे ठाऊक नाही त्यांना त्यांच्या परमेश्वराच्या अपेक्षा काय आहेत हे माहीत नाही.

  13. मी त्यांच्या पुढार्‍यांकडे जाईन व त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना निश्चितच याहवेहचे मार्ग ठाऊक आहेत. त्यांना त्यांच्या परमेश्वराची अपेक्षा काय आहे हे ठाऊक आहे.” पण त्या सर्वांनी एकमताने माझे जू झिडकारून टाकले आहे. आणि माझी बंधने तोडून टाकली आहेत.

  14. “मी तुम्हाला का क्षमा करू? तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत. मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला, तरी त्यांनी व्यभिचार केला वेश्यागृहात गर्दी केली.

  15. हे सर्व पाहून मी त्यांना शिक्षा करू नये काय? ही याहवेहची जाहीर वाणी आहे. अशा दुष्ट राष्ट्राचा मी स्वतः प्रतिकार करू नये काय?

  16. “त्यांच्या द्राक्षमळ्यातून फिरा आणि त्यांचा नाश करा. पण त्यांचा पूर्णपणे नाश करू नका. वेलीच्या फांद्या तोडून टाका, कारण हे लोक याहवेहचे नाहीत.

  17. इस्राएलच्या लोकांनी आणि यहूदीयाच्या लोकांनी माझा घोर विश्वासघात केला आहे,” असे याहवेह म्हणतात.

  18. ते याहवेहबद्दल खोटे बोलतात; ते म्हणतात, “ते काहीही करणार नाहीत! आमच्यावर अरिष्ट कोसळणारच नाही; आम्ही दुष्काळ आणि लढाई बघणारही नाही.

  19. म्हणून सर्वसमर्थ याहवेह परमेश्वर असे म्हणतात: “कारण या लोकांनी हे शब्द उच्चारले आहेत, मी तुमच्या मुखात माझे शब्द भडकत्या अग्नीसारखे करेन आणि जो या लोकांना सरपणाच्या लाकडांप्रमाणे जाळून भस्म करेल.”

  20. याहवेह म्हणतात, “हे इस्राएलच्या लोकांनो, मी तुमच्याविरुद्ध एका दूरच्या बलाढ्य व प्राचीन राष्ट्रास उभे करेन— त्यांची भाषा तू जाणत नाही, त्यांची वाणी तुला समजत नाही.

  21. “परंतु त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे निःपात करणार नाही,” असे याहवेह म्हणतात.

  22. जेव्हा तुझे लोक विचारतील, “याहवेह आम्हाला हे असे शासन का करीत आहे?” तेव्हा तू सांगशील, “तुम्ही त्यांचा त्याग केलात, आणि स्वदेशातच तुम्ही परकीय दैवतांचे भक्त झालात, तर आता परकीय लोकांच्या देशात तुम्ही त्यांची सेवा कराल.

  23. तुम्ही माझे भय बाळगू नये काय?” असे याहवेह विचारतात. “माझ्या उपस्थितीत तुम्ही थरथर कापू नये काय? सागराच्या सीमारेषा वाळूने मर्यादित मीच केल्या आहेत, एक अनंतकाळची मर्यादा जी ओलांडता येत नाही, म्हणूनच सागर कितीही उसळले, तरी ते विजयी होऊ शकत नाही; त्यांनी कितीही गर्जना केल्या, तरी या सीमांचे त्यांना उल्लंघन करता येत नाही.

  24. ते स्वतःस असे म्हणत नाहीत, ‘आपण आपल्या याहवेह परमेश्वराचे भय धरू, जे आपल्याला प्रत्येक वर्षी वसंतॠतूत, हिवाळ्यात पाऊस देतात, जे आपल्याला निश्चित वेळेवर पीक देतात.’

  25. “माझ्या लोकांमध्ये दुष्ट लोक आहेत शिकारी जसा आडोशाला दबा धरून पक्षांची वाट बघतो, तसे ते माणसांना पकडण्यासाठी सापळे लावतात.