God
God चा उल्लेख असलेली वचने
त्यांनी असे विचारले नाही, ‘ज्यांनी आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले आणि वैराण प्रदेशातून मार्गस्थ केले, वाळवंटातून व दऱ्याखोऱ्यातून नेले, निर्जल आणि गडद अंधकाराच्या भूमीतून नेले, ज्या प्रदेशातून कोणीही प्रवास करीत नाही व जिथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हाला नेले, ते याहवेह कुठे आहेत?’
मी तुम्हाला एका सुपीक भूमीवर घेऊन आलो, तिची उपज आणि तिचे उत्तमोत्तम पदार्थ खाण्यासाठी आणले. परंतु तुम्ही ती भूमी अशुद्ध केली आणि माझे वतन अमंगळ केले.
याजकांनी विचारले नाही, ‘याहवेह कुठे आहेत?’ नियमांचा अभ्यास करणाऱ्यांना माझी ओळख नव्हती; त्यांचे अधिपती तर माझ्याविरुद्ध बंड केले आहे. संदेष्टे बआल दैवताद्वारे संदेश देऊ लागले, आणि व्यर्थ मूर्तीचे अनुसरण करू लागले.
“यास्तव मी तुमच्याविरुद्ध आरोप करणार आहे,” असे याहवेह जाहीर करतात. “आणि मी तुमच्या मुलांच्या मुलांवरही आरोप लावणार.
कोणत्याही राष्ट्रांनी आपले दैवत बदलले आहे काय? (जरी ते सर्व देव नाहीतच.) परंतु माझ्या लोकांनी आपल्या गौरवी परमेश्वराची व्यर्थ मूर्तींशी अदलाबदल केली.
हे पाहून आकाश, विस्मयाने हादरून जा आणि भीतीने गर्भगळीत व्हा,” अशी याहवेह घोषणा करतात.
“माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत: त्यांनी जीवनदायी पाण्याच्या झर्याला, म्हणजे मला, सोडले आहे, आणि ज्यात पाणी राहत नाही असे फुटके, गळके हौद स्वतःसाठी बांधले आहेत.
ज्या याहवेहनी तुम्हाला योग्य मार्गाने चालविले त्या तुमच्या परमेश्वराचा त्याग करून, ही परिस्थिती तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली नाही का?
तुमचा दुष्टपणाच तुम्हाला शिक्षा देईल; तुमचे माघार घेणे तुम्हाला दोषी ठरवेल. म्हणून विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल याहवेह तुमच्या परमेश्वराचा त्याग करून दूर जाणे तुमच्यासाठी किती वाईट आणि कटू आहे, आणि माझे भय तुमच्यामध्ये नाही,” सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात.
“फार फार पूर्वी तुम्ही माझे जू झुगारून दिले व मी बांधलेले दावे तोडून टाकले; तुम्ही म्हटले, ‘आम्ही तुमची सेवा करणार नाही!’ अर्थात्, प्रत्येक उंच टेकडीवर, आणि प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली तुम्ही वेश्येप्रमाणे निजलात.
मी तुम्हाला एका उत्तम द्राक्षवेलीप्रमाणे लावले होते उत्कृष्ट व विश्वसनीय असे खोड दिले होते. मग तुम्ही माझ्याविरुद्ध का झालात भ्रष्ट व रानटी लता का झालात?
तुम्ही स्वतःला साबणाने धुतले आणि विपुल प्रमाणात धुण्याची पावडर वापरली, तरी तुमचे कलंक माझ्यापुढे तसेच आहेत,” असे सार्वभौम याहवेह म्हणतात.
“तुम्हाला कसे म्हणता येईल ‘मी अशुद्ध नाही; मी बआल दैवताच्या मागे गेलो नाही’? दरीत जाऊन तुम्ही कसे वागले ते पाहा, तुमच्या आचरणाबद्धल विचार करा. इकडे तिकडे पळणार्या चपळ उंटिणीसारखे तुम्ही आहात.
तुझे पाय पूर्णपणे खळ्यात उघडे पडेपर्यंत पळू नको, आणि तुझ्या घशाला कोरड पडली आहे. परंतु तू म्हटले, ‘याचा काही उपयोग नाही! मी परकीय दैवतावर प्रेम करतो, आणि मी त्यांचेच अनुसरण करणार.’
लाकडाच्या खांबाला ते म्हणतात, ‘तू आमचा पिता आहेस,’ आणि पाषाणाला म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास.’ त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली आहे, पण त्यांचे मुख नव्हे; परंतु संकट समय येताच ते माझा धावा करून म्हणतात, ‘या आणि आमचे रक्षण करा!’
“तुम्ही माझ्याविरुद्ध आरोप का करता? तुम्हा सर्वांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे,” असे याहवेह म्हणतात.
“मी तुमच्या लोकांना उगाच शिक्षा केली; त्यांनी सुधारणेचा स्वीकार केला नाही. तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांचा नाश केला जणू एखादा खवखवलेला सिंहच.
“या पिढीच्या लोकांनो, याहवेहच्या वचनावर विचार करा: “मी इस्राएलशी एखाद्यावर निर्जन प्रदेशाप्रमाणे किंवा अंधाऱ्याप्रदेशाप्रमाणे वागलो काय? माझे लोक असे का म्हणतात, ‘आम्ही मन मानेल तसे भटकण्यास मोकळे आहोत; आता पुन्हा आम्ही तुमच्याशी संबंध ठेवणार नाही’?
एखादी कुमारी आपले दागदागिने किंवा एखादी वधू आपली विवाहाभूषणे विसरेल का? तरी माझे लोक मला, असंख्य दिवसापासून विसरले आहेत.
निष्पाप लोकांच्या रक्ताने तुमची वस्त्रे माखली आहेत, तुमच्या घरात चोरी करण्यासाठी शिरतांना त्यांना तुम्ही बघितले नाही. असे सर्व असूनही
तुम्ही म्हणता, ‘मी निर्दोष आहे; परमेश्वर माझ्यावर रागावले नाहीत.’ परंतु मी तुमचा न्याय करेन कारण तुम्ही म्हटले, ‘मी पाप केलेले नाही.’
तुम्हीही आपले स्थान सोडणार आपले हात डोक्यावर ठेऊन जाल, कारण ज्यांच्यावर तुमचा भरवसा आहे, त्यांनाच याहवेहने नाकारले आहे. ते तुम्हाला मदत करणारच नाहीत.
“जर एखाद्या पुरुषाने आपल्या स्त्रीला घटस्फोट दिला आणि त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले, तर तिच्या पहिल्या पतीकडे तिच्याकडे परत जावे काय? असे करण्याने ही भूमी पूर्णपणे भ्रष्ट होणार नाही काय? परंतु तू एका वेश्येप्रमाणे अनेक प्रियकरांसह राहिलीस— तू माझ्याकडे आता परत येणार का?” असे याहवेह म्हणतात.
तू मला आताच म्हणालीस ना, ‘माझ्या पित्या, माझ्या तारुण्यातील मित्रा,
तू नेहमीसाठी रागावला आहेस का? हा क्रोध नेहमीसाठी राहील काय?’ याप्रकारे तू बोलतेस, परंतु तू करता येईल ते सर्वप्रकारचे कुकर्म करतेस.”