- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
स्तोत्रसंहिता८३
Listen to this chapter
0:00
0:00
स्तोत्रकर्ता देवाच्या हस्तक्षेपासाठी आक्रोश करतो
१
एक गीत. आसाफाचे एक स्तोत्र. हे परमेश्वरा, तुम्ही मौन धरू नका; आमच्यासाठी कान बहिरे करू नका, असे अलिप्त राहू नका.
२
पाहा तुमचे शत्रू कसे गुरगुरतात, तुमच्या विरोधकांनी आपले डोके वर काढले आहे.
देवाच्या लोकांविरुद्ध कट
३
तुमच्या लोकांविरुद्ध ते कट करतात; तुमच्या प्रिय लोकांविरुद्ध ते कारस्थान करीत आहेत.
४
ते म्हणतात, “चला, आपण इस्राएली राष्ट्रांचा समूळ नाश करू या; त्यांच्या अस्तित्वाची आठवण देखील आपण नष्ट करून टाकू.”
५
एकजूट होऊन एकमताने त्यांनी कट रचला; ते सर्व तुमच्याविरुद्ध संघटित झाले आहेत—
शत्रू राष्ट्रांची युती
६
एदोमी तथा इश्माएली, मोआबी आणि हगरी लोकांचे डेरे,
७
गबाल, अम्मोन, व अमालेक, पलेशेथ आणि सोरचे निवासी.
८
अश्शूरही देखील त्यांना सामील झाला आहे की त्याने लोटाच्या वंशजांना सशक्त करावे. सेला
पूर्वीच्या कृत्यांवर आधारित न्यायासाठी प्रार्थना
९
पूर्वी जसा तुम्ही मिद्यानाशी, किंवा सिसेरा व किशोन नदीजवळ याबीनांशी व्यवहार केला, तसाच यांच्याशीही करा.
१०
ज्यांचा विनाश एनदोर येथे झाला, आणि मग ते भूमीवर पडलेल्या शेणासारखे झाले.
११
त्यांच्या सरदारांना ओरेब व जेब समान होऊ द्या; त्यांच्या अधिपतींना जेबह व सलमुन्ना सारखेच होऊ द्या.
१२
ते म्हणाले होते, “चला परमेश्वराची कुरणे आपण हस्तगत करू या.”
अंतिम ध्येय: देवाचे सार्वभौमत्व प्रकट होणे
१३
हे माझ्या परमेश्वरा, वावटळीच्या धुळीगत, वार्याने उडणार्या भुशागत त्यांना करा.
१४
अग्नी वनाला भस्म करतो, ज्वाला डोंगराला आग लावते,
१५
आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग करा, व आपल्या तुफानाने त्यांना घाबरवून सोडा.
१६
हे याहवेह, तुम्ही त्यांना पूर्णपणे लज्जित करा, जेणेकरून त्यांनी तुमच्या नावाचा शोध करावा.
१७
ते कायमचे फजीत होवोत आणि गोंधळून जावोत; त्यांचा लज्जास्पद नाश होऊ द्या.
१८
त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे— तेच या समस्त पृथ्वीचे एकमेव परमश्रेष्ठ स्वामी आहेत.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Reading Width chars
Options
Study Note