Skip to content
यहेज्केल ४०:१७-४५

यहेज्केल ४०:१७-४५

१७
मग त्याने मला बाहेरच्या अंगणात आणले. तिथे अंगणाच्या सभोवती काही खोल्या व बांधलेली पाऊलवाट मी पाहिली; पाऊलवाटेच्या बाजूने तीस खोल्या होत्या.
१८
त्या खोल्या वेशीच्या बाजूला लागूनच होत्या आणि जितकी त्यांची लांबी तितकीच त्यांची रुंदी होती; ही खालची पाऊलवाट होती.
१९
मग त्याने खालच्या वेशीच्या आतील बाजूपासून आतील अंगणाच्या बाहेरच्या बाजूपर्यंतच्या अंतराचे माप घेतले; त्याचे माप पूर्वेकडून तसेच उत्तरेकडूनही शंभर हात होते.
२०
मग त्याने बाहेरील अंगणाकडे जाणाऱ्या उत्तरेकडील द्वाराची लांबी व रुंदी मापली.
२१
त्यांच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन चौक्या होत्या; त्याच्या भिंती आणि देवडीचेही तेच माप होते जे पहिल्या वेशीचे होते. ते पन्नास हात लांब आणि पंचवीस हात रुंद होते.
२२
त्याचे झरोके, त्याची देवडी आणि त्याचे खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम केलेली सजावट यांचे माप पूर्वेकडील द्वाराच्या मापाइतकेच होते. त्यावर चढून जाण्यासाठी सात पायर्‍या होत्या आणि त्याची देवडी त्याच्यासमोर होती.
२३
जसे पूर्वेच्या बाजूने होते तसेच आतील अंगणातही एक द्वार होते जे उत्तरेच्या बाजूने होते. त्याने एका द्वारापासून त्याच्या समोरील द्वारापर्यंत माप घेतले; ते शंभर हात मापले.
२४
मग त्या मनुष्याने मला दक्षिणेकडे नेले आणि मी दक्षिणेच्या बाजूला द्वार पाहिले. त्याने त्याच्या खांबांचे व देवडीचे माप घेतले आणि इतर खांब व देवडींप्रमाणेच याचेही माप होते.
२५
त्याच्या वेशी व देवडींना चहूकडून इतर वेशी व देवड्यांप्रमाणेच अरुंद झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.
२६
त्याच्यावर जाण्यासाठी सात पायर्‍या होत्या आणि त्याच्यासमोर देवडी होती; त्याच्या भिंतींच्या प्रत्येक बाजूला खजुरीच्या झाडाचे कोरीवकाम केलेली सजावट होती.
२७
आतील अंगणात सुद्धा एक द्वार होते ज्याचे तोंड दक्षिणेच्या बाजूला होते, त्याने या द्वारापासून दक्षिणेच्या बाहेरच्या द्वारापर्यंत माप घेतले; ते शंभर हात होते.
२८
त्यानंतर त्या मनुष्याने मला दक्षिणेकडील द्वारातून आतील अंगणात आणले आणि त्याने दक्षिणेकडील द्वार मापले; इतर द्वारांप्रमाणेच त्याचेही माप होते.
२९
त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्यांचे माप हे सुद्धा तितकेच होते. वेशी व त्याच्या देवड्यांना चहूकडून झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात आणि रुंदी पंचवीस हात होती.
३०
(आतील अंगणाच्या चहूकडून वेशीच्या देवड्या पंचवीस हात रुंद आणि पाच हात खोल होत्या.)
३१
त्याची देवडी बाहेरील अंगणासमोर होती; खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम करून त्याच्या खांबांना सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्‍या होत्या.
३२
त्यानंतर त्याने मला पूर्वेच्या बाजूने आतील अंगणात आणले, आणि त्याने वेशीचे माप घेतले; इतर वेशींप्रमाणेच हिचेही माप भरले.
३३
त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्यांचे माप हे सुद्धा तितकेच होते. वेशी व त्याच्या देवड्यांना चहूकडून झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात आणि रुंदी पंचवीस हात होती.
३४
त्याच्या देवड्याचे तोंड बाहेरील अंगणाकडे होते; खजुरीच्या झाडांच्या कोरीवकामाने त्याचे स्तंभ सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्‍या होत्या.
३५
नंतर त्याने मला उत्तरेच्या द्वाराकडे आणले व त्याचे माप घेतले. इतरांप्रमाणेच त्याचेही माप भरले.
३६
त्याप्रमाणेच त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्या होत्या, आणि चहूकडून त्याला झरोके होते. ते पन्नास हात लांब आणि पंचवीस हात रुंद होते.
३७
त्याच्या देवड्याचे तोंड बाहेरील अंगणाकडे होते; खजुरीच्या झाडांच्या कोरीवकामाने त्याचे स्तंभ सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्‍या होत्या.
३८
प्रत्येक आतील वेशीच्या देवडीकडे द्वार असलेली खोली होती, जिथे होमार्पणे धुतली जात असत.
३९
वेशीच्या देवडीमध्ये दोन्ही बाजूंना दोन मेज होते, ज्यावर होमार्पणे, पापार्पणे व दोषार्पणे वधली जात असत.
४०
वेशीच्या देवडीच्या बाहेरील भिंतीजवळ, उत्तरेच्या वेशीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन मेज होते आणि पायर्‍यांच्या दुसर्‍या बाजूने दोन मेज होते.
४१
म्हणजेच वेशीच्या एका बाजूला चार मेज होते आणि दुसर्‍या बाजूला चार; असे एकूण आठ मेज होते; ज्यावर अर्पणे कापली जात असत.
४२
होमार्पणासाठी कोरीव दगडाचे अजून चार मेज होते, जे प्रत्येकी दीड हात लांब, दीड हात रुंद आणि एक हात उंच होते. त्या मेजांवर होमार्पणांचा व इतर अर्पणांचा वध करण्यासाठी उपकरणे व पात्रे ठेवण्यात आली होती.
४३
भिंतीच्या चहूकडून प्रत्येकी चार बोटे असे दुहेरी टोके असलेले आकडे अडकविले होते. ते मेज अर्पणाच्या मांसासाठी होते.
४४
आतील द्वाराच्या बाहेर, आतील अंगणाच्या आत दोन खोल्या होत्या. उत्तरेच्या द्वाराजवळ दक्षिणेकडे तोंड केलेली एक खोली तर दुसरी खोली दक्षिणेच्या द्वाराजवळ उत्तरेकडे तोंड केलेली होती.
४५
तो मनुष्य मला म्हणाला, “दक्षिणेकडे तोंड असलेली खोली मंदिराचे राखण करणार्‍या याजकांसाठी आहे
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options