Skip to content

Widow बद्दल बायबलमधील वचने

62 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून जे अविवाहित आहेत आणि ज्या विधवा आहेत, त्यांना मी सांगतो तुम्हीही जसा मी आहे तसे राहावे.

  2. पण तुम्हाला संयम राखता येत नसेल, तर विवाह केलेला बरा. वासनेने जळण्यापेक्षा विवाह करणे उत्तम.

  3. पती जिवंत असेल तोपर्यंत पत्नी आपल्या पतीला बांधलेली आहे. पती मरण पावला, तर ती पाहिजे त्याच्याशी लग्न करण्यास मोकळी आहे, पण तो प्रभूमध्ये विश्वासू असावा.

  4. ज्या गरजवंत विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर.

  5. परंतु विधवेला मुले अथवा नातवंडे असतील, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबीयांशी सुभक्तीने वागून व आपल्या पितरांचे उपकार फेडण्यास शिकावे, यामुळे परमेश्वराला अतिशय संतोष होतो.

  6. जी वास्तविक विधवा आहे व एकटी पडलेली आहे, तिने परमेश्वरावर आपली आशा ठेवली आहे आणि ती मदतीसाठी रात्रंदिवस विनंत्या व प्रार्थना करीत असते.

  7. परंतु जी विधवा विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे.

  8. जी विधवा साठ वर्षांपेक्षा अधिक आहे, तिच्या पतीबरोबर विश्वासू राहिलेली आहे,

  9. जिच्या चांगल्या कामाबद्दल ती प्रसिद्ध आहे, म्हणजे जिने आपल्या मुलाबाळांचे चांगले संगोपन केले असेल, जिने आतिथी सत्कार केलेला असेल, जिने प्रभूच्या लोकांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांना मदत केली असेल आणि सर्वप्रकारच्या चांगल्या कामासाठी समर्पित केले असेल, तिचे नाव विधवांच्या यादीत लिहावे.

  10. परंतु तरुण विधवांचे नाव अशा यादीत नोंदवू नये, कारण जेव्हा त्यांची विषयवासना ख्रिस्तावरील त्यांच्या निष्ठेपेक्षा प्रबळ होते, तेव्हा त्या विवाह करू पाहतात,

  11. आणि म्हणून आपली पहिली प्रतिज्ञा मोडल्याबद्दल त्या आपल्यावर दंड ओढवून घेतात.

  12. जर कोणी विश्वासणारी स्त्री विधवांची काळजी घेत आहे, तर तिने त्यांची मदत करीत राहावे आणि मंडळीवर त्यांचे ओझे टाकू नये म्हणजे ज्या विधवा खरोखर गरजवंत आहेत, त्यांना मंडळी मदत करू शकेल.