Skip to content

Widow बद्दल बायबलमधील वचने: Unclassified scriptures relating to

57 वचने · 5 पैलू

Unclassified scriptures relating to बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “विधवा किंवा अनाथाचा गैरफायदा घेऊ नये.

  2. तुम्ही जर तसे केले आणि त्यांनी माझा धावा केला, तर मी खचितच त्यांचे रडणे ऐकेन.

  3. मग माझा क्रोध पेटेल आणि मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन; आणि तुमची पत्नी विधवा व तुमची लेकरे अनाथ होतील.

  4. ते अनाथांचा व विधवांचा न्याय करतात, जे परदेशीय तुम्हामध्ये राहतात त्यांच्यावर प्रीती करून त्यांना अन्न व वस्त्रे देतात.

  5. प्रत्येक तिसर्‍या वर्षाच्या शेवटी संपूर्ण उत्पन्नाचा दशांश आणावा आणि तुमच्या नगरात एकत्र साठवून ठेवावा,

  6. म्हणजे लेवी वंशजांना (ज्यांना स्वतःचा वाटा अथवा वतन नाही) तो दशांश द्यावा किंवा परकियांना द्यावा अथवा तुमच्या नगरात असणार्‍या विधवांना आणि अनाथांना द्यावा. म्हणजे ते खाऊन तृप्त होतील आणि मग याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या हाताच्या कार्याला आशीर्वादित करतील.

  7. याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर त्यांनी आपल्या नावासाठी निवडलेल्या पवित्रस्थानी—तुम्ही, तुमचे पुत्र व कन्या, तुमचे दास व दासी, तुमच्या नगरातील लेवी आणि परदेशी, तुमच्यामध्ये राहणारे अनाथ आणि विधवा यांनाही उत्सवात सामील करून घ्यावे.

  8. तुम्ही इजिप्त देशामध्ये गुलाम होता, याचे तुम्हाला स्मरण राहावे आणि म्हणून या विधीचे तुम्ही काळजीपूर्वक पालन करावे.

  9. तुमच्या खळ्यातील आणि द्राक्षकुंडातील उत्पादन तुम्ही गोळा केल्यानंतर सात दिवस मंडपाचा सण साजरा करा.

  10. आनंदोत्सव साजरा करण्यास—तुम्ही, तुमचे पुत्र व कन्या, तुमचे दास व दासी, तुमच्या नगरातील लेवी, परदेशी, तुमच्यामध्ये राहणारे अनाथ आणि विधवा यांनाही उत्सवात सामील करून घ्यावे.

  11. परदेशी आणि अनाथांना यथायोग्य न्याय दिला पाहिजे, किंवा विधवेची वस्त्रे गहाण म्हणून कधीही घेतली जाऊ नये.

  12. पिकांची कापणी करीत असताना तुम्ही बांधून ठेवलेली एखादी पेंढी शेतातून आणावयाचे विसरलात, तर ती आणण्यासाठी तुम्ही माघारी जाऊ नये, तर परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी ती तिथेच राहू द्यावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या सर्व कार्यात आशीर्वाद देतील.

  13. तुम्ही तुमच्या जैतून वृक्षांवरील फळे काढण्याकरिता झोडपणी कराल, तेव्हा तुम्ही एकाच फांदीवर दोनदा प्रहार करू नये. त्या फांदीवर जी काही फळे राहतील ती परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी राहू द्यावी.

  14. जेव्हा तुम्ही तुमच्या द्राक्षमळ्यातील द्राक्षे काढता तेव्हा परत वेलींवर जाऊ नका. तर राहिलेली द्राक्षे परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी तशीच राहू द्यावीत.

  15. भाऊ एकत्र राहत असतील व त्यातील एकजण निपुत्र मरण पावला, तर त्याच्या विधवेने कुटुंबाबाहेर परक्याशी विवाह करू नये. तिच्या पतीच्या भावाने तिच्याशी विवाह करावा आणि तिचा स्वीकार करावा आणि तिच्याप्रती दिराचे कर्तव्य पूर्ण करावे.

  16. तिला जन्मलेल्या पहिल्या पुत्राला मृत भावाचे नाव द्यावे, जेणेकरून त्याचे नाव इस्राएलमधून पुसले जाणार नाही.

  17. परंतु याबाबतीत मृत माणसाच्या भावाने त्याच्या मृत भावाच्या विधवेशी विवाह करण्यास नकार दिला, तर तिने त्या नगराच्या वेशीवर वडीलजनांकडे जाऊन त्यांना म्हणावे, “माझ्या पतीचा भाऊ आपल्या भावाचे नाव इस्राएलात पुढे चालविण्यास तयार नाही. माझ्याप्रति तो आपले दिराचे कर्तव्य पार पाडणार नाही.”

  18. तेव्हा त्याच्या नगरातील वडीलजनांनी त्याला बोलावून घ्यावे आणि त्याच्याशी बोलणी करावी. “मला त्या बाईशी लग्न करावयाचे नाही,” असे जर तो हट्टीपणाने म्हणाला.

  19. तर त्या विधवेने सर्व वडीलजनासमोर त्याच्याकडे जावे, त्याच्या पायातील पायतण काढून घ्यावे आणि त्याच्या तोंडावर थुंकून म्हणावे, “जो मनुष्य आपल्या भावाचे घर चालविण्यास नकार देतो, त्याची अशीच गत होते.”

  20. त्याच्या घराण्याचा उल्लेख इस्राएलातील पायतण काढलेल्या पुरुषाचे घराणे असा केला जाईल.

  21. “जो कोणी परदेशी, अनाथ आणि विधवा यांचा न्याय विपरीत करतो तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  22. तुझी दुष्टता पुष्कळ नाही का? तुझे अपराध अनंत नाही का?

  23. आणि तू विधवांना रिकाम्या हाती घालवून दिले तसेच अनाथांना बलहीन केलेस.

  24. अनाथांची गाढवे ते हाकलून लावतात आणि विधवेचा बैल तारण म्हणून ठेवून घेतात.

  25. पुत्रहीन व वांझ स्त्रीस ते भक्ष करतात, आणि विधवांशी ते दयेने वागत नाहीत.