मुख्य मजकुरावर जा

Unfaithfulness बद्दल बायबलमधील वचने

106 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मला तुमची भीती वाटली, म्हणून मी गेलो व तुम्ही दिलेली एक थैली भूमीत दडवून ठेवली. पाहा, ती आता मी तुम्हाला परत करण्याकरिता आणली आहे.’

  2. “यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे, दुष्ट आणि आळशी दासा, जिथे मी पेरले नाही तिथे मी कापणी करतो आणि जिथे मी विखुरले नाही तिथे गोळा करतो, तुला एवढे तुला माहीत होते.

  3. तर मग तू माझे सोने सावकाराकडे तरी गुंतवून ठेवावयास होते, म्हणजे मी परत आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते.

  4. “ ‘तर त्या सोन्याची थैली त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा थैल्या आहेत त्याला द्या.

  5. कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल, म्हणजे त्यांना विपुलतेने मिळेल. ज्यांच्याकडे नाही, त्यांच्याजवळ जे काही असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.

  6. आता त्या कुचकामी सेवकाला बाहेरच्या अंधारात फेकून द्या; ज्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’

  7. “जेव्हा मानवपुत्र सर्व देवदूतांना बरोबर वैभवाने येईल, त्यावेळी तो वैभवशाली सिंहासनावर बसेल.

  8. मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र होतील आणि मेंढपाळ मेंढरे व शेरडे वेगळे करतो तसा तो लोकांना एकमेकांपासून वेगळे करेल.

  9. मेंढरांना तो त्याच्या उजवीकडे आणि शेरड्यांना त्याच्या डावीकडे करेल.

  10. “मग राजा त्याच्या उजवीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याने दिलेल्या आशीर्वादांनी धन्य झालेले लोकहो, या आणि जगाच्या उत्पत्तीपासून जे राज्य तुम्हाकरिता तयार करून ठेवले आहे ते वतन करून घ्या.

  11. मी भुकेला होतो आणि तुम्ही मला काही खावयास दिले; मी तान्हेला होतो आणि तुम्ही मला प्यावयास दिले; मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले;

  12. मला वस्त्रांची गरज होती, तेव्हा तुम्ही मला वस्त्रे दिली; मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली.’

  13. “त्यावेळी नीतिमान लोक त्याला म्हणतील, ‘प्रभूजी, तुम्ही भुकेले असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि अन्न दिले आणि तहानलेले असताना तुम्हाला प्यावयाला दिले?

  14. तुम्ही परके असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि घरात घेतले किंवा तुम्ही वस्त्रहीन असताना तुम्हाला वस्त्रे दिली?

  15. तुम्ही आजारी असताना किंवा तुरुंगात असताना, आम्ही केव्हा तुमच्या भेटीला आलो?’

  16. “मग राजा उत्तर देऊन म्हणेल, ‘मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे काही या लहानातील माझ्या एकाही भावा-बहिणीसाठी तुम्ही केले ते तुम्ही माझ्यासाठी केले.’

  17. “नंतर तो त्याच्या डावीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो शापग्रस्त लोकांनो, तुम्ही माझ्यापुढून निघून जा. सैतान आणि त्याच्या दूतांसाठी जो सार्वकालिक अग्नी तयार ठेवला आहे त्यात जा.

  18. कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला काही खावयास दिले नाही; तान्हेला होतो, तेव्हा तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही.

  19. परका होतो, तेव्हा तुम्ही मला घरात घेतले नाही; वस्त्रहीन होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले नाही; आजारी होतो, तुरुंगात होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’

  20. “ते सुद्धा असे उत्तर देतील, ‘प्रभूजी तुम्ही भुकेले, तहानलेले, परके, उघडे, आजारी किंवा तुरुंगात असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि तुमची मदत केली नाही?’

  21. “तो त्यांना उत्तर देईल, ‘खरोखर, या कनिष्ठांना करण्याचे तुम्ही नाकारले, तेव्हा तुम्ही माझ्यासाठी करण्याचे नाकारले.’

  22. “मग त्यांना सार्वकालिक मृत्यूची शिक्षा मिळेल, पण जे नीतिमान आहेत ते सार्वकालिक जीवनात प्रवेश करतील.”

  23. काही अंतरावर पानांनी बहरलेले एक अंजिराचे झाड त्यांच्या दृष्टीस पडले, त्यावर काही फळे सापडतील या शोधार्थ ते तिथे गेले. तिथे पोहोचल्यावर, त्यांना फक्त पानांशिवाय काही आढळले नाही, कारण तो अंजिरांचा हंगाम नव्हता.

  24. तेव्हा येशू झाडाला म्हणाले, “तुझे फळ कोणीही कधीही न खावो.” त्यांचे हे बोलणे शिष्य ऐकत होते.

  25. मग येशू त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागले: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली, द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन तो दुसर्‍या ठिकाणी राहवयास गेला.