मुख्य मजकुरावर जा

The Truth of God बद्दल बायबलमधील वचने

40 वचने · 35 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमची सर्व वचने पूर्णपणे सत्य आहेत; तुमचे सर्व नीतियुक्त न्याय अनंतकाळचे आहेत.

  2. उपासना करीत असताना, तुमच्या मंदिराकडे मी नतमस्तक होईन, आणि तुमच्या सर्व दयामय प्रीतीबद्दल आणि विश्वासूपणाबद्दल, तुमची उपकारस्तुती करेन, कारण तुम्ही तुमच्या वचनाला तुमच्या किर्तीपेक्षा उंच केले आहे.

  3. कारण त्यांनीच आकाश, पृथ्वी, सागर, आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले; ते सदासर्वदा विश्वासयोग्य आहेत.

  4. याहवेह तुम्ही माझे परमेश्वर आहात; मी तुम्हाला उंचावेन आणि तुमच्या नावाची स्तुती करेन, कारण परिपूर्ण विश्वासूपणाने तुम्ही अद्भुत गोष्टी केल्या आहेत, ज्या फार पूर्वीपासून योजलेल्या होत्या.

  5. जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात, जसे मी आज करीत आहे; पालक त्यांच्या मुलांना तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात.

  6. जो कोणी या भूमीवर आशीर्वादासाठी धावा करतो तो खऱ्या परमेश्वराद्वारेच करेल; जो कोणी या भूमीवर शपथ घेतो तो खऱ्या परमेश्वराचीच घेईल. कारण जुने त्रास विसरण्यात येतील, आणि माझ्या नजरेपासून लपविल्या जातील.

  7. आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाधिराजाची स्तुती, गौरव व सन्मान करतो, कारण ते जे काही करतात ते योग्य करतात आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. आणि जे गर्वाने चालतात त्यांना ते नम्र करण्यास समर्थ आहेत.

  8. फार पूर्वी, आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही याकोबाशी विश्वासू असाल, आणि अब्राहामवर प्रीती दाखवाल.

  9. सत्याने त्यांना पवित्र करा; तुमचे वचन सत्य आहे.

  10. परमेश्वराने कितीही अभिवचने दिलेली असोत, ख्रिस्तामध्ये ती “होय” आहेत. परमेश्वराच्या नावाचे गौरव करीत आम्ही त्यांच्याद्वारे “आमेन” म्हणतो.

  11. परमेश्वर जे कधीही खोटे बोलत नाहीत, त्यांनी सार्वकालिक जीवनाच्या आशेचे अभिवचन सुरवातीच्या काळाच्या आधीपासून दिले

  12. जर आपण म्हणतो की, आपण पाप केले नाही, तर आपण परमेश्वराला लबाड ठरवितो आणि त्यांचे वचन आपल्यामध्ये नाही.

  13. जे कोणी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतात ते ही साक्ष स्वीकारतात. जे कोणी यावर विश्वास ठेवीत नाहीत, परमेश्वराने त्यांना लबाड ठरविले आहे, कारण परमेश्वराने त्यांच्या पुत्राविषयी दिलेल्या साक्षीवर त्यांनी विश्वास ठेवला नाही;

  14. ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत!

  15. नंतर वेदीला असे म्हणताना मी ऐकले: “खरोखर, हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, तुमचे न्याय न्यायी व सत्य आहेत.”